Archana Deshmane

Archana Deshmane स्नेहवन मध्ये कार्यरत 🙏🌿

Seattle USA, मध्ये विठ्ठल मंदिरात सेवा मिळाली. आमचे कैलास भाऊ दर्शनाला घेऊन गेले. गुरुवर्य मंगेश दादा फडके यांचे आशीर्वा...
11/08/2026

Seattle USA, मध्ये विठ्ठल मंदिरात सेवा मिळाली. आमचे कैलास भाऊ दर्शनाला घेऊन गेले. गुरुवर्य मंगेश दादा फडके यांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य मिळाले.

स्नेहवनची माहिती दिल्यानंतर एकत्र प्रसाद घेतला. कैलास भाऊंचे आभार. राम कृष्ण हरी. 🙏🏻🌿🙌🏻☺️

राम कृष्ण हरी 🙌🌿🙏
27/07/2026

राम कृष्ण हरी 🙌🌿🙏

मन माझे सदा भजनी न्हालेसुखदुःख येता..राम झाले...लेकरांचा मेळा..जसे संतजनस्वर्गसुख प्राण..स्नेहवन..!मोक्षसुख देते, कन्येच...
21/07/2026

मन माझे सदा भजनी न्हाले
सुखदुःख येता..राम झाले...
लेकरांचा मेळा..जसे संतजन
स्वर्गसुख प्राण..स्नेहवन..!

मोक्षसुख देते, कन्येची पाऊले
अभंग पेरीले...याची देही..!
माधव रूप, लक्ष्मी धारीयले
भुवरी वैकुंठ 'मीरा'ने आणिले

मंडळी मुलगी झाली, अर्चनाने आम्हाला मीराच्या रूपाने सुंदर भेट दिली आहे. लेकीच्या पायगुणाने परत लिहायला सुचले आहे. आपले प्रेमाने आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. राम कृष्ण हरी. 🙏🙌☺️🌿

अर्चनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने...एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यात येते तेव्हा तिचे स्वतःचेही वेगळे काही स्वप्न अ...
17/07/2026

अर्चनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने...

एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यात येते तेव्हा तिचे स्वतःचेही वेगळे काही स्वप्न असतात. परंतु आमच्या आयुष्यात दोघांचेही वेगळे स्वप्न नाहीत.

सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मागच्या दहा वर्षापासून फक्त आणि फक्त स्नेहवन आणि मुलं या परिघाच्या बाहेर आम्ही पडलो नाही.

स्नेहवन मध्ये सुखदुःख एकट्याची नसतात तर सर्व कुटुंब त्यामध्ये सहभागी होत, यावर्षी कुटुंब १०० लोकांचा आहे.

या कुटुंबात कोणाचेही वैयक्तिक आयुष्य नाही, आमच तर नाहीच नाही. परंतु हे सर्व जगत असताना अर्चनाची साथ अतिशय मोलाची आहे.

आजकाल आपण जगात बघतो की छोट्याश्या भांडणातून, काही स्वार्थापोटी पती-पत्नीचे नाते कमकुवत होत चालले आहे.

अशा वातावरणात 100 लेकरांची आई होऊन कोणतीही तक्रार न करता अतिशय आनंदाने हसत हसत सगळे सुख दुःख वाचवणारी अर्चना माझ्या आयुष्यात ते पांडुरंगाने दिलेली सर्वात मोठी भेट आहे.

दहा बाय दहा च्या रूममध्ये स्नेहवन सुरू झालं होतं हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. एक रूम मध्ये 18 मुलं झोपायचे आणि अर्चनाने तिथून मला साथ दिलेली आहे.

आज स्नेहवनचा पसारा, कामाचा आवाका खूप वाढला आहे, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि पांडुरंगाच्या कृपेमुळे आम्हाला हे कार्य करण्यास बळ मिळत आहे. आमची पात्रता नाही.

बरीच मित्रमंडळी पेजला अजून कनेक्ट नाहीत त्यामुळे ही प्रोफाइल परत चालू करत आहे. कारण ही खास आहेत.

अर्चनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि अजून दुसऱ्या दोन गोड बातम्या देण्यासाठी...त्यातली एक म्हणजे, 5 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर अमेरिका दौरा होणार आहे.

अमेरिका दौऱ्याची सविस्तर माहिती पेजवर देणार आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे की खालील लिंक वर क्लिक करून fb पेजला किंवा instagram ला फॉलो करावे.

page: https://www.facebook.com/share/1Hf3oDWnwf/

Instagram: https://www.instagram.com/ashokempowers

दुसर्‍या गोड बातमीची पोस्ट उद्या टाकणार आहे. आजचा दिवस अर्चनाचा...अर्चना तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद अर्चनाच्या पाठीशी राहू द्या. राम कृष्ण हरी ☺️🙏🙌🌿

31/05/2026

अनेक गरजू लेकरांची आई होण्याचा आनंद स्वर्ग सुखा पेक्षा कमी नाही. 🌿

01/04/2026

Distance is just a number when hearts are connected by a shared purpose. ❤️🌏

We bid a bittersweet farewell to Minori, who traveled all the way from Japan to volunteer at Snehwan. For the past 6 weeks, she hasn’t just been a teacher; she has been a sister, a friend, and a window to the world for our children. 🇯🇵🤝🇮🇳

From sharing Japanese culture to teaching new skills, Minori’s presence brought a special spark to our campus. The children have learned that kindness has no language, and inspiration knows no borders.

Minori, as you head back to Japan, you leave behind a piece of your heart at Snehwan. Thank you for choosing to spend your time and energy with our little ones. You are now, and always will be, a part of the Snehwan family. 🌸✨

Sayonara, until we meet again!

Address

Snehwan, Koyali Phata, Koyali Tarf Chakan
Pune
410501

Alerts

Be the first to know and let us send you an email when Archana Deshmane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Archana Deshmane:

Shortcuts

Share