एक क्षण आनंदाचा

एक क्षण आनंदाचा Is an organization that specializes in education, health and the environment.

शैक्षणिक सहल व सीड बॉल (Seed Ball) उपक्रमLions Club of Pune, एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्था आणि भारत विकास परिषद यांच्या...
03/08/2026

शैक्षणिक सहल व सीड बॉल (Seed Ball) उपक्रम

Lions Club of Pune, एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्था आणि भारत विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी किल्ले मल्हारगड येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे, निसर्गप्रेम वाढविणे आणि ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणे हा होता.

उन्हाळी सुट्टीदरम्यान विद्यार्थ्यांनी जुन्या व देशी वृक्षांच्या बियांचा वापर करून सीड बॉल (Seed Ball) तयार केले होते. सहलीच्या दिवशी हे सीड बॉल सोबत घेऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

"छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष" करत सहलीची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, कविता आणि विविध मनोरंजक उपक्रमांचा आनंद घेतला. मल्हारगडावर पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर गडाची पाहणी सुरू केली.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मल्हारगडाचा इतिहास, त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर सीड बॉल रोपणासाठी योग्य ठिकाणांची निवड करून सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने खड्डे तयार केले आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सीड बॉल लावले.

यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि पर्यावरण संरक्षणाची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, पर्यावरणपूरक आणि आनंददायी ठरली. विद्यार्थ्यांनी इतिहास, निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. संपूर्ण सहल उत्साहपूर्ण आणि अविस्मरणीय वातावरणात पार पडली.

या सहलीमध्ये Lions Club of Pune, एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्था, भारत विकास परिषद यांचे प्रतिनिधी, शिक्षक आणि स्वयंसेवक उपस्थित होते.

🌿 विद्यार्थी शैक्षणिक सहल व सीड बॉल उपक्रम 🌿लायन्स क्लब ऑफ पुणे, एक क्षण आनंदाचा संस्था व भारत विकास परिषदयांच्या संयुक्...
22/07/2026

🌿 विद्यार्थी शैक्षणिक सहल व सीड बॉल उपक्रम 🌿

लायन्स क्लब ऑफ पुणे, एक क्षण आनंदाचा संस्था व भारत विकास परिषद
यांच्या संयुक्त विद्यमाने

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल व पर्यावरण संवर्धन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

📅 दिनांक: २६ जुलै २०२६ (रविवार)

📍 सहलीचे ठिकाण: मल्हारगड, पुणे

🕢 एकत्र जमण्याची वेळ: सकाळी ७:३० वाजता

🌱 विशेष उपक्रम

मल्हारगड परिसरात सीड बॉल लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल.

🎒 विद्यार्थ्यांनी सोबत आणावयाच्या वस्तू
रेनकोट
पाण्याची बाटली
सुका खाऊ

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
9011372220

एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्थेकडून वस्तीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेकडून २०१८ पासून ...
20/07/2026

एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्थेकडून वस्तीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेकडून २०१८ पासून वस्तीतील गरजू विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे आणि त्यांना शिक्षण घेत असताना उत्साह यावा यासाठी शैक्षणिक साहित्य देण्यात येते. यावर्षी सरगम वस्तीतील ३० विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सक्षम संस्थेचे अध्यक्ष श्री.निखीलजी मुनोत व मानवता संस्थेच्या संस्थापिका सौ. भारती ताई कामठे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व भारत मातेच्या प्रतीमिचे पूजन करून करण्यात आले. शिक्षिका श्रद्धा यांनी एक क्षण आनंदाचा संस्थेचे माहिती व सुरु असलेले प्रकल्प यांची माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांसोबत छान असा प्रेरणादायी अनुभव सांगितला आणि वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे सांगितले. प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मिळालेले साहित्य पाहून विद्यार्थी खूप आनंदी आणि उत्साही झाले. संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जे पण काही लागेल त्याची नक्कीच पूर्तता करण्यात येईल कोणताच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित नाही राहीला पाहिजे

Bharati Kamthe

WE ARE HIRING!Project Coordinator (Female)Organization:Ek Kshan Anandacha Social Organization📍 Job Location:Sukhsagar Na...
10/07/2026

WE ARE HIRING!
Project Coordinator (Female)

Organization:
Ek Kshan Anandacha Social Organization

📍 Job Location:
Sukhsagar Nagar, Near Khandoba Mandir, Katraj, Pune

Position

Project Coordinator (Female Only)

Qualification
MSW (Preferred)
Any Graduate may also apply
Working Hours

🕙 10:00 AM – 6:00 PM

Salary

💰 ₹15,000 per month

Key Responsibilities
Coordinate NGO projects and activities
Maintain project documentation and reports
Communicate with beneficiaries, volunteers, and stakeholders
Organize training programs, workshops, and community events
Support CSR project implementation and monitoring
How to Apply

📞 Contact: 9011372220
📧 Email: [email protected]

Join our team and make a positive impact in the community!

🌟 एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्थाHarbinger Group CSR InitiativeAI Awareness Sessionएक क्षण आनंदाचा सामाजिक संस्थेच्या वती...
18/06/2026

🌟 एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्था
Harbinger Group CSR Initiative

AI Awareness Session

एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्थेच्या वतीने AI Awareness Session चे आयोजन करण्यात आले.

या सत्रासाठी Harbinger Group कंपनीचे प्रतिनिधी श्री. अभिजित गोखले, श्री. संदीप कुलकर्णी आणि सौ. स्नेहल साळुंखे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत करून करण्यात आली.

🔖श्री. अभिजित गोखले यांचे मार्गदर्शन

श्री. अभिजित गोखले यांनी Ai विषयी सविस्तर माहिती देताना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि दैनंदिन जीवनात AI चा प्रभावी वापर कसा करता येतो याबाबत मार्गदर्शन केले. तसेच Ai वापरताना योग्य Prompt कसा द्यावा, माहिती शोधताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात आणि Ai द्वारे मिळालेल्या माहितीचे Verification करूनच तिचा वापर करावा, याबाबत त्यांनी अतिशय सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत माहिती दिली.

🔖श्री. संदीप कुलकर्णी यांचे मार्गदर्शन

श्री. संदीप कुलकर्णी यांनी Ai बद्दल मार्गदर्शन करताना सांगितले की, नवीन कौशल्ये (Skills) आत्मसात करून आणि आपल्या कामामध्ये तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपण भविष्यातील संधींचा लाभ घेऊ शकतो. त्यामुळे AI ची भीती न बाळगता त्याचा सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकार करणे आवश्यक आहे.

🔖सौ. स्नेहल साळुंखे यांचे मार्गदर्शन

सौ. स्नेहल साळुंखे यांनी शेती क्षेत्रामध्ये AI चा होत असलेला वापर याबाबत माहिती दिली. तसेच व्यवसायाचे मार्केटिंग करताना ChatGPT आणि इतर AI साधनांचा प्रभावी वापर कसा करता येतो याविषयी मार्गदर्शन केले.

सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी आणि महिलांनी विविध प्रश्न व शंका उपस्थित करून तज्ज्ञांकडून त्यांचे निरसन करून घेतले.

या सत्राला एकूण ३३ महिला व युवतींची उपस्थिती होते.

कार्यक्रमाच्या शेवटी कु. नम्रता यांनी उपस्थित मान्यवरांचे व सहभागींचे आभार मानले आणि सत्राचा समारोप करण्यात आला.

✨ AI च्या युगात नव्या संधी ओळखून तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी हे सत्र अत्यंत उपयुक्त ठरले.

🧵 एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्थाHarbinger Group CSR Initiativeएक दिवसीय क्रोशा कार्यशाळा🧵 *एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्थ...
13/06/2026

🧵 एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्था

Harbinger Group CSR Initiative

एक दिवसीय क्रोशा कार्यशाळा

🧵 *एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्था यांच्या वतीने एक दिवसीय क्रोशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

🧵 सदर कार्यशाळेसाठी Harbinger Group यांच्या प्रतिनिधी सौ. हर्षदा पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.

🧵 कार्यशाळेची सुरुवात आज्ञा जाधव यांनी संस्थेच्या विविध प्रकल्पांची माहिती देऊन तसेच सौ. हर्षदा पाटील यांचे स्वागत करून केली.

🧵 सौ. हर्षदा पाटील यांनी महिलांना आणि युवतींना क्रोशा कला म्हणजे काय, त्यातून व्यवसाय कसा सुरू करता येतो, उत्पादनांचे मार्केटिंग कसे करावे तसेच होलसेल दरात साहित्य कुठे उपलब्ध होते याबाबत अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले.

🧵 त्यानंतर सहभागींचे गट तयार करून त्यांना क्रोशा वस्तू तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. महिला व युवतींनी अत्यंत उत्साहाने व मनापासून सहभाग घेत विविध कौशल्ये आत्मसात केली.

🧵 कार्यशाळेदरम्यान सौ. हर्षदा पाटील यांनी सहभागींकडून विविध प्रकारच्या क्रोशा कलाकृती तयार करून घेतल्या आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.

🧵 या कार्यशाळेमुळे महिलांना व युवतींना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळाली. या कौशल्याच्या माध्यमातून त्या भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील.

🧵 कार्यशाळेस एकूण ४५ महिला व युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.

🧵 शेवटी प्रणाली वाटकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यशाळेचा समारोप केला.

✨ "कौशल्य विकासातून महिला सक्षमीकरणाकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल" ✨

Ai Awareness session
12/06/2026

Ai Awareness session

🧶 एक दिवसीय क्रोशा (Crochet) कार्यशाळा 🧶एक क्षण आनंदाचा संस्थेकडून मुली आणि महिलांसाठी विशेष क्रोशा बनविण्याची एक दिवसीय...
11/06/2026

🧶 एक दिवसीय क्रोशा (Crochet) कार्यशाळा 🧶
एक क्षण आनंदाचा संस्थेकडून मुली आणि महिलांसाठी विशेष क्रोशा बनविण्याची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

📅 दिनांक: ११ जून २०२६
🕒 वेळ: दुपारी ३.०० ते ५.००
📍 स्थळ: एक क्षण आनंदाचा, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागर नगर, कात्रज, पुणे

👩‍🏫 प्रशिक्षक:
हर्षदा पाटील
(Personal Assistant to Director, Harbinger Group)


शिवराज्याभिषेक दिन अभ्यासिकेत साजरा करण्यात आला.
06/06/2026

शिवराज्याभिषेक दिन अभ्यासिकेत साजरा करण्यात आला.

एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्था व भारत विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पालक व विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणाचा संदेश द...
04/06/2026

एक क्षण आनंदाचा सामाजिक संस्था व भारत विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पालक व विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणाचा संदेश देणारा सीड बॉल निर्मिती कार्यशाळा उत्साहात आयोजित करण्यात आली. या उपक्रमासाठी प्राज कंपनीचे प्रतिनिधी श्री. विवेक सुखटणकर सर, श्री. मनोज कुटाळ सर आणि श्री. दिपक पाटील सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी पद्याने करण्यात व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर श्री. अतुलजी सलाग्रे यांनी सीड बॉल म्हणजे काय, त्याचे पर्यावरणीय महत्त्व काय आहे आणि सीड बॉल तयार करण्याची प्रक्रिया कशी असते याविषयी सविस्तर माहिती दिली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी पालक आणि विद्यार्थ्यांनी मातीचे गोलाकार गोळे तयार करून त्यामध्ये वड, पिंपळ, गुलमोहर यांसारख्या विविध वृक्षांच्या बिया समाविष्ट करून सीड बॉल तयार करण्यात आले. अनेक विद्यार्थी व पालक प्रथमच अशा प्रकारे माती आणि सीड बॉल बनवत होते. त्यामुळे उपक्रमात आनंद, उत्साह आणि शिकण्याचा अनुभव हे सर्वच पाहण्यात आले. छान अशा आनंदायी वातावरणात कार्यशाळा पार पडली.

Address

Upper Indira Nagar
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when एक क्षण आनंदाचा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category