20/06/2026
📍भाजप मध्यवर्ती कार्यालय, मोरवाडी
वैद्यकीय,अभियांत्रिकी,वक्तृत्व प्रकोष्ठ,ओबीसी मोर्चा आणि दिव्यांग सेलच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पदे बहाल; संघटना बळकटीकरणाचा निर्धार!
आमदार श्री शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाने आणि भाजप शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी- चिंचवड भाजपच्या विविध आघाड्यांचा 'कार्यकारिणी नियुक्ती प्रदान समारंभ' उत्साहात संपन्न!
आज शनिवार, दिनांक २० जून २०२६ रोजी मोरवाडी, पिंपरी येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या विविध महत्वाच्या आघाड्या आणि प्रकोष्ठांचा 'कार्यकारिणी नियुक्ती प्रदान समारंभ' अत्यंत उत्साहात पार पडला.
या भव्य सोहळ्याचे अध्यक्षस्थान आमदार श्री शंकरशेठ जगताप आणि भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांनी भूषवले. त्यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्ती पत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत प्रामुख्याने वैद्यकीय प्रकोष्ठ, अभियांत्रिकी प्रकोष्ठ,ओबीसी मोर्चा, वक्तृत्व प्रकोष्ठ आणि दिव्यांग सेल या आघाड्यांच्या नवनियुक्त शहर व वॉर्ड पातळीवरील पदाधिकाऱ्यांची घोषणा करून त्यांना जबाबदारी सुपूर्द करण्यात आली.
"प्रत्येक घटकापर्यंत पक्षाचे कार्य पोहोचवा" - श्री शत्रुघ्न काटे👇
याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शहराध्यक्ष श्री.शत्रुघ्न (बापु) काटे म्हणाले की,"भाजप हा सर्वसमावेशक आणि कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा पक्ष आहे. आज नियुक्ती झालेल्या सर्व प्रकोष्ठांमध्ये आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा समावेश आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि सामाजिक क्षेत्रातील या नवनियुक्त शिलेदारांच्या माध्यमातून भाजपची विचारधारा आणि केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना पिंपरी-चिंचवडमधील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. आगामी काळात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे."
या प्रसंगी श्री.चेतन भुजबळ (अध्यक्ष,ओबीसी मोर्चा), डॉ.श्री अमित नेमाने (अध्यक्ष, वैद्यकीय प्रकोष्ठ),श्री.संतोष भालेराव (अध्यक्ष,अभियंता प्रकोष्ठ),श्री.हरीश आप्पा मोरे (संयोजक, वक्तृत्व प्रशिक्षण प्रकोष्ठ) आणि श्री.अंकुश शिर्के (अध्यक्ष, दिव्यांग सेल) या सेलच्या अध्यक्ष्यांना आमदार श्री शंकरशेठ जगताप आणि भाजप शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला संगठन सरचिटणीस श्री मोरेश्वरभाऊ शेडगे,सरचिटणीस श्री मधुकरभाऊ बच्चे, सरचिटणीस सौ.वैशालीताई खाडये, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री संजयभाऊ पटनी,युवा मोर्चा अध्यक्ष श्री दिनेशभाऊ यादव, श्री अनुपदादा मोरे,श्री राजूभाऊ दुर्गे,भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते,आजी- माजी नगरसेवक,विविध आघाड्यांचे प्रमुख,मंडल अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#संघटनबळकटीकरण #पिंपरीचिंचवडभाजप #शत्रुघ्नकाटे #भाजपकार्यकारिणी #मिशन२०२६
#भाजपपिंपरीचिंचवड #नियुक्तीसमारंभ #ओबीसीमोर्चा #वैद्यकीयप्रकोष्ठ #अभियांत्रिकीप्रकोष्ठ #दिव्यांगसेल #वक्तृत्वप्रकोष्ठ #पिंपरी #मोरवाडी #कामबोलते Ravindra Chavan