Mahaamrut_official

Mahaamrut_official Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mahaamrut_official, Government Organization, AMRUT Office, PMRDA Building, 5th Floor, Aundh, Pune.

ज्या खुल्याप्रवर्गातील जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग/संस्था/महामंडळे यांचा लाभ मिळत नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी “अमृत” ही स्वायत्त संस्था आहे. राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी, युवक - युवती व इतर उमेदवार इत्यादींचा विकास घडवण्यासाठी Academy of Maharashtra Research, Upliftment and Training (Amrut ) 'अमृत' अर्थात महाराष्ट्र संशोधन, उन्नती

व प्रशिक्षण प्रबोधनी या स्वायत्त संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने दिनांक 22 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयाद्वारे केलेली आहे. अमृत या स्वायत्त संस्थेची नोंदणी सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अंतर्गत करण्यात आलेली आहे. सदर संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहे. अमृत या संस्थेच्या योजना Board of Governorsच्या मान्यतेने कार्यान्वित होतात. अमृत संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रधान सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई हे आहेत. नियामक मंडळाच्या मान्यतेने मंजूर झालेल्या योजना तसेच माननीय व्यवस्थापकीय संचालक अमृत यांना प्राप्त झालेल्या विविध अधिकाराच्या कार्यकक्षेत विविध प्रकारच्या योजना कार्यान्वित करण्यात येत असतात.

🛍️✨ AMRUT पेठ | थेट बाजारपेठ नाशिक ✨🛍️नाशिककरांसाठी खरेदी, चव आणि उद्योजकतेचा भन्नाट मेळा! 😍दर्जेदार वस्तू… आणि त्या देख...
03/09/2026

🛍️✨ AMRUT पेठ | थेट बाजारपेठ नाशिक ✨🛍️

नाशिककरांसाठी खरेदी, चव आणि उद्योजकतेचा भन्नाट मेळा! 😍

दर्जेदार वस्तू… आणि त्या देखील एकदम वाजवी दरात! 💯

🛒 AMRUT पेठेत मिळणार —
🎀 गणपती व महालक्ष्मी सजावटीच्या वस्तू
👗 कुर्ती, टॉप्स, लेगिन्स, साड्या
💍 विविध प्रकारचे दागिने व ज्वेलरी
🏠 गृहसजावटीच्या वस्तू
🛏️ बेडशीट्स व टॉवेल्स
👜 आकर्षक बॅग्स
🌿 आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स
🥥 कोकणातील खास उत्पादने
🌶️ घरगुती बनवलेले मसाले व पीठ
…आणि अजून खूप काही! 🤩

📅 ५ आणि ६ सप्टेंबर २०२६
📍 स्थळ: उद्योजी महाराज वस्तू संग्रहालय,
वाघ गुरुजी शाळेजवळ, गंगापूर रोड, नाशिक.

💫 खरेदी करा • चव चाखा • उद्योजकांना प्रोत्साहन द्या!

चला तर मग…
भेटूया अमृत पेठ नाशिक येथे !

📞 अधिक माहितीसाठी:
9850208777 | 9112228770

ेठ #अमृतपेठ #थेटबाजारपेठ

02/09/2026

🚩 श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे : पेशवेपदापर्यंतचा ऐतिहासिक प्रवास 🚩⚔️

असामान्य पराक्रम, दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा… या गुणांच्या बळावर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी इतिहासात अजरामर स्थान निर्माण केले.

पेशवेपद त्यांना कसे मिळाले?
कोणत्या ऐतिहासिक परिस्थितीत त्यांची निवड झाली?
आणि एका तरुण बाजीरावांमध्ये छत्रपती शाहू महाराजांना कोणते नेतृत्वगुण दिसले?

📜 जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये…
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :- www.parakramdin.mahaamrut.org.in

#अमृतपराक्रम #बाजीरावपेशवे #थोरलेबाजीराव #पेशवे #मराठाइतिहास #मराठासाम्राज्य

🛍️✨ अमृतपेठ थेट बाजारपेठ – नाशिकमध्ये! ✨🛍️दर्जेदार वस्तू… 🎁आकर्षक पर्याय… 💫आणि तेही एकदम वाजवी दरात! ❤️यंदाच्या खरेदीसाठ...
02/09/2026

🛍️✨ अमृतपेठ थेट बाजारपेठ – नाशिकमध्ये! ✨🛍️

दर्जेदार वस्तू… 🎁
आकर्षक पर्याय… 💫
आणि तेही एकदम वाजवी दरात! ❤️

यंदाच्या खरेदीसाठी एकाच ठिकाणी मिळणार आहे बरंच काही! 😍

🌺 गणपती व महालक्ष्मी सजावटीच्या वस्तू
👗 कुर्ती, टॉप्स, लेगिन्स व साड्या
💎 विविध प्रकारचे दागिने व ज्वेलरी
👜 स्टायलिश बॅग्स
🏠 गृहसजावटीच्या वस्तू
🛏️ बेडशीट्स व टॉवेल्स
🌿 आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स
🥥 कोकणातील खास प्रॉडक्ट्स
🌶️ घरगुती बनवलेले मसाले व पीठ
🍴 आणि खास आपली खाऊ गल्ली!

😋 मुग भजी | 🍕 पिझ्झा | 🥟 मोमोज | 🌸 उकडीचे मोदक | 🌯 रोल्स | आणि अजून खूप काही!

📅 ५ व ६ सप्टेंबर २०२६
📍 उद्योगजी महाराज वस्तू संग्रहालय, वाच गुरुजी शाळेजवळ, गंगापूर रोड, नाशिक

🛒 खरेदीही करा… चवही चाखा… आणि स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहनही द्या! ❤️

आता नाशिककरांची खरेदी होणार अधिक खास!
अमृतपेठ थेट बाजारपेठेला नक्की भेट द्या! 🙌

📞 अधिक माहितीसाठी: 9112228770 / 7887615377

#अमृतपेठ #अमृतपेठथेटबाजारपेठ #नाशिक #थेटबाजारपेठ

01/09/2026

🚩श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - अपराजित योद्ध्याची शौर्यगाथा...🚩
रणांगणातील अद्वितीय पराक्रम, अचूक रणनीती आणि स्वराज्य विस्ताराची दूरदृष्टी…
अवघ्या आयुष्यात एकही मोठी लढाई न हरलेले, आपल्या शौर्याने आणि नेतृत्वाने सामर्थ्याचा झेंडा दूरवर फडकवणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे म्हणजे भारतीय इतिहासातील एक अद्वितीय अपराजित योद्धा! 🏇🚩

त्यांच्या पराक्रमाची, नेतृत्वाची, राष्ट्रनिष्ठेची आणि अदम्य धैर्याची प्रेरणादायी गाथा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा अमृत संस्थेचा हा एक प्रयत्न.

अधिक माहितीसाठी :- https://parakramdin.mahaamrut.org.in/
🚩

#श्रीमंतबाजीरावपेशवे #बाजीरावपेशवे #अपराजितयोद्धा #अमृतपराक्रमदिन #मराठाइतिहास #मराठासाम्राज्य #शौर्य #पराक्रम #राष्ट्रनिष्ठा #इतिहास

🚀 पालघर येथे आपल्या व्यवसायाला द्या नवी दिशा !🚀 तुमच्यात उद्योजक होण्याची जिद्द आहे ? स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप...
31/08/2026

🚀 पालघर येथे आपल्या व्यवसायाला द्या नवी दिशा !🚀

तुमच्यात उद्योजक होण्याची जिद्द आहे ? स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न आहे ? तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी !💼✨

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे पालघर येथे मोफत EDP (Entrepreneurship Development Program) कोर्स आयोजित करण्यात आला आहे.

या प्रशिक्षणामध्ये जाणून घ्या –
✅ व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन
✅ तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मोफत प्रशिक्षण
✅ मार्केटिंग, ब्रँडिंग व व्यवसाय विकासाचे ज्ञान
✅ व्यवसायासाठी उपयुक्त व्यावहारिक धोरणे
✅ यशस्वी उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

LEARN from real-world experiences 📚
IMPLEMENT practical strategies for your business 💡
GROW your brand, your reach, your impact 📈

💫 तुमच्या कल्पनांना द्या व्यवसायाचे रूप आणि घ्या यशस्वी उद्योजकतेकडे एक नवे पाऊल!

📞 आजच नोंदणी करा: 9112226530

⚠️ मर्यादित जागा — संधी गमावू नका !

अधिक माहिती साठी संकेतस्थळ :- www.mahaamrut.org.in

#उद्योजकता #व्यवसाय #स्वयंरोजगार #यशस्वीउद्योजक

🔥 अमृत युवा ऊर्जा | नांदेड 🔥 🇮🇳नांदेड जिल्ह्यातील नरसी येथील राणी लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (कनिष्ठ म...
30/08/2026

🔥 अमृत युवा ऊर्जा | नांदेड 🔥
🇮🇳
नांदेड जिल्ह्यातील नरसी येथील राणी लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (कनिष्ठ महाविद्यालय) येथे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘अमृत युवा ऊर्जा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आजच्या Gen Z अर्थात तरुण पिढीमध्ये व्यसनमुक्ती, आरोग्यदायी जीवनशैली आणि सामाजिक बांधिलकी याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 🙌

🎯 ‘नशामुक्त भारत व Young India – Fit India’ या विषयावर नायगाव येथील प्रसिद्ध जनरल फिजिशियन डॉ. जयप्रकाश कुऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले.

🧠 व्यसनाधीनता आणि डोपामाईनचे गणित समजावून सांगताना व्यसनाची सुरुवात कशी होते, त्याचे हळूहळू सवयीत आणि पुढे व्यसनात कसे रूपांतर होते, तसेच मेंदूमध्ये डोपामाईनची भूमिका काय असते, हे डॉ. कुऱ्हाडे यांनी शास्त्रीय आणि सोप्या भाषेत स्पष्ट केले.

त्याचबरोबर वाईट सवयी व कुसंगतीपासून दूर राहणे, योग्य आहार, नियमित व्यायाम, प्राणायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली यांचे महत्त्वही त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

💬 मार्गदर्शनाने प्रेरित होऊन काही विद्यार्थ्यांनी स्वतःहून पुढे येत कुटुंबातील व्यसनाधीनतेचे अनुभव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या मांडल्या. व्यसनमुक्त जीवन जगण्याचा आणि इतरांनाही त्यापासून दूर ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

🤝 कार्यक्रमाच्या माध्यमातून “समृद्ध युवा ते समृद्ध राष्ट्र” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. नशामुक्त, निरोगी, सक्षम आणि जबाबदार युवा पिढी हीच विकसित व समृद्ध राष्ट्राची खरी ताकद आहे, हा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक श्री. नरेंद्र हाळे होते. तसेच औ.प्र.सं. नायगाव येथील IMC सदस्य श्री. सदानंद चुटेवाट व श्री. लक्ष्मण बुद्धलवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची रूपरेषा व ‘अमृत युवा ऊर्जा’ उपक्रमाची ध्येय-उद्दिष्टे अमृतचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांनी प्रास्ताविकातून मांडली.

🌱 Gen Z ची ऊर्जा योग्य दिशेने वळली, तर तीच ऊर्जा समृद्ध भारताच्या निर्मितीची शक्ती ठरू शकते!

🇮🇳 सक्षम युवा | समृद्ध भारत

अधिक माहितीसाठी संपर्क :- 7391065472

#अमृतयुवाऊर्जा #समृद्धयुवा #समृद्धराष्ट्र

🛍️✨ अमृतपेठ आता कोल्हापुरात ! ✨🛍️गणेशोत्सवाच्या निमित्ताने येत आहे AMRUT पेठ – थेट बाजारपेठ !🎊🌟 महा उद्योग • व्यापार • स...
29/08/2026

🛍️✨ अमृतपेठ आता कोल्हापुरात ! ✨🛍️

गणेशोत्सवाच्या निमित्ताने येत आहे AMRUT पेठ – थेट बाजारपेठ !🎊

🌟 महा उद्योग • व्यापार • स्वदेशी उत्पादन प्रदर्शन व विक्री🌟

📅 5 व 6 सप्टेंबर 2026
⏰ सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत
📍 श्री बाळकृष्ण हवेली ट्रस्ट सांस्कृतिक हॉल, नागाळा पार्क, कोल्हापूर

🛒 स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देऊया!
🇮🇳 स्वदेशी उत्पादनांना साथ देऊया!
🤝 उद्योजकता आणि व्यापाराचा नवा उत्सव साजरा करूया!

कोल्हापूरकर, भेट द्यायला विसरू नका! ❤️
संकेतस्थळ :- www.mahaamrut.org.in
📞 संपर्क : 9112228764 | 8275378019

#अमृतपेठ #कोल्हापूर #स्वदेशी #व्यापार #उद्योजकता #स्वदेशीउत्पादन

🌿विश्वसंस्कृतदिनस्य सर्वेभ्यः हार्दिकाः शुभाशयाः!🌿संस्कृतभाषा अस्माकं गौरवपूर्णः सांस्कृतिकः वारसः अस्ति।तस्याः संरक्षणं...
29/08/2026

🌿विश्वसंस्कृतदिनस्य सर्वेभ्यः हार्दिकाः शुभाशयाः!🌿

संस्कृतभाषा अस्माकं गौरवपूर्णः सांस्कृतिकः वारसः अस्ति।
तस्याः संरक्षणं, संवर्धनं च अस्माकं सामूहिकं दायित्वम्।

— अमृत् (AMRUT)

अधिक माहिती साठी संपर्क :- 7391065476अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :- https://parakramdin.mahaamrut.org.in/
28/08/2026

अधिक माहिती साठी संपर्क :- 7391065476

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :- https://parakramdin.mahaamrut.org.in/

🌱 कचऱ्यातून संधी… संधीचे उद्योजकतेत रूपांतर! ♻️AMRUT - SAKSHAM  उपक्रमांतर्गत घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन बुधवार...
28/08/2026

🌱 कचऱ्यातून संधी… संधीचे उद्योजकतेत रूपांतर! ♻️

AMRUT - SAKSHAM उपक्रमांतर्गत घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिक अमृत कार्यालयात करण्यात आले.

घनकचरा ही केवळ विल्हेवाट लावण्याची समस्या नसून, त्यातून रोजगार, स्वयंरोजगार आणि नव्या व्यवसायांच्या संधी निर्माण होऊ शकतात, या विचारातून AMRUT सक्षम उपक्रम कार्यरत आहे. 💚

या कार्यशाळेत घनकचरा व्यवस्थापनातून सुरू करता येणाऱ्या विविध व्यवसायांची माहिती देण्यात आली. यामध्ये
🔹 पॅलेट निर्मिती
🔹 निर्माल्यापासून अगरबत्ती निर्मिती
🔹 कोकोपीट निर्मिती
🔹 RRR सेंटर
यांसह विविध व्यवसायांच्या संधी, प्रक्रिया आणि उद्योजकतेच्या शक्यता याबाबत श्री. गोगटे सर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे उद्घाटन नाशिक विभागीय व्यवस्थापक श्री. मंगेश खाडीलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी AMRUT च्या विविध योजना तसेच AMRUT सक्षम उपक्रमाची भूमिका व उद्दिष्टे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

👥 कार्यशाळेत एकूण १६ जणांनी सहभाग नोंदवला.

कचऱ्याचे व्यवस्थापन करताना रोजगारनिर्मितीला चालना आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार — हाच AMRUT सक्षमचा संकल्प! 🌿

♻️ Waste to Wealth | रोजगारातून उद्योजकतेकडे | शाश्वत विकासाकडे
www.mahaamrut.org.in
अधिक माहितीसाठी संपर्क - 9112228770

#अमृत #अमृतसक्षम #घनकचराव्यवस्थापन

Address

AMRUT Office, PMRDA Building, 5th Floor, Aundh
Pune
411067

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 11am - 6pm

Telephone

+919730151450

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahaamrut_official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Mahaamrut_official:

Shortcuts

Share