30/06/2026
'प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS Round III) २०२६' अंतर्गत तरुणांना मोठी संधी
केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६' ची घोषणा करण्यात आली आहे. या तिसऱ्या टप्प्यात देशभरातील 31480+ हून अधिक जागा उपलब्ध असून, पुणे जिल्ह्यांमधील तरुणांना नामवंत कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे.
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या कालावधी साधारणपणे 6 किंवा 9 महिन्यासाठी असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना दरमहा रु.9000/- विद्यावेतन दिले येईल त्यानंतर इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
या योजनेअंतर्गत उमेदवारांची पात्रता खालीलप्रमाणे असेल .
1. वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष आहे .
2. भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे
3. शैक्षणिक पात्रता: १० वी, १२ वी उत्तीर्ण, ITI, डिप्लोमा किंवा पदवीधर (BA,
BSc, BCom, BCA, BBA, B.Pharma इ.) उमेदवार अर्ज करू शकतात.
4. कुठेही पूर्णवेळ नोकरी (Full-time job) करणारे व शिक्षण चालू असलेले
उमेदवार या योजनेत पात्र नाही तथापि ज्या उमेदवारांचे ऑनलाइन किंवा
दूरस्थ शिक्षण (Distance learning) घेत आहेत, ते पात्र आहेत. तसेच
उमेदवार आपल्या पदवी (Graduation) किंवा पदव्युत्तर (Post-
graduation) शिक्षणाच्या अंतिम वर्षात आहेत, ते अर्ज करण्यास पात्र
आहेत.
PMIS योजनेमध्ये नामांकित कंपनीमध्ये उमेदवारांना इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध आहे.तरी सदर कंपनीमध्ये ॲप्लाय करण्यासाठी मर्यादित कालावधी असल्यामुळे https://pminternship.mca.gov.in/login/
या पोर्टलवर जाऊन नोंदणी करुन रिक्तपदांना अर्ज करावा व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, 481 रास्ता पेठ पुणे या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्र. 020-26133606 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.