01/10/2026
तोरणा किल्ला (प्रचंडगड) छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी जिंकला. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोहणारा पहिला किल्ला , सह्याद्रीच्या डोंगररांगेत समुद्रसपाटीपासून १४०३ मीटर उंचीवर वसलेल्या किल्याच्या पायथ्याशी असलेल्या, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भूमीत शिक्षणाची पताका उंचावणाऱ्या तोरणा विद्यालय व उच्च माध्यमिक शाळा वेल्हा जिल्हा पुणे येथे स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे यांना शैक्षणिक साहित्य देण्याची संधी मिळाली एक अविस्मरणीय क्षण.
१८ जुलै २०२६ रोजी ३५ गावातील विद्यार्थ्यांना एकत्रित करून तोरणा विद्यालय व उच्च माध्यमिक शाळा वेल्हा येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.