Diliprao Bankar - दिलीपराव बनकर

Diliprao Bankar - दिलीपराव बनकर आमदार, निफाड विधानसभा मतदार संघ (नाशिक)
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत (नाशिक)

थोर शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभि...
05/09/2026

थोर शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! 🌸

"ज्ञानाचा दीप तेवत ठेवणारे, शिक्षणाला संस्कारांची जोड देणारे, भविष्य घडविणारे प्रत्येक शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत."

शिक्षकांनी दिलेले ज्ञान, संस्कार आणि प्रेरणा हीच विद्यार्थ्यांच्या यशाची खरी पायाभरणी असते.

शिक्षक दिनानिमित्त सर्व गुरुजन, शिक्षक-शिक्षिका व शिक्षण क्षेत्रातील सर्व मान्यवरांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

💐 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

आज ओझर परिसरातील एअर फोर्स कॉर्नर, १०वा मैल व ९वा मैल (DRDO) परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामांमुळे निर्माण झाले...
03/09/2026

आज ओझर परिसरातील एअर फोर्स कॉर्नर, १०वा मैल व ९वा मैल (DRDO) परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला.

उड्डाणपुलाच्या कामांमुळे परिसरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी, नागरिकांचा प्रवासाचा वाढलेला वेळ, वाहनांचे होणारे नुकसान, अतिरिक्त इंधन खर्च, तसेच HAL मधील अधिकारी-कर्मचारी यांना वेळेवर ड्युटीवर पोहोचण्यासाठी होणारा त्रास अशा विविध समस्यांबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर आज संबंधित यंत्रणांसमवेत सविस्तर चर्चा करून तातडीने उपाययोजनांचे निर्देश देण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी श्री. शशांक आडके, ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्ग वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक गंधास मॅडम, संबंधित ठेकेदार, ओझर परिसरातील नागरिक तसेच HAL चे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी पुढील महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या –
▪️ उड्डाणपुलावरील प्रलंबित काम तातडीने पूर्ण करून पुढील दोन दिवसांत पुलावरील वाहतूक सुरळीत सुरू करावी.
▪️ ९वा मैल व १०वा मैल परिसरातील वाहतुकीचे प्रभावी नियोजन करून कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
▪️ वाहतूक सुरळीत राहण्यासाठी महत्त्वाच्या चौकांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.
▪️ नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी कामाचा वेग वाढवून समन्वयाने कार्यवाही करावी.

सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच HAL मधील हजारो कर्मचारी यांना दररोज होणारा त्रास कमी करणे हेच आमचे प्राधान्य आहे. संबंधित विभागांनी दिलेल्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करून वाहतूक पूर्ववत करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

🎉 माझे सहकारी श्री. कैलास शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂आपल्याला वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य...
03/09/2026

🎉 माझे सहकारी श्री. कैलास शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂

आपल्याला वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि निरंतर यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने, उत्साहाने आणि यशाने उजळून निघो. समाजसेवेच्या कार्यात आपणास अधिकाधिक यश मिळत राहो व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, ही सदिच्छा!

वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌹💐

माहे ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे शेतीपिके व द्राक्षबागांचे नुकसान झालेल्या १७,४३१ शेतकऱ्यांसाठी सुमारे...
01/09/2026

माहे ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे शेतीपिके व द्राक्षबागांचे नुकसान झालेल्या १७,४३१ शेतकऱ्यांसाठी सुमारे ₹२५.५३ कोटींची मदत शासनाने जाहीर केली आहे.

निफाड तालुक्यातील उर्वरित ७ महसूल मंडळांतील बाधित शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असून, शासनाच्या पोर्टलवर माहिती अपलोड करून केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

या प्रश्नावर मी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री तसेच संबंधित विभागांकडे वारंवार मागणी करून द्राक्ष उत्पादकांसह सर्व बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याचा आनंद आहे.

ही मदत जाहीर करून निफाड तालुक्यातील शेतकरी बांधवांना दिलासा दिल्याबद्दल राज्य शासनाचे, मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, मा. कृषी मंत्री दत्ता मामा भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील तसेच संबंधित सर्व अधिकारी व विभागांचे निफाड तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

31/08/2026
🌿🕉️ तिसरा श्रावण सोमवार🌙🐘 संकष्टी चतुर्थीया पवित्र आणि मंगलमय योगानिमित्तसर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा!भगवान महाद...
31/08/2026

🌿🕉️ तिसरा श्रावण सोमवार
🌙🐘 संकष्टी चतुर्थी
या पवित्र आणि मंगलमय योगानिमित्त
सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

भगवान महादेव आणि श्री गणराय यांच्या कृपेने
आपल्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, यश आणि आनंद नांदो.
सर्व संकटांचे निवारण होऊन प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होवोत, हीच प्रार्थना.

तिसरा श्रावण सोमवार व संकष्टी चतुर्थीच्या सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा! 🙏

29/08/2026
।। शिक्षण आणि कृषी विकासाचा नवा टप्पा ।।मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित 'कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाव...
28/08/2026

।। शिक्षण आणि कृषी विकासाचा नवा टप्पा ।।

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित 'कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय', चाचडगाव (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील नूतन इमारत उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आज प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा योग आला.

हा भव्य उद्घाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते आणि नाशिकचे पालकमंत्री तथा महाकुंभमेळा मंत्री मा. ना. श्री. गिरीषजी महाजन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. ना. श्री. छगनराव भुजबळ साहेब, शालेय शिक्षणमंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे साहेब, अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. ना. श्री. नरहरी झिरवाळ साहेब या सर्व प्रमुख मंत्र्यांची व मान्यवरांची गरिमामयी उपस्थिती लाभली.

निसर्गरम्य परिसरात उभारण्यात आलेली ही अत्याधुनिक वास्तू ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची उत्तम दारे खुली करून देईल. आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीचा मेळ घालत आपले तरुण शेतकरी व विद्यार्थी भविष्यात कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडवतील, असा विश्वास या निमित्ताने मान्यवरांनी व्यक्त केला.

या भव्य वास्तूच्या उभारणीबद्दल मविप्र संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग आणि सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

#मविप्र #कृषीमहाविद्यालय #दिंडोरी #नाशिक #उद्घाटनसोहळा

🎀 "राखीचा हा धागा... फक्त मनगटावर नाही, तर आयुष्यभर हृदयात जपलेलं नातं!" 🤝रक्षाबंधन हा केवळ सण नसून, प्रेम, विश्वास, आपु...
27/08/2026

🎀 "राखीचा हा धागा... फक्त मनगटावर नाही, तर आयुष्यभर हृदयात जपलेलं नातं!" 🤝

रक्षाबंधन हा केवळ सण नसून, प्रेम, विश्वास, आपुलकी, संरक्षण आणि नात्यांच्या अटूट बंधाचा पवित्र उत्सव आहे.

भाऊ–बहिणीच्या या अमूल्य नात्यातील स्नेह, जिव्हाळा आणि परस्परांचा विश्वास सदैव दृढ राहो. आपल्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशाची अखंड भरभराट होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

रक्षाबंधनाच्या सर्व बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा..! 🌸

Address

Shivaji Nagar
Pimpalgaon Baswant
422209

Alerts

Be the first to know and let us send you an email when Diliprao Bankar - दिलीपराव बनकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Diliprao Bankar - दिलीपराव बनकर:

Shortcuts

Share