19/09/2026
भक्तीचा उत्सव… आपुलकीच्या भेटी… आणि स्नेहाचे क्षण!
काल रात्री गौरी-गणपती सणाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेत आरती केली. गौरी-गणपतीच्या मंगलमय वातावरणात सर्वांशी मनमोकळ्या गप्पा मारत स्नेहपूर्ण संवाद साधला. आपल्या माणसांच्या घरी जाऊन सणाचा आनंद आणि भक्तीचा हा अनुभव घेणे नेहमीच मनाला समाधान देणारे असते.
गणरायाच्या चरणी प्रार्थना… प्रत्येक कुटुंबाच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदो!