सकल मराठा समाज परभणी

सकल मराठा समाज परभणी एक मराठा, लाख नाही कोटी मराठा...!!

एक मराठा, कोटी मराठा...!!

सार्वजनिक शिवजन्मोत्सव कार्यालयाचे उद्घाटन🚩दिनांक : सोमवार, २६ जानेवारी २०२६वेळ : सकाळी ९.०० वाजतास्थळ : सकल मराठा समाज ...
25/01/2026

सार्वजनिक शिवजन्मोत्सव कार्यालयाचे उद्घाटन🚩
दिनांक : सोमवार, २६ जानेवारी २०२६
वेळ : सकाळी ९.०० वाजता
स्थळ : सकल मराठा समाज कार्यालय, अतिथी हॉटेल, स्टेडियम कॉम्प्लेक्स, परभणी
या ऐतिहासिक प्रसंगी परभणीतील सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.🙏🙏🙏
ही पोस्ट प्रत्येक शिवप्रेमीपर्यंत नक्की शेअर करा.
जय शिवराय! 🚩🚩🚩🚩

16/01/2026

परभणी महानगरपालिकेत निवडून आलेल्या सर्व मराठा बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

जिजाऊ जयंती निमित्ताने जिजाऊ संस्थान, परभणी येथे नितीन देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या वतीने जिजाऊ मंदिरासाठी २५,००० रुपये...
14/01/2026

जिजाऊ जयंती निमित्ताने जिजाऊ संस्थान, परभणी येथे नितीन देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या वतीने जिजाऊ मंदिरासाठी २५,००० रुपये देणगी सदस्यत्व स्वरूपात अर्पण करण्यात आली.*
या प्रसंगी जिजाऊ संस्थानचे अध्यक्ष डॉ. जगण सरकटे, सचिव रुस्तम भालेराव, कोषाध्यक्ष अशोक रसाळ सर उपस्थित होते. तसेच मराठा समन्वयक बालाजी मोहिते, सुप्रसिद्ध चित्रकार शिवराज जगताप, माऊली दुधाटे व इतर मित्रमंडळीही यावेळी उपस्थित होती.

#नितीन_देशमुख
संस्थापक अध्यक्ष
#मराठा_सेवा_मंडळ, महाराष्ट्र राज्य

03/01/2026

कोरेगाव भीमा लढाई सत्यता

17/04/2025

🚩छत्रपती शिवाजी महाराज व गुणवंताबाई राणीसाहेब
यांचा विवाह १५ एप्रिल १६५६ 🚩


छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुणवंताबाई राणीसाहेब यांच्या बरोबर १५ -४-१६५७ - मध्ये विवाह झाला. गुणवंताबाई या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या आठव्या राणी होत्या.
तंजावर येथील बृहदिश्वर शिलालेखात शिवपत्नींची नामावली सांगताना नमूद केले आहे की,मालहोजी लेके
तंजावर येथील टिपणात हिला फर्जंदाची लेक असे म्हटले आहे. जिजाऊ साहेबांबरोबर विदर्भातून जी घराणी आली होती ,त्यामध्ये वराड मधील चिखली तालुक्यातील करवंड येथील हे इंगळे देशमुख घराणे आले होते .हे घराणे तंजावरचे,परंतु त्यांचे वतन वर्हाडात होते. इंगळे घराण्यातील एक शाखा राजमाता जिजामाता व छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे समवेत महाराष्ट्रात आली होती .हे घराणे पर्यायाने शहाजी राजांकडे राहात होते. खबद बेलसर येथे सन १६४८ मध्ये फतह खानाशी छत्रपती शिवरायांनी केलेल्या युद्धात शिवरायांच्या वीराविषयी कवी परमानंद शिवभारतात सांगतात, भयंकर आहे असा यमाप्रमाणे,युध्दनगाचा शृंगार ज्याच्या भाल्याचे टोक आहे,असा शिवाजी इंगळे यांचा उल्लेख करून पुढे इंगळे यांचा पराक्रम सांगतात. शिवाजी इंगळे यांनी अत्यंत मोठा पराक्रम केला होता. इंगळे यांनी शिरवळच्या रणक्षेत्रावर पंचवीस लोक मारले होते. याच शिवाजीराव इंगळे यांची गुणवंताबाई या कन्या होत्या.
१५-४-१६५७ मधे भोसल्यांशी सोयरीक होऊन गुणवंताबाई शिवरायांच्या पत्नी झाल्या असा उल्लेख जेधे शकावलीमध्ये आहे.
या शकावलीला शिवापुरकर देशपांडे यांच्या शकावलीची साक्ष आहे .आपल्या माहेरकडचे इंगळे घराणे फुटून मोगलांकडे जाऊ नये म्हणून आऊसाहेबांनी इंगळे घराण्यातील लेक सून म्हणून घरात आणली. जिजाऊसाहेबांची ही खेळी यशस्वी ठरली. कारण इंगळे यांचा जमाव किल्ले राजगडावर शिवरायांच्या देखरेखीखाली राहिला. याला इतिहासाच्या पुढील नोंदीनी साक्ष दिली. शहाजीराजे यांचे पुत्र व्यंकोजीराजे यांच्या प्रथम धर्मपत्नी चिखली तालुक्यातील कळवण येथील इंगळे घराण्यातील होत्या. याच इंगळे घराण्यातील काताजी इंगळे देशमुख प्रतापगडी युद्धप्रसंगी शिवरायांच्या दहा अंगरक्षकापैकी एक होते. सन १६५९मध्ये रायबागेच्या रणांगणावर रुस्तुम -ए -जमान आणि अफजलपुत्र फाजल यांच्याशी झालेल्या युद्धात हिराजी इंगळे छत्रपती शिवरायांच्या घोडदळात होते. किल्ले पन्हागडावर बाळाजी इंगळे मुद्राधारी ,त्र्यंबक इंगळे किल्लेदार ,आणि कान्होजी इंगळे या तीन इंगळे ह्यांनी सन १६६२ पासून १७०१ पर्यंत औरंगजेबास झुंजवत ठेवून शेवटी तह करण्यास भाग पाडले. शिवपत्नी गुणवंताबाई साहेब या तोलामोलाच्या इंगळे सरदारांच्या कन्या होत्या. त्यांचा मृत्यू सन १६७० मधे झाला.

🙏अशा या गुणवंताबाई राणीसाहेब यांना आमचा मानाचा मुजरा 🙏

लेखन ✒️
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
संदर्भ
शिवपत्नी महाराणी सईबाई
मेहता प्रकाशन, पुणे

03/04/2025
03/04/2025
02/04/2025

दोन समाजात वाद वाढविण्याच्या उद्देशाने होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ
मनपा व जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाजाचा निषेध मोर्चा काढण्यात आला 🚩

Address

Front Of SP Office, Vastmat Road
Parbhani
431512

Alerts

Be the first to know and let us send you an email when सकल मराठा समाज परभणी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category