आंबेडकरी युवा संघ-समाजहितासाठी कटिबद्ध

  • Home
  • India
  • Pune
  • आंबेडकरी युवा संघ-समाजहितासाठी कटिबद्ध

आंबेडकरी युवा संघ-समाजहितासाठी कटिबद्ध आंबेडकरी समाजहितासाठी कटिबद्ध

29/07/2026
29/07/2026

🌧️ वर्षावास : धम्मसाधनेचा पवित्र काल

२९ जुलै -आषाढ पौर्णिमा – वर्षावासाचा आरंभ!

आषाढ पौर्णिमेपासून बौद्ध संघामध्ये वर्षावास सुरू होतो. "वर्षा" म्हणजे पाऊस आणि "वास" म्हणजे एका ठिकाणी निवास करणे. त्यामुळे पावसाळ्यात सलग तीन महिने एका ठिकाणी राहून धम्मसाधना करणे यालाच वर्षावास म्हणतात.

वर्षावासाची परंपरा विनयपिटकातील महावग्गाच्या ‘वर्षोपनायिका स्कंध’ मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे.

पूर्वी भिक्खू सतत धम्मप्रचारासाठी भ्रमण करत असत. मात्र पावसाळ्यात प्रवास करणे कठीण होत असे आणि अनेक सजीवांना अनवधानाने इजा होण्याची शक्यता असे. त्यामुळे भिक्खूंनी भगवान बुद्धांकडे वर्षावासाबाबत विनंती केली. त्यावर तथागतांनी सांगितले—

«"भिक्खूंनो, मी तुम्हाला वर्षा ऋतूत वर्षावास करण्याची अनुमती देत आहे."»

वर्षावासाचे दोन प्रकार सांगितले आहेत—

१. पुरीमिकावस्सुनायिका
आषाढ पौर्णिमेपासून सुरू होणारा आणि सलग तीन महिने चालणारा वर्षावास.

२. पच्चिमिका
विशेष परिस्थितीत आषाढ पौर्णिमेला वर्षावास सुरू करणे शक्य नसल्यास, भाद्रपद पौर्णिमेपासून पुढील तीन महिन्यांचा वर्षावास.

प्रारंभी वर्षावासाच्या काळात भिक्खूंना एक दिवसासाठीही विहार सोडण्याची परवानगी नव्हती. तसे केल्यास 'दुक्कट' हा विनयदोष मानला जात असे. नंतर भगवान बुद्धांनी आवश्यक कारणांसाठी जास्तीत जास्त सात दिवस बाहेर जाण्याची अनुमती दिली.

वर्षावास हा केवळ एका ठिकाणी राहण्याचा नियम नसून शील, समाधी, प्रज्ञा, अध्ययन, चिंतन आणि धम्मसाधनेला अधिक दृढ करण्याचा पवित्र कालखंड आहे.

संदर्भ : महावग्ग, विनयपिटक

जागतिक बुद्ध धम्म दीक्षा समिती


27/07/2026

भारतीय साठी आनंदाची बातमी आहे युनिस्को विश्वधरोहर मधे सारनाथ येथील बुद्धिस्ट साईड मनजे world heritage site दर्जा मिळाला आहे हा देश बुध्दांचा आहे....





26/07/2026

#आंबेडकरवादी✅

📍डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांवर विश्वास ठेवणारी व ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती.

जातीय भेदभाव, अस्पृश्यता आणि सामाजिक अन्याय यांना विरोध करणे, तसेच शिक्षण, संघटन आणि संघर्ष या तत्त्वांचा स्वीकार करणे, हे आंबेडकरवादी विचारसरणीचे महत्त्वाचे पैलू मानले जातात....

22/07/2026

“वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में,
दुनिया भी कहे कुछ तो बात है, इन भीम दीवानों में …”

जयभीम 💙 ✊🔥

20/07/2026

जय भीम...
हा फक्त एक शब्द नाही, तर तो न्याय हक्कांसाठी लढण्याचा बुलंद आवाज आहे...💙✊

जय भीम 💙🙏

#जयभीम

20/07/2026

आज दिल्लीचं जंतर-मंतर मैदान "जय भीम" च्या घोषणांनी दुमदुमत आहे.

या देशातील कोणत्याही हक्काच्या, न्यायाच्या किंवा संविधान वाचवण्याच्या संघर्षाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय पूर्णत्व येत नाही.

महाराष्ट्रात मात्र अजूनही काही लोक जातीच्या डबक्यात अडकून राजकारण करत आहेत. त्यांनी हे वास्तव समजून घ्यावं की, बाबासाहेबांचं नाव हे केवळ एका समाजाचं नाही; ते भारताच्या लोकशाही, संविधान आणि सामाजिक न्यायाच्या संघर्षाचं प्रेरणास्थान आहे....

18/07/2026

'मोदींची नीच हरकत आता आम्हाला पंतप्रधानांचा राजीनामा हवा' Abhijeet Dipke on Narendra Modi

CJPचे अभिजित दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर टीका करत राजीनाम्याची मागणी केली आहे. दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकार आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Address

Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when आंबेडकरी युवा संघ-समाजहितासाठी कटिबद्ध posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category