Pune Zilla Parishad

Pune Zilla Parishad Pune Zilla Parishad

कृष्णम् वंदे जगद्गुरुम् || श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रातून प्र...
04/09/2026

कृष्णम् वंदे जगद्गुरुम् ||

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊ अज्ञानाचे, अनारोग्याचे, अव्यवस्थेचे चक्रव्यूह भेदण्यासाठी, उत्तम शिक्षणाचे, उत्तम आरोग्याचे, सुव्यवस्थेचे गोकुळ निर्माण करण्यासाठी पुणे जिल्हा परिषद सदैव कटिबद्ध आहे.

पुण्याच्या "मॉडेल" आरोग्य व्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाकडून कौतुक !Country Exchange Visit उपक्रमांतर्गत झिम्बाब्वे...
03/09/2026

पुण्याच्या "मॉडेल" आरोग्य व्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाकडून कौतुक !

Country Exchange Visit उपक्रमांतर्गत झिम्बाब्वे व कंबोडिया या दोन्ही देशांतील सरकारी शिष्टमंडळाने पुणे जिल्हा परिषदेच्या हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र व कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या नायगाव उपकेंद्र येथे भेट दिली.

पुणे जिल्हा परिषदेच्या "मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र" या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील आरोग्यवस्थेचा झालेला कायापालट परदेशी पाहुण्यांनाही थक्क करणारा ठरला. उपकेंद्रांमधील आरोग्य सेवा व इतर कामकाजाबाबत या शिष्टमंडळाने सर्व माहिती जाणून घेतली व पुणे जिल्हा परिषद प्रशासनाच्या प्रयत्नांचे कौतुकही केले.

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील, बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती श्रीमती दिपाली हुलावळे, कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री. अमोल नलावडे, जिल्हा परिषद सदस्य श्रीमती हर्षदा खळदकर, जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सुरेखा हरगुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी या शिष्टमंडळाचे पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने स्वागत केले.

03/09/2026

विद्यार्थ्यांच्या भविष्याला डिजिटल दिशा देऊया...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावूया !

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उत्तम सुविधा देण्यासाठी "पुणे मॉडेल स्कूल", स्किल ऑन व्हील्स, We Learn English अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्नशील आहे.

आता या प्रयत्नांना आपल्या सर्वांच्याच ताकदीची गरज आहे. कोणताही बदल घडवायचा असेल तर तो बदल समाजाच्या एकत्रित प्रयत्नाने घडतो. असाच बदल घडवण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला डिजिटल दिशा देण्यासाठी आपण सर्वांनी आपले योगदान द्यावे ही नम्र विनंती.

03/09/2026

तब्बल ३५०० पेक्षा जास्त शाळांमधून पुणे जिल्हा परिषद २.५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडला पाहिजे, आधुनिक युगातील स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळाले पाहिजे हे जिल्हा परिषद प्रशासनाचे प्रमुख ध्येय आहे. यासाठीच पुणे मॉडेल स्कूलसह विविध उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत.

भविष्यातील सक्षम पिढी घडवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या या प्रयत्नांना आपल्या सर्वांच्याच योगदानाची गरज आहे. डिजिटल युगाशी सुसंगत असे डिजिटल शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपल्या परीने आपणही योगदान द्यावे ही नम्र विनंती.

Virdhaval Jagdale

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली दौंड पंचायत समिती येथे विशेष प्रशासकीय बैठक व कार...
22/08/2026

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली दौंड पंचायत समिती येथे विशेष प्रशासकीय बैठक व कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या माध्यमातून श्री. वीरधवल जगदाळे यांनी उपस्थित सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, गटसाधनकेंद्र विषयतज्ञ, पी एम श्री स्कूल मुख्याध्यापक, मॉडेल स्कूल मुख्याध्यापक, आयडॉल टीचर यांना मार्गदर्शन केले.

यावेळी शिक्षण अधिकारी श्रीमती ललिता दहितुले, उपशिक्षणाधिकारी श्री. सिद्धार्थ चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य श्रीमती गायत्री खळदकर, पंचायत समिती सभापती श्री. सुखदेव चोरमले, उपसभापती सौ. अमृता गिरमकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Virdhaval Jagdale

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे यांनी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस...
21/08/2026

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे यांनी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट दिली.

ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेला आधुनिक रूप देण्यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने "पुणे मॉडेल स्कूल" हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत स्वामी चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत. श्री. वीरधवल जगदाळे यांनी सर्व विकास कामांची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

शाळेतील विद्यार्थ्यांसोबतही संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला व शाळेच्या माध्यमातून मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधांची माहिती घेतली.

महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. विकास खरगे यांनी पुणे जिल्हा परिषद कार्यक्षेत्रांतर्गत शिरूर तालुक्यातील वाबळेव...
21/08/2026

महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. विकास खरगे यांनी पुणे जिल्हा परिषद कार्यक्षेत्रांतर्गत शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट दिली.

शाळेत असलेल्या पायाभूत सुविधा, स्वच्छतेच्या सुविधा, शिक्षणाच्या अत्याधुनिक सुविधांची पाहणी करून त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांसोबत संवाद साधला. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासनाच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

📍 आंबळी (ता. शिरूर)पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी शिरूर तालुक्यातील आंबळी येथे जिल...
20/08/2026

📍 आंबळी (ता. शिरूर)

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी शिरूर तालुक्यातील आंबळी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देऊन पाहणी केली. पुणे जिल्हा परिषदेच्या "पुणे मॉडेल स्कूल" या अभिनव उपक्रमांतर्गत आंबळी येथील शाळेत सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक सूचना दिल्या.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस प्राथमिक आरोग्य के...
20/08/2026

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधा, उपलब्ध असलेला औषधांचा साठा, रुग्णालयाच्या परिसराची स्वच्छता इत्यादी बाबींचा आढावा घेऊन त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

Address

Pune
411001

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Zilla Parishad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share