12/08/2024
सविनय जय भिम, नमो बुध्दाय.
DVMP या पवित्र ठिकाणी वडगावशेरीतील बुद्ध विहाराच्या सदस्यांसाठी एक दिवसीय धम्म शिबीर आदरणीय भन्ते सुमंगल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. धम्म शिबिराला ८० सदस्य उपस्थित होते. यासाठी आयु रत्नाकर गायकवाड सरांनी आनंद व्यक्त करून, DVMP याठिकाणी श्रद्धावान उपासक व उपासिकांनी भेट देऊन, धम्म श्रवण व आचरण करावे अशी भावना व्यक्त केली. आयु विलास वंशिव यांनी एक दिवस आधी, आमच्या सर्वांसाठी नियोजन केले. तसेच आयु सुरेश साखळे यांनी, सर्वांचे स्वागत करून, भन्ते सुमंगल व उपासक आणि उपासिकांना DVMP प्रोजेक्ट ची माहिती दिली.
आदरणीय भन्ते सुमंगल यांना उपस्थितांनी भोजनदान केले आणि १२ ते ३ या वेळेत पूजा, गाथापठण, आनापानसति ध्यान करून, भंतेजींच्या धम्मदेसनेचा सर्वांनी लाभ घेतला. संपूर्ण वातावरण प्रसन्न व धार्मिक होते. DVMP सारखे भव्य प्रोजेक्ट पुण्यात इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही, आणि अशा पवित्र ठिकाणी बुद्ध धम्माचा उपदेश ऐकण्याची आणि आचरण करण्याची संधी मिळणे हि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
DVMP प्रोजेक्ट इतके भव्य आणि विलोभनीय बनविण्यासाठी निश्चितच दूरदृष्टी असणारे नेतृत्व अखंडपणे कार्यरत आहे याचा आम्हाला विश्वास आहे. आयु रत्नाकर गायकवाड सर, आयु प्रशांत वाघमारे सर व सर्व टीम चे, वडगावशेरी बुद्ध विहार विहाराच्या सदस्यांच्या वतीने, मनःपूर्वक आभार!
आपले
DVMP
वडगावशेरी बुद्ध विहाराचे सर्व सदस्य.