Yogesh ahire

Yogesh ahire Always blood doner (AB+)., AKHIL BHARTIY VIDYARTHI PARISHAD MAHARASHTRA (Nandurbar)

16/06/2022

लहान पनी ची आठवण करवून देणारा video

NssNandurbar
19/05/2022

NssNandurbar

बाजीप्रभू देशपांडे, कोंडाजी फर्जंद, शभुसिंग जाधव, रायाजीराव यांचा रक्ताने पावन झालेला ऐतिहासिक किल्ला म्हणजे पन्हाळा,आणि...
02/05/2022

बाजीप्रभू देशपांडे, कोंडाजी फर्जंद, शभुसिंग जाधव, रायाजीराव यांचा रक्ताने पावन झालेला ऐतिहासिक किल्ला म्हणजे पन्हाळा,आणि तेथील गंगा ,जमुना ,सरस्वती धान्यसाठण्याचे कोठार ,भूल भुलैय्या विहीर,पश्चिम ,कोकण दरवाजे पावनखिंड ची वाट अजून खूप काही..यात सर्वात महत्वाचे म्हणजे त्या पावन भूमीवर जाण्याचे सौभाग्य मला लाभले..

संत शिरोमणी श्री. ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आळंदी व प्रति तिरुपती बालाजी मंदिर केतकवळा येथे दर्शन घेतले.     ...
29/04/2022

संत शिरोमणी श्री. ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आळंदी व प्रति तिरुपती बालाजी मंदिर केतकवळा येथे दर्शन घेतले.

शैक्षणिक सहल निमित्त आज साडेतीन शक्तिपीठांपैकी एक कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आई अंबाबाईचे दर्शन लाभले ।।उदे ग अंबे...
24/04/2022

शैक्षणिक सहल निमित्त आज साडेतीन शक्तिपीठांपैकी एक कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आई अंबाबाईचे दर्शन लाभले
।।उदे ग अंबे उदे।।

इतिहासाची साक्ष देणारा हा भुईकोट किल्ला खऱ्या अर्थाने पानिपत युद्धाची रंगीत तालीम किंवा युद्धच येथून सुरू झाले असे म्हणण...
11/04/2022

इतिहासाची साक्ष देणारा हा भुईकोट किल्ला खऱ्या अर्थाने पानिपत युद्धाची रंगीत तालीम किंवा युद्धच येथून सुरू झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या विद्यार्थिनी वसतिगृहा संदर्भात आज कबचौ उमवी विज्ञान विभाग अधिष्ठाता व पू.सा.गु...
01/04/2022

पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या विद्यार्थिनी वसतिगृहा संदर्भात आज कबचौ उमवी विज्ञान विभाग अधिष्ठाता व पू.सा.गु.वी.प्र मंडळाचे प्राचार्य डॉ आर.एस पाटील यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात प्रामुख्याने स्वच्छता आणि सुव्यवस्थेच्या एकूण १० मुद्द्यांवर विस्तृत चर्चा अभाविप च्या शिष्ट मंडळाने केली व एकूणच विद्यार्थनीच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आवहान देखील केले आहे. यावेळी अभाविप महाविद्यालय कार्यकारणी उपस्थित होती.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सात दशकांची ऐतिहासिक जीवनगाथा असलेल्या "ध्येय यात्रा" या पुस्तकाची प्रकाशनपूर्व शहादा-...
22/03/2022

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सात दशकांची ऐतिहासिक जीवनगाथा असलेल्या "ध्येय यात्रा" या पुस्तकाची प्रकाशनपूर्व शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेशजी पाडवी,डॉ.लक्ष्मण सोनार, डॉ.विजय शर्मा सर, व अजयजी शर्मा यांची नोंदणी करण्यात आली..

*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शहादा*  शाखेतर्फे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ  चे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्य...
07/03/2022

*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शहादा* शाखेतर्फे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ चे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मध्ये राज्यसरकारने केलेल्या बदलाच्या निषेधार्थ स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले,यावेळी कलामंच प्रमुख रोशन पाटील ,प्रीती काकुरडे, रक्षा कपडी,निशा शिंदे ,रुपाली रावल व जिल्हा सहसंयोजक योगेश अहिरे ..इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

आज २ मार्च ....आजच्या दिवसाबद्दल समस्त नंदुरबार जिल्ह्यातील तसेच तमाम महाराष्ट्रातील जनतेला माहिती असलेली किंवा बरेच जणा...
02/03/2022

आज २ मार्च ....आजच्या दिवसाबद्दल समस्त नंदुरबार जिल्ह्यातील तसेच तमाम महाराष्ट्रातील जनतेला माहिती असलेली किंवा बरेच जणांना माहितीच नसलेली घटना म्हणजे महाराष्ट्रात घडलेली जालियनवाला बाग हत्याकांडा सारखे रावलापाणी येथील आदिवासी बांधवांचे हत्याकांड...

आजच्याच दिवशी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात रावलापाणी येथे इंग्रजांनी 2 मार्च 1943 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड याची पुनरावृत्ती केली होती. या घटनेत आपल्या आदिवासी बांधवातील जवळपास पंधरा ते वीस लोक शहीद आणि अनेक जण गंभीर जखमी झाले होते.

कविवर्य कुसुमाग्रज यांनी त्यांच्या एका कवितेत मराठी वीरांची ऐतिहासिक घटना सांगताना लिहून ठेवले होते की,
" दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा,
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा "
अशीच काहीशी भावना या स्वातंत्र्यवीरांच्या पवित्र स्मारकास भेट देऊन मनात येत होती.

रावलापाणी हे ठिकाण तळोदा शहरापासून साधारण पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे. येथे येण्यासाठी तळोदा- सावर- हातबारी -व -रावलापाणी असा प्रवास करावा लागतो.

1943 साली 'चलेजाव चळवळीने' इंग्रज राजवटीला जेरीस आणले होते. याच चलेजाव चळवळी मध्ये खानदेशातील आदिवासी बांधवांनी मोलाचे योगदान दिले आहे. चलेजाव चळवळीत सक्रिय योगदानासाठी 'आप धर्माचे' प्रमुख 'संत रामदास महाराज' यांनी जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना 4 मार्च 1943 रोजी महाशिवरात्रीला आरती व पूजनाच्या कार्यक्रमाला हजर राहून चळवळीस पाठिंबा देण्याचे व सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
महाशिवरात्रीच्या या कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी मार्गक्रमण करीत असताना 2 मार्च 1943 रोजी हजारो आदिवासी बांधव निझरा नदीपात्रात जमले होते. चलेजाव चळवळीतील जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा हा सक्रिय सहभाग पाहता, ब्रिटिश सरकारने 02 मार्च 1943 रोजी रावलापाणी जवळील निझरा नदी पात्रात जमलेल्या हजारो आदिवासी बांधवांवर अमानुष पद्धतीने गोळीबार केला. यात जवळपास पंधरा ते वीस आदिवासी बांधव मृत्युमुखी पडले तर अनेक जण गंभीर जखमी झाले.

गोळीबार होणार याची पूर्वकल्पना संत रामदास महाराज यांनी सर्व भक्तजनांना दिली होती. तरीही आप धर्माच्या अनुयायांनी न डगमगता, न घाबरता पुढे निघाल्याची नोंद आहे. या संदर्भात तळोदा पोलीस ठाण्यात नोंदही आहे. या अमानुष गोळीबाराची साक्ष म्हणून रावलापाणी येथील निझरा नदीपात्रातील दगडावर असलेल्या गोळीबाराच्या खुणा येथील समाज बांधवांनी आजही जतन करून ठेवल्या आहेत. येथील वातावरणात आजही एक प्रकारचे देशप्रेम, स्वातंत्र्या बद्दलची ओढ, भक्ती आणि त्याच सोबत निडरता आजही ठासून भरल्याच

अभाविप 56 वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन हुतात्मा बाल स्वातंत्र्य सैनिक शिरीष कुमार नागरी नंदुरबार
11/02/2022

अभाविप 56 वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन हुतात्मा बाल स्वातंत्र्य सैनिक शिरीष कुमार नागरी नंदुरबार

03/02/2022

बालहुतात्मा शिरीष कुमार नगरी, नंदुरबार येथे होणाऱ्या अभाविप महाराष्ट्र प्रांताच्या ५६ व्या प्रदेश अधिवेशनात विभिन्न कलेचे दर्शन घडणार असून, त्या व्यवस्था पूर्णत्वास लावण्यासाठी मग्न झालेले कार्यकर्ते...



Address

Prakasha

Opening Hours

Tuesday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919730881165

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogesh ahire posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Yogesh ahire:

Share

Category