07/08/2026
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA) आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (KBCNMU), जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक संशोधन उपकरणांवरील प्रत्यक्ष प्रशिक्षण देणारा प्राध्यापक विकास कार्यक्रम (FDP) दिनांक ३ ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला.
हा कार्यक्रम आदरणीय डॉ. शैलेंद्र देवळणकर सर, कार्यकारी संचालक, MSFDA आणि आदरणीय प्रा. विजय माहेश्वरी सर, कुलगुरू, KBCNMU जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
विद्यापीठातील विविध विद्याशाखांमध्ये उपलब्ध असलेल्या तज्ज्ञता आणि अत्याधुनिक संशोधन उपकरणांनी सुसज्ज संशोधन व विकास प्रयोगशाळांच्या आधारे हा प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यात आला. यामध्ये भौतिकशास्त्र विद्याशाखा, विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था, जीवशास्त्र विद्याशाखा आणि पर्यावरणशास्त्र विद्याशाखा यांचा समावेश आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सहभागींना पुढील अत्याधुनिक उपकरणे व लक्षणीकरण (characterization) तंत्रांची ओळख करून देणे हा होता:
आकारशास्त्रीय लक्षणीकरण तंत्र: TEM, HRTEM आणि AFM
रासायनिक संघटन लक्षणीकरण तंत्र: ICP-OES, GC-MS/MS आणि XPS
संरचनात्मक लक्षणीकरण तंत्र: XRD, Raman, FTIR, कण आकार विश्लेषक (Zeta Potential सह) आणि TGA-DTA-DSC
अँटेना चाचणी व मायक्रोवेव्ह उपयोजन: VNA
तसेच सहभागींना क्लास १०,००० क्लीन रूम वातावरणाची ओळखही करून देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख साधनव्यक्ती (Resource Persons) पुढीलप्रमाणे होते — आदरणीय प्र-कुलगुरू डॉ. सोपान इंगळे, प्रा. भूषण चौधरी, प्रा. मनीष जोशी, प्रा. दीपक दळल, प्रा. संजय घोष, प्रा. रामकृष्ण शिंदे, डॉ. नवीन खंडारे, प्रा. रत्नमाला बेंद्रे, प्रा. अजयकुमार गोस्वामी, डॉ. संजय अत्तरदे, डॉ. राकेश रामटेके, प्रा. कीर्ती कमलजा आणि डॉ. लीना चौधरी.
या कार्यक्रमाचे समन्वयन केंद्रप्रमुख इं. सूरजकुमार बाबर आणि श्री. भार्गव वलंजू, MSFDA यांनी केले.