19/08/2021
*कार्याची दखल घेऊन रितेश जैन च्या घरी आलो* ना. डॉ भागवत कराड, केंद्रीय राज्यअर्थमंत्री
संघटनात्मक कार्यात ,कोविड काळात तुम्ही केलेल्या, शेतकरी ते ग्राहक भाजीपाला विक्री केंद्र, फिरती चारा छावणी, हजारो नागरिकांना धान्य मदत, व विशेष लसीकरण मध्ये तुमचे कार्य उल्लेखनीय आहे, ही माहिती घेऊन एक चांगला कार्यकर्ता म्हणून मी तुझ्या घरी चहा साठी आलो अशे उदगार आज सकाळी ठीक 9 वाजता, प्रभाग 5 मधील लोकमान्य नगर येथे नगरसेवक श्री रितेश जैन झांबड यांच्या निवास्थानी छोटे खाणी सत्कार प्रसंगी मंत्री महोदय बोलले, या वेळी प्रभागातील शेकडो नागरिक भर पावसात सुद्धा मंत्री महोदयांच्या स्वागता साठी आले होते, केंद्राच्या विविध योजने बद्दल त्यांनी माहिती दिली, तत्पूर्वी डॉ कराड साहेबांचे सौ राखी कांकरिया यांनी औक्षण केले, उषा ताई झांबड यांनी त्यांचे स्वागत केले, या प्रसंगी परभणी च्या व प्रभागातील समस्या बाबत रितेश जैन यांनी प्रास्ताविक केले व पवन अंबुरे यांनी आपल्या खाजदार निधी मधून मोठा निधी प्रभागा मध्ये द्यावा ही मागणी केली, निश्चित केंद्रा कडे मोठा विकास प्रस्ताव आपण द्यावा, कायद्यात बसणारा निधी आपणास अवश्य देऊ अशी ग्वाही कराड साहेबांनी दिली,
येत्या महानगर पालिका मध्ये जास्तीत जास्त भाजप नगरसेवक निवडून आले पाहिजे या साठि विशेष लक्ष देनार असल्याचे त्यांनी नमूद केले, व विशेष म्हणजे 2017 च्या परभणी महानगरपालिका निवडणुकी वेळी डॉ भागवत जी कराड हेच पक्षा कडून प्रभारी होते,
या छोटे खाणी कार्यक्रम प्रसंगी, आमदार मेघना दिदी बोर्डीकर, माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे, मनोज जी पांगरकर ,प्रवीण जी घुगे,महानगर जिल्ह्याध्यक्ष आनंदजी भरोसे, ग्रामीण जिल्ह्याध्यक्ष डॉ सुभाष कदम, प्रमोदजी वाकोडकर, संतोष राजूरकर, बाबासाहेब जामगे, अशोकजी डहाळे, डॉ मनोज पोरवाल, समीर जी दुधगावकर, संजय जी शेळके, विजय जी दराडे, विजय जी पेशकार, विश्वनाथ गव्हाणे ,अँटी कोरोना ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते,
या वेळी अँटी कोरोना ग्रुप ने कोविड काळात केलेल्या कार्याचे पण त्यांनी सर्व बाबी माहिती करून घेऊन कौतुक केले, रितेश संघटनात्मक कार्यात विशेष कार्य करा आपणास उज्वल भविष्य आहे, असे उदगार काढले या वेळी जमलेल्या शेकडो लोकांनी टाळ्यानी या गोष्टीचे स्वागत केले, या वेळी विविध संघटना, प्रभागातील नागरिकांनी भागवतजी कराड साहेबां