Chetan Mahadev Pawar - चेतन महादेव पवार

  • Home
  • India
  • Pimpri
  • Chetan Mahadev Pawar - चेतन महादेव पवार

Chetan Mahadev Pawar - चेतन महादेव पवार शहरप्रमुख - शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
पिंपरी चिंचवड शहर

🧘‍♂️✨‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ निमित्त सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
21/06/2026

🧘‍♂️✨
‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ निमित्त सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

📢 आवाज कुणाचा? शिवसेनेचा! पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्कासाठी - ‘जागर मोर्चा’! 🔥पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचा...
20/06/2026

📢 आवाज कुणाचा? शिवसेनेचा! पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्कासाठी - ‘जागर मोर्चा’! 🔥
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार, खाजगीकरणाचा डाव आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष रस्त्यावर!
🎯 आमचे मुख्य ८ प्रश्न आणि मागण्या:
१) पुनावळे शाळा आरक्षण: पुनावळे येथील सर्वे नं. ३८ व ४४ मधील शाळेचे आरक्षण खाजगी संस्थेला देण्यास आमचा तीव्र विरोध आहे!
२) खाजगीकरणाला चाप: पिंपरी-चिंचवडमधील महानगरपालिकेची आरक्षणे खाजगी संस्थांच्या घशात घालणे बंद करा!
३) शालेय साहित्य घोटाळा: मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य वाटपातील घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे!
४) पवना माईची दुरवस्था: शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना नदीची झालेली दुरवस्था थांबवा, प्रशासकीय दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही!
५) ताथवडे कचरा डेपोला विरोध: ताथवडे येथे केवळ राडारोडा टाकण्याच्या नावाखाली सर्रास कचरा टाकून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणे थांबवा!
६) नालेसफाईची मागणी: पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व लहान-मोठ्या नाल्यांची तात्काळ आणि योग्य साफसफाई झालीच पाहिजे!
७) दापोडीत खेळाचे मैदान: दापोडी येथील सर्वे नंबर १६ व १७ मधील आरक्षित जागेवर मुलांसाठी ‘खेळाचे मैदान’ (Playing Ground) झालेच पाहिजे!
८) ताथवडे जिल्हा परिषद शाळा: या शाळेचा समावेश तातडीने महानगरपालिकेत केला गेलाच पाहिजे!
✊ “अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, भ्रष्ट कारभाराला जागा दाखवण्यासाठी... चलो चिंचवड!”
नेतृत्व व आयोजक:
👤 श्री. चेतन महादेव पवार
(शहरप्रमुख, पिंपरी चिंचवड शहर - शिवसेना ऊबाठा)

🚩 शिवसेना वर्धापन दिन! 🚩वसा महाराष्ट्र हिताचा, ध्यास समृद्ध महाराष्ट्राचा...मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी आणि महाराष्ट...
19/06/2026

🚩 शिवसेना वर्धापन दिन! 🚩
वसा महाराष्ट्र हिताचा, ध्यास समृद्ध महाराष्ट्राचा...
मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी सदैव लढणाऱ्या ‘शिवसेना’ पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत, एकनिष्ठ शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रप्रेमींना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
बाळासाहेबांचे विचार, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचे खंबीर नेतृत्व आणि युवा नेते आदित्यजी ठाकरे यांच्या साथीने महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि स्वाभिमानाचा हा भगवा लढा असाच अविरत पुढे सुरू राहील!
जय महाराष्ट्र! 🏹🚩
#शिवसेना #वर्धापनदिन #शिवसेना_वर्धापनदिन

18/06/2026

📢 भ्रष्टाचार बंद करा, जनतेला न्याय द्या! ✊🔥
शिवसेनेच्या धडाकेबाज ‘जागर मोर्चाने’ वेधलं संपूर्ण शहराचं लक्ष! जनतेच्या हक्कासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेचा (ऊबाठा)आवाज आता आणखी बुलंद झाला

Address

Pimpri
411033

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chetan Mahadev Pawar - चेतन महादेव पवार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share