हनुमानराव बागल सरपंच उखळद

  • Home
  • India
  • Parbhani
  • हनुमानराव बागल सरपंच उखळद

हनुमानराव बागल सरपंच उखळद सरपंच

31/10/2024
23/10/2024

*आम्ही सर्व लाडक्या बहिणी मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या मागे ठामपणे उभे आहोत..!!*

शिवसेनेचे खासदार आणि लोकसभेतील गटनेते डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण राज्यभरातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी जनसंवाद दौरा सुरु आहे. या दौऱ्यादरम्यान मागील आठवड्यात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा परभणी येथे जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मेळावा संपल्यानंतर काही महिला - भगिनींनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन परभणी येथील संभाजी नगर परिसरातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असल्याचे त्यांना कळविले. तर या रस्त्यावर अनेकदा आमच्या कुटुंबियांचे अपघात देखील झाल्याचे सांगत रस्त्याचे काम करून देण्याची विनंती केली.

याची तातडीने दखल घेऊन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांना रस्त्याची पाहणी करण्याचे आदेश दिले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी देखील तातडीने दखल घेतली आणि अवघ्या एक दिवसाच्या कालावधीत रस्त्याच्या उभारणीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करत याबाबतचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर येथील स्थानिक भगिनी शोभा गायकवाड यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधून आभार मानले.

तर आम्ही सर्व लाडक्या बहिणी शिवसेनेच्या आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मागे ठामपणे उभे आहोत, असे मत ही व्यक्त केले.

Address

उखळद परभणी
Parbhani
४३१४०१

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हनुमानराव बागल सरपंच उखळद posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share