BJYM Pimpri Chinchwad

BJYM Pimpri Chinchwad अधिकृत खाते-:
🪷भारतीय जनता युवा मोर्चा,पिंपरी चिंचवड शहर🪷
OFFICIAL ACCOUNT OF-:
🪷BJYM PIMPRI CHINCHWAD 🪷

युवा मोर्चातील सहकारी श्री. पांडुरंग राजे(चिटणीस, भाजपा युवा मोर्चा, पिंपरी चिंचवड शहर )आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभे...
09/07/2026

युवा मोर्चातील सहकारी श्री. पांडुरंग राजे
(चिटणीस, भाजपा युवा मोर्चा, पिंपरी चिंचवड शहर )
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

Panduurang Vishwanath Raje

मोशी कचरा डेपो परिसरात मोठी दुर्घटना; कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळला, सुमारे २० जण अडकल्याची प्राथमिक माहितीपिंपरी-चिंच...
08/07/2026

मोशी कचरा डेपो परिसरात मोठी दुर्घटना; कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळला, सुमारे २० जण अडकल्याची प्राथमिक माहिती
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोशी कचरा डेपो परिसरात आज दुपारी सुमारे १:३० वाजण्याच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून जवळील तीन मजली इमारतीवर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत सुमारे २० नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस तसेच इतर बचाव यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

बचाव पथकाने आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ४ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले असून, त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उर्वरित अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी जेसीबी, पोकलेन आणि अन्य आवश्यक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने बचाव मोहीम सुरू आहे.

दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच अडकलेल्या नागरिकांची अचूक संख्या आणि दुर्घटनेतील नुकसानीचा तपशील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची प्रतीक्षा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पिंपरी चिंचवड - Pimpri Chinchwad City BJP Pimpri Chinchwad

#मोठीदुर्घटना

भाजपा पिंपरी चिंचवड तर्फे 'बुद्धजीवी संमेलन' संपन्न: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाचा गौर...
06/07/2026

भाजपा पिंपरी चिंचवड तर्फे 'बुद्धजीवी संमेलन' संपन्न: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाचा गौरव
​देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक १२ वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त, भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने चिंचवड येथील 'सायन्स पार्क' येथे एका भव्य 'बुद्धजीवी संमेलनाचे' आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि देशाच्या सर्वांगीण विकासावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

​या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस ऍड. वर्षाताई डहाळे उपस्थित होत्या.

कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या १२ वर्षांतील कार्यकाळाचा आढावा घेताना, भारताने जागतिक स्तरावर मिळवलेल्या मानाच्या स्थानाबद्दल चर्चा करण्यात आली,गरिबांचे सक्षमीकरण, पायाभूत सुविधांचा विकास, 'डिजिटल इंडिया' आणि आत्मनिर्भर भारत यांसारख्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांमुळे देशातील सर्वसामान्यांच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल यावर प्रमुख वक्त्यांनी प्रकाश टाकला,समाजातील विचारवंत, तज्ज्ञ आणि बुद्धजीवी वर्गाला केंद्र सरकारच्या धोरणांची सखोल माहिती व्हावी आणि त्यांनी ही माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता,शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मोदीजींच्या दूरदृष्टीमुळे पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण देश प्रगतीपथावर आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी या विकासकामांचे पाईक बनून विकासाची ही गंगा तळागाळापर्यंत पोहोचवावी.

​​या संमेलनाचे नेटके नियोजन व संयोजन भाजपा पिंपरी- चिंचवड सरचिटणीस सौ. वैशालीताई खाडये आणि सह-संयोजक वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. संजयभाऊ पटनी, युवा मोर्चा प्रदेश सचिव श्री. अजित कुलथे, युवा मोर्चा,शहराध्यक्ष श्री. दिनेश यादव यांनी अत्यंत चोखपणे केले.

​याप्रसंगी आमदार सौ. उमाताई खापरे,मा.आमदार अश्विनीताई जगताप,सरचिटणीस मधुकरभाऊ बच्चे,सरचिटणीस वैशाली खाडे,विकासदादा डोळस,श्री सदाशिवराव खाडे,नगरसेविका अनुराधाताई गोरखे,सत्तारूढ पक्षनेते श्री प्रशांतदादा शितोळे,महिला मोर्चा अध्यक्षा सौ सुजाताताई पालांडे,श्री राजेश आण्णा पिल्ले,श्री राजूभाऊ दुर्गे,,कोषाध्यक्ष श्री राजाभाऊ मासळकर, तसेच भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी,माजी नगरसेवक,विविध आघाड्यांचे अध्यक्ष,शहर कार्यकारिणी सदस्य आणि पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो नामांकित बुद्धीजीवी नागरिक,कायदेतज्ज्ञ,डॉक्टर आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.पिंपरी चिंचवड शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, बुद्धजीवी नागरिक, भाजपाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात मोदी सरकारच्या विकासकामांबद्दलचा उत्साह दिसून येत होता.
​हे संमेलन केवळ एका कार्यकाळाचा गौरव नव्हते, तर आगामी काळातील विकासाच्या वाटचालीस अधिक बळकट करणारा एक महत्त्वाचा संवाद ठरला..

BJP Maharashtra BJYM Maharashtra BJP Pimpri Chinchwad Ravindra Chavan Krish Mahadik Shatrughna Kate Ajiit Arun Kulthe Dinesh Yadav - दिनेश लालचंद यादव

भारतीय जनता पार्टी,महिला मोर्चा, पिंपरी चिंचवड शहर शहराध्यक्षा आदरणीय सौ. सुजाता ताई पलांडे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर...
03/07/2026

भारतीय जनता पार्टी,महिला मोर्चा, पिंपरी चिंचवड शहर शहराध्यक्षा आदरणीय सौ. सुजाता ताई पलांडे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐

आपल्या कुशल नेतृत्वातून, संघटन कौशल्यातून आणि समाजसेवेच्या अखंड ध्यासातून आपण महिला सक्षमीकरणासह पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी मोलाचे योगदान देत आहात.
ईश्वरचरणी प्रार्थना की, आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी भरभरून यश लाभो.

Sujata Palande BJP Pimpri Chinchwad

युवा मोर्चातील सहकारी नगरसेवक तथा सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा,पिंपरी चिंचवड शहर श्री उदय जी गायकवाड आपणास वाढदिवसाच्या मन...
02/07/2026

युवा मोर्चातील सहकारी नगरसेवक तथा सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा,पिंपरी चिंचवड शहर श्री उदय जी गायकवाड आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐

Uday Gaikwad

भाजपा युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आली एकदिवसीय सहल..​भाजपा युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड...
01/07/2026

भाजपा युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आली एकदिवसीय सहल..

​भाजपा युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष श्री.दिनेशजी यादव यांच्या पुढाकाराने, संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांसाठी एका एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पदाधिकाऱ्यांमधील संवाद वाढवणे आणि त्यांना दैनंदिन कामाच्या व्यापातून काही काळ निवांत वेळ मिळवून देणे हा होता.

​या सहलीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. निसर्गरम्य वातावरणात आयोजित केलेल्या या सहलीत विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि खेळ खेळण्यात आले, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकोपा आणि उत्साह दिसून आला.

​ही सहल केवळ एक सहल नसून ती भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठी तसेच भविष्यातील कार्यासाठी ऊर्जा देणारी एक महत्त्वाची कृती ठरली आहे.

Ravindra Chavan Krish Mahadik BJP Maharashtra BJYM Maharashtra BJP Pimpri Chinchwad Ajiit Arun Kulthe Dinesh Yadav - दिनेश लालचंद यादव

युवा मोर्चातील सहकारी श्री. दयानंद बंडगर (उपाध्यक्ष - भाजपा युवा मोर्चा, पिंपरी चिंचवड शहर) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक...
28/06/2026

युवा मोर्चातील सहकारी श्री. दयानंद बंडगर
(उपाध्यक्ष - भाजपा युवा मोर्चा, पिंपरी चिंचवड शहर) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐

दयानंद बंडगर

संविधान हत्या दिनानिमित्त युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने व्याख्यान कार्यक्रम संपन्नदिघी : भारतीय जनता युवा मोर...
25/06/2026

संविधान हत्या दिनानिमित्त युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने व्याख्यान कार्यक्रम संपन्न

दिघी : भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने ‘संविधान हत्या दिन’ (आणीबाणी) निमित्त गुरुवार दिनांक २५ जून २०२६ रोजी रामचंद्र गायकवाड विद्यालय ज्युनिअर कॉलेज, दिघी येथे व्याख्यान कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

२५ जून १९७५ रोजी देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला ५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाही मूल्यांचे महत्त्व, आणीबाणीच्या काळातील परिस्थिती तसेच संविधानाच्या संरक्षणाची गरज याविषयी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रसिद्ध शिवव्याख्याते श्री शुभम खेडेकर यांनी आणीबाणीच्या काळातील घटनांचा आढावा घेत लोकशाही आणि संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापू) काटे, आणीबाणीचे ५१ वे वर्ष पिंपरी चिंचवड जिल्हा संयोजक ॲड. मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे, भाजपा शहर सरचिटणीस श्री विकास हरिश्चंद्र डोळस, संजय पटनी मंडल अध्यक्ष श्री प्रमोद परदेशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सहसंयोजक श्री दिनेश लालचंद यादव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच श्री उदयराव दत्तात्रय गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

BJP Maharashtra BJYM Maharashtra BJP Pimpri Chinchwad Ravindra Chavan Krish Mahadik Shatrughna Kate Mahesh Landge Shankar Jagtap Amit Gorkhe-अमित गोरखे Uma Khapre - उमा खापरे Ajiit Arun Kulthe Uday Gaikwad Dinesh Yadav - दिनेश लालचंद यादव

#आणीबाणीदिवस #काळादिवस

२५ जून १९७५ हा भारताच्या इतिहासातील एक असा काळा दिवस आहे, ज्या दिवशी तत्कालीन काँग्रेस सरकारने देशावर आणीबाणी लादली होती...
25/06/2026

२५ जून १९७५ हा भारताच्या इतिहासातील एक असा काळा दिवस आहे, ज्या दिवशी तत्कालीन काँग्रेस सरकारने देशावर आणीबाणी लादली होती. या घटनेला आज ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर, भारताची लोकशाही संपविणाऱ्या आणि संविधानाचा घोर अपमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा हा काळा इतिहास आजच्या तरुण पिढीपर्यंत आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले.
​आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ज्या थोर नेत्यांनी आणि नागरिकांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगला, अतोनात छळ सहन केला, तरीही हुकूमशाहीविरुद्ध लढा देऊन देशात पुन्हा लोकशाही प्रस्थापित केली, अशा सर्व लोकशाही सैनिकांना याप्रसंगी कृतज्ञतापूर्वक नमन करण्यात आले.
​यावेळी उपस्थित सर्व युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत एक सामूहिक प्रतिज्ञा केली.
​"भविष्यात जर कोणीही भारताची लोकशाही संपविण्याचा किंवा संविधानाचा अवमान करण्याचा प्रयत्न केला, तर देशातील युवा शक्ती त्याविरोधात तीव्र संघर्ष करेल आणि लोकशाहीचे रक्षण करेल!"

​या आंदोलनात भाजपा शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे, संघटन सरचिटणीस श्री. मोरेश्वर शेडगे, युवा मोर्चा प्रदेश सचिव श्री. अजित कुलथे, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री. दिनेश यादव व सर्व युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'भारत माता की जय', 'संविधान अमर राहो' आणि 'लोकशाहीचे रक्षण हीच आमची प्रतिज्ञा' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

BJP Maharashtra BJYM Maharashtra Ravindra Chavan Krish Mahadik Shatrughna Kate Ajiit Arun Kulthe Dinesh Yadav - दिनेश लालचंद यादव

#आणीबाणी #काळादिवस #निषेध

Address

BJP Party Office, Morwadi
Pimpri
4110118

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJYM Pimpri Chinchwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share