27/08/2026
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्यातील कोअर कमिटीची घोषणा करण्यात आली आहे.
संघटन हीच पक्षाची खरी शक्ती आणि कार्यकर्ता हीच पक्षाची अमूल्य संपत्ती आहे. या भावनेतून नवनियुक्त कोअर कमिटीतील सर्व सहकारी परस्परांच्या समन्वयातून, सामूहिक नेतृत्वाच्या भावनेतून, संघटननिष्ठेने कार्यरत राहतील!
आपण सर्वजण एकदिलाने, एकजुटीने, समन्वयाने काम करू; भारतीय जनता पक्षाच्या तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला बळ, विश्वास, पाठबळ देऊ.
बूथस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत संघटन सशक्त करून पक्षाची विचारधारा जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी अविरत प्रयत्न करू.
परभणी जिल्ह्यातील संघटनशक्ती अधिक प्रबळ, व्यापक, अभेद्य करण्यासाठीच्या या नव्या पर्वासाठी सर्व नवनियुक्त कोअर कमिटी पदाधिकारी, सदस्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा! 💐
एकजूट विचारांची, शक्ती कार्यकर्त्यांची, दिशा जनसेवेची…
Devendra Fadnavis Bharatiya Janata Party (BJP) Ravindra Chavan BJP Maharashtra Meghna Sakore Bordikar Suresh Bhumare Suresh Warpudkar - सुरेश वरपुडकर