Avinash Mohite.संभाजी ब्रिगेड पुणे.

  • Home
  • India
  • Pune
  • Avinash Mohite.संभाजी ब्रिगेड पुणे.

Avinash Mohite.संभाजी ब्रिगेड पुणे. जय जिजाऊ जय शिवराय

3 सप्टेंबर "कार्यकर्ता सन्मान दिन"संघर्ष, निष्ठा आणि समर्पणाची प्रेरणा देणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज दा...
03/09/2026

3 सप्टेंबर "कार्यकर्ता सन्मान दिन"
संघर्ष, निष्ठा आणि समर्पणाची प्रेरणा देणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज दादा आखरे यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत अनंत शुभेच्छा! 💐
संघर्षाची वाट… कार्यकर्त्यांची साथ… आणि परिवर्तनाचा ध्यास!
शुभेच्छुक : संभाजी ब्रिगेड पुणे शहर 🚩
#कार्यकर्ता_सन्मान_दिन #मनोजदादा_आखरे #संभाजी_ब्रिगेड #पुणे_शहर #वाढदिवसाच्या_शुभेच्छा #संघर्ष #कार्यकर्ता
Avinash Mohite Santosh Shinde - संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र Adv Santosh Shinde Shivraj Manoj Akhare Manoj Akhare

सर्वांना सप्रेम जय जिजाऊ ज्यांच्या विचारांनी स्वाभिमान, समता आणि न्यायाची वाट दाखवली, त्यांच्या प्रेरणेतून समाजपरिवर्तना...
27/08/2026

सर्वांना सप्रेम जय जिजाऊ
ज्यांच्या विचारांनी स्वाभिमान, समता आणि न्यायाची वाट दाखवली, त्यांच्या प्रेरणेतून समाजपरिवर्तनाचा संकल्प करूयात!

संघर्ष कितीही मोठा असो, ध्येय स्पष्ट असेल तर पाऊल कधीच थांबत नाही.
शिवश्री.अविनाश मोहिते.
महानगराध्यक्ष Avinash Mohite.संभाजी ब्रिगेड पुणे.

#जयजिजाऊ #जयशिवराय #संभाजीब्रिगेड #अविनाशमोहिते #पुणे #स्वाभिमान #समता #न्याय #समाजपरिवर्तन #संघर्ष #मराठी #महाराष्ट्र
Avinash Mohite Avinash Mohite

24/08/2026

हाकेने येड्याची चादर पांघरू नये.
"मी नाही त्यातली,कडी लाव आतली"
🚨पवन करवरला तात्काळ पोलीस प्रोटेक्शन द्या..
ही घटना निंदनीय आहे या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. मास्टर माईंड लक्ष्मण हाके याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करा.अशी मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. Indian National Congress Devendra Fadnavis Maharashtra Police Bharti 2026
karwar

🇮🇳 १५ ऑगस्ट | भारतीय स्वातंत्र्य दिन 🇮🇳१५ ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान आणि देशप्रेम जागवणारा ऐतिहासिक दिवस!...
15/08/2026

🇮🇳 १५ ऑगस्ट | भारतीय स्वातंत्र्य दिन 🇮🇳

१५ ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान आणि देशप्रेम जागवणारा ऐतिहासिक दिवस! १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवले.

असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी त्याग, संघर्ष आणि बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे स्वातंत्र्याचा अर्थ केवळ उत्सव साजरा करणे नाही, तर देशाची एकता, अखंडता, संविधान आणि लोकशाही यांचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारणे आहे.

आजच्या दिवशी आपण संकल्प करूया—
देशासाठी प्रामाणिकपणे काम करू, समाजात एकता निर्माण करू आणि भारताला अधिक सक्षम, समृद्ध व विकसित बनवण्यासाठी आपले योगदान देऊ.

🇮🇳 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
जय हिंद! 🇮🇳 जय भारत! 🇮🇳

जनतेचा विश्वास… बदलाची सुरुवात!सत्यासाठी लढण्याची तयारी,व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिंमत..आणि सामान्य जनतेच्या हक्कास...
11/08/2026

जनतेचा विश्वास…
बदलाची सुरुवात!
सत्यासाठी लढण्याची तयारी,
व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिंमत..
आणि सामान्य जनतेच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची जिद्द…!
शिवश्री.अविनाश मोहिते पाटील
हा फक्त एक चेहरा नाही,
हा जनतेच्या आवाजाचा चेहरा आहे!
एक विचार… एक लढा… एक ध्येय!
जनतेचा विश्वास… बदलाची सुरुवात!
#रणसंग्राम #जनतेचाआवाज #जनतेचाविश्वास #बदलाचीसुरुवात #संघर्ष #स्वाभिमान #सत्यासाठीसंघर्ष #मराठी #महाराष्ट्र #मराठीमाणूस #जयजिजाऊ #जयशिवराय #छत्रपतीशिवाजीमहाराज #लोकशाही #जनतेसाठी

09/08/2026

सत्य एकटं असलं तरी… कमकुवत नसतं! एकदा नक्की पहा..by Avinash mohite official
खोट्याला स्वतःला टिकवण्यासाठी गर्दीची गरज असते, पण सत्याला कोणाच्याही आधाराची गरज नसते.
काळ कितीही पुढे सरकला तरी शेवटी मुखवटे गळतात आणि सत्य प्रकाशासारखं अचानक समोर येतं.
म्हणून गैरसमज, आरोप आणि विरोध यामुळे सत्याची साथ सोडू नका…
कारण शेवटी विजय आवाजाचा नाही, तर सत्याचाच होतो! 💯
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩
#सत्य #सत्याचाविजय #सत्याचीशक्ती #सत्याचीवाट #मराठीविचार #मराठीप्रेरणा #मराठीस्टेटस #प्रेरणादायीविचार #जिंदगी #जयजिजाऊ #जयशिवराय

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन! 🌹श्रमिक, कष्टकरी, वंचित आणि सर्वसामान्यांच्या वेदनांना आपल्या ल...
31/07/2026

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन! 🌹
श्रमिक, कष्टकरी, वंचित आणि सर्वसामान्यांच्या वेदनांना आपल्या लेखणीतून आवाज देणारे, लोकसाहित्याचे तेजस्वी शिल्पकार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
त्यांचे विचार, साहित्य आणि संघर्षमय जीवन समाजाला सदैव प्रेरणा देत राहो, हीच कृतज्ञ भावना.
आपणा सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌺
Avinash Mohite.संभाजी ब्रिगेड पुणे. Avinash Mohite Avinash Mohite

29/07/2026

🙏 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥"

गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे.

माझे पहिले गुरु म्हणजे माझी आई जिने मला बोलायला, चालायला, माणूस म्हणून जगायला आणि प्रेम करायला शिकवले.

माझे दुसरे गुरु म्हणजे माझे वडील ज्यांनी संघर्ष, प्रामाणिकपणा, स्वाभिमान आणि जबाबदारीची खरी शिकवण दिली.

माझे शिक्षकवृंद ज्यांनी पुस्तकातील ज्ञानासोबतच जीवनाची मूल्ये, संस्कार आणि योग्य-अयोग्य यातील फरक समजावून दिला.

माझा मित्रपरिवार ज्यांनी प्रत्येक सुख-दुःखात साथ दिली, चुका दाखवून दिल्या, योग्य वेळी आधार दिला आणि आयुष्य अधिक समृद्ध केले.

आणि माझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती—माझी अर्धांगिनी. प्रत्येक संघर्षात खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहणारी, माझ्या यशात निःस्वार्थ आनंद मानणारी, अपयशात धीर देणारी आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझा हात न सोडणारी माझी खरी सहप्रवासी. तिचे ऋण शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.

याशिवाय, आयुष्यात भेटलेले प्रत्येक मार्गदर्शक, प्रत्येक ज्येष्ठ, प्रत्येक सहकारी आणि प्रत्येक अनुभव हेही माझे गुरुच आहेत. त्यांनी मला काही ना काही शिकवले आणि अधिक चांगला माणूस बनण्याचा मार्ग दाखवला.

या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या जीवनात प्रकाश पेरणाऱ्या सर्व गुरुजनांना मी मनःपूर्वक वंदन करतो.

आपल्या सर्वांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीप सदैव प्रज्वलित राहो, संस्कारांची श्रीमंती लाभो आणि गुरुंचे आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

सर्व गुरुजनांना, आई-वडिलांना, शिक्षकांना, मित्रपरिवाराला आणि प्रत्येक जीवनमार्गदर्शकाला कोटी कोटी प्रणाम!

आपण सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

आरक्षण हटाव आंदोलन..RHA.."हे शक्य आहे का?" काय सांगतो कायदा? घटना दुरुस्ती शक्य आहे का?आरक्षणाबाबत देशभरात विविध मतप्रवा...
28/07/2026

आरक्षण हटाव आंदोलन..RHA..
"हे शक्य आहे का?"
काय सांगतो कायदा?
घटना दुरुस्ती शक्य आहे का?
आरक्षणाबाबत देशभरात विविध मतप्रवाह आहेत. संविधानातील तरतुदी, घटना दुरुस्तीची प्रक्रिया, सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आणि कायदेशीर वास्तव काय आहे? या सर्व मुद्द्यांवर आज आपण सविस्तर आणि तथ्याधारित चर्चा करणार आहोत.
🔹 आरक्षण हटवता येऊ शकते का?
🔹 घटना दुरुस्तीची प्रक्रिया काय आहे?
🔹 संसद आणि सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय आहे?
🔹 कायदेशीर आणि संविधानिक बाजू नेमकी काय सांगते?
या महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा ऐकण्यासाठी आज रात्री ठीक ८:०० वाजता नक्की सहभागी व्हा.
📺 YouTube Channel: Avinash Mohite Official
लाईक 👍 | शेअर 📲 | कमेंट 💬 | सबस्क्राईब 🔔

लोकशाही वाचवायची असेल तर आता गप्प बसून चालणार नाही!देशातील लोकशाही,संविधान आणि मतदारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सुरू ...
27/07/2026

लोकशाही वाचवायची असेल तर आता गप्प बसून चालणार नाही!
देशातील लोकशाही,संविधान आणि मतदारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या "EVM हटाव – देश बचाव" या विषयावर आज रात्री सविस्तर चर्चा होणार आहे.
🕗 आज रात्री ठीक 08:00 वाजता LIVE 📺 Avinash Mohite Official या चैनल वरती पाहायला विसरू नका.
मतदार हा देशाचा राजा आहे.
आपला आवाज बुलंद करूया आणि लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी चर्चेत सहभागी होऊया.
आज रात्री 08 वाजता भेटूया!
#लोकशाही #संविधान #लोकशाहीवाचवा #मतदार

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avinash Mohite.संभाजी ब्रिगेड पुणे. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Avinash Mohite.संभाजी ब्रिगेड पुणे.:

Shortcuts

Share