भारताचा कम्युनिस्ट पक्ष- मार्क्सवादी लेनिनवादी- लिबरेशन, महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Parbhani
  • भारताचा कम्युनिस्ट पक्ष- मार्क्सवादी लेनिनवादी- लिबरेशन, महाराष्ट्र

भारताचा कम्युनिस्ट पक्ष- मार्क्सवादी लेनिनवादी- लिबरेशन, महाराष्ट्र Communist Party of India (Marxist - Leninist) Liberation Maharashtra, CPIML-MAHARASHTRA

19/08/2026

विद्यार्थी-युवकांच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी आणि संघर्षाची नवी दिशा घडवण्यासाठी २४ ऑगस्ट रोजी मुंबईत GEN Z RISING!

AISA च्या ऑल इंडिया प्रेसिडेंट कॉ. नेहा बोरा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा!

२४ ऑगस्ट २०२६
ठिकाण- यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइंट, मुंबई

अनेकांच्या संघर्षातून मिळालेलं हे स्वातंत्र्य अधिक सुंदर, अधिक समान आणि अधिक न्याय्य बनवण्याची जबाबदारीही आपलीच.स्वातंत्...
15/08/2026

अनेकांच्या संघर्षातून मिळालेलं हे स्वातंत्र्य अधिक सुंदर, अधिक समान आणि अधिक न्याय्य बनवण्याची जबाबदारीही आपलीच.

स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳

‘चले जाव’च्या ऐतिहासिक घोषणेने स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देणाऱ्या ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त, भारताच्या स्वातंत्र्यासाठी...
08/08/2026

‘चले जाव’च्या ऐतिहासिक घोषणेने स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देणाऱ्या ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त, भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष, त्याग आणि बलिदान देणाऱ्या तमाम स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन!

याच शाईने लिहू उद्याच्या भारताचे भविष्य!आम्हाला रोखण्याचा प्रत्येक प्रयत्न उधळून लावू!झारखंडमध्ये AISAच्या राष्ट्रीय अध्...
07/08/2026

याच शाईने लिहू उद्याच्या भारताचे भविष्य!
आम्हाला रोखण्याचा प्रत्येक प्रयत्न उधळून लावू!

झारखंडमध्ये AISAच्या राष्ट्रीय अध्यक्षा कॉ. नेहा बोरा आणि इतर महिला आंदोलनकर्त्यांवर झालेली शाईफेक ही केवळ एका नेत्यावरील नव्हे, तर लोकशाही, विद्यार्थी चळवळ आणि महिलांच्या आवाजावरील भ्याड हल्ला आहे. RSSच्या गुंडशाहीचा आम्ही तीव्र निषेध करतो. दडपशाही, धमक्या आणि हिंसेने संघर्ष थांबणार नाही, तो अधिक तीव्र होईल!

कामगार वर्गाच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे, श्रमिक चळवळीला वैचारिक दिशा देणारे, अभ्यासू, लढाऊ आणि प्रेरणादायी ने...
03/08/2026

कामगार वर्गाच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे, श्रमिक चळवळीला वैचारिक दिशा देणारे, अभ्यासू, लढाऊ आणि प्रेरणादायी नेते कॉम्रेड अशोक मनोहर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित "श्रमनिर्देश दिन आणि अशोक स्मृती व्याख्यान" ३१ जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, कामगार चळवळीतील कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात कॉम्रेड अशोक मनोहर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली. त्यानंतर सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी "आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि उद्याचे जग" या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण, विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी व्याख्यान दिले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावासह भविष्यातील संधी, आव्हाने आणि समाजावर होणारे परिणाम याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित सर्व मान्यवर, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. कॉम्रेड अशोक मनोहर यांनी जपलेले श्रमिक चळवळीचे विचार, संघर्ष आणि सामाजिक बांधिलकी पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (माले) लिबरेशन, अहिल्यानगर जिल्हा यांच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्...
01/08/2026

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (माले) लिबरेशन, अहिल्यानगर जिल्हा यांच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर येथे त्यांच्या स्मृतीस क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले.

शोषित, वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित जनतेच्या वेदनांना आपल्या लेखणीतून शब्दबद्ध करणारे, संघर्षाला साहित्याची आणि साहित्याला संघर्षाची दिशा देणारे लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे परिवर्तनवादी चळवळीचे अजरामर प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या साहित्याने समाजातील अन्याय, विषमता, जातीय शोषण आणि आर्थिक दडपशाहीविरुद्ध जनतेच्या लढ्याला वैचारिक बळ दिले.

आजच्या काळातही समता, सामाजिक न्याय, बंधुता आणि शोषणमुक्त समाजव्यवस्थेचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी संघटित जनआंदोलन उभारणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा जपत अन्याय, भेदभाव आणि शोषणाविरुद्धचा संघर्ष अधिक व्यापक व तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

कॉम्रेड अण्णाभाऊ साठे अमर रहे!
इन्कलाब जिंदाबाद!

लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे शोषितांच्या संघर्षाचा इतिहास आणि समतेच्या समाजाचे स्वप्न. त्यांच्या लेखण...
31/07/2026

लोकशाहीर कॉ. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे शोषितांच्या संघर्षाचा इतिहास आणि समतेच्या समाजाचे स्वप्न. त्यांच्या लेखणीतून उभा राहिलेला लढाऊ विचार आजही सामाजिक, सांस्कृतिक आणि कामगार चळवळींना दिशा देत आहे.

त्यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिकारी अभिवादन!

लाल निशाण पक्षाचे सरचिटणीस, कामगार वर्गाचे लढाऊ व अभ्यासू नेते, कामगार वर्गाला विचारांच्या भक्कम पायावर उभे करणारे उत्कृ...
31/07/2026

लाल निशाण पक्षाचे सरचिटणीस, कामगार वर्गाचे लढाऊ व अभ्यासू नेते, कामगार वर्गाला विचारांच्या भक्कम पायावर उभे करणारे उत्कृष्ट शिक्षक आणि भाकप (माले) लिबरेशन व लाल निशाण पक्ष यांच्यात वैचारिक ऐक्याचा सेतू उभारणारे कॉम्रेड अशोक मनोहर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली व क्रांतिकारी लाल सलाम!

अखेर कॉ. सबा, कॉ. दीपांकर, कॉ. दिव्यम आणि कॉ. आनंद यांचीही बेऊर कारागृहातून सुटका झाली! प्रशासकीय विलंबामुळे या सहकाऱ्या...
30/07/2026

अखेर कॉ. सबा, कॉ. दीपांकर, कॉ. दिव्यम आणि कॉ. आनंद यांचीही बेऊर कारागृहातून सुटका झाली! प्रशासकीय विलंबामुळे या सहकाऱ्यांना एक अतिरिक्त रात्र तुरुंगात घालवावी लागली. सुटकेनंतर भाकप (माले) लिबरेशनच्या बिहार राज्य कार्यालयात त्यांचे उत्साहपूर्ण आणि उबदार स्वागत करण्यात आले.

Address

Parbhani
Parbhani

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भारताचा कम्युनिस्ट पक्ष- मार्क्सवादी लेनिनवादी- लिबरेशन, महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share