Indian National Congress Doctors cell Pune City

  • Home
  • India
  • Pune
  • Indian National Congress Doctors cell Pune City

Indian National Congress Doctors cell Pune City INC Doctor cell Pune City

14/11/2024
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष मा. श्री. आ. नानाभाऊ पटोले व  सर्व नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली त...
08/11/2024

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष मा. श्री. आ. नानाभाऊ पटोले व सर्व नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष मा. डॉ. मनोज राका सर यांच्या नेतृत्वाखाली काल दिनांक ०३/ ११/ २०२४ रोजी पुणे जिल्हा डॉक्टर सेल च्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार नियोजनाच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली.
डॉक्टरांच्या व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे मुद्दे प्रचारात कसे मांडले जावे तसेच सर्व डॉक्टरांना पक्षाचा अजेंडा राबवण्यात प्रवृत्त कसे करावे यावर डॉ मनोज राका सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच पुणे शहरातील सर्व काँग्रेस व महाविकास आघाडीच्या विधानसभा मतदार संघातील प्रचार प्रसाराचे नियोजनाचा आराखडा मांडण्यात आला.
या बैठकीस काँगेस कमिटी डॉक्टर सेलचे उपस्थित असलेले पदाधिकारी -
डॉ मनोज राका - MPCC डॉक्टर सेल प्रदेशाध्यक्ष
डॉ राहुल सावजी - MPCC डॉक्टर सेल प्रदेश उपाध्यक्ष
डॉ संतोष सिंघवी - MPCC डॉक्टर सेल सेक्रेटरी
डॉ मनस्वी कुमार – उपाध्यक्ष पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
डॉ राहुल सावंत - Cardiologist
डॉ निलेश जगताप – Orthopaedic Surgeon

डॉ सुलक्षणा जगताप
अध्यक्ष पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी

09/05/2024
निर्धार मा.रविंद्रभाऊ धंगेकर यांना लोकसभेत पाठवण्याचा दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी पुणे शहर काँग्रेस कमिटी डॉक्टर सेलची बै...
24/04/2024

निर्धार मा.रविंद्रभाऊ धंगेकर यांना लोकसभेत पाठवण्याचा

दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी पुणे शहर काँग्रेस कमिटी डॉक्टर सेलची बैठक डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.मनोज राका यांच्या मार्गदर्शनात व शहराध्यक्षा डॉ.सुलक्षणा जगताप यांच्या नेतृत्त्वात आयोजित करण्यात आली होती.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व गोवा दिव-दमनचे प्रदेश प्रभारी मा.माणिकरावजी ठाकरे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मा.मोहन दादा जोशी,लोकसभेचे उमेदवार मा.रविंद्रभाऊ धंगेकर,सेल विभाग प्रमुख सौ.प्रज्ञा वाघमारे मॅडम,महिला प्रदेश काँग्रेसच्या संगीताताई तिवारी,डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ सुजित शिंदे,डॉ संतोष सिंघवी व डॉक्टर सेल प्रदेश संघटक डॉ अभिजीत बाबर तसेच आर.जे.संग्राम खोपडे उपस्थित होते.पुणे आय एम ए चे अध्यक्ष डॉ.राजन संचेती यांना सन्मानीत करण्यात आले.तसेच डॉ.मनस्वी कुमार डॉ.आसिया शेख,डॉ.अनिकेत गायकवाड,डॉ.ऐश्वर्या वाघुलकर,डॉ.नम्रता जानू यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.ज्येष्ठ डॉक्टर झंवर सर व सर्जन डॉ सुधीर कोठारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP-SP)यांचे प्रदेश सरचिटणीस ॲड.भगवानराव साळुंखे,NCP-SP डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सुनिल जगताप,डॉ शशिकांत कदम, डॉ.रामदास कुटे,डॉ.राजेंद्र जगताप उपस्थित होते.बैठकीचे व्यवस्थापन डॉ निलेश जगताप यांनी पाहिले तर सूत्र संचालन डॉ.निरज जाधव यांनी केले.

दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी टिळक भवन, दादर येथे झालेल्या लोकसभा मॅनीफेस्टो मिटिंग मध्ये आपले प्रदेशाध्यक्ष मा श्री मनो...
06/04/2024

दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी टिळक भवन, दादर येथे झालेल्या लोकसभा मॅनीफेस्टो मिटिंग मध्ये आपले प्रदेशाध्यक्ष मा श्री मनोज राका सर यांनी अत्यंत प्रभाविपणे वैद्यकीय क्षेत्राशी व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे मुद्दे मांडले होते. मॅनीफेस्टो कमिटी चे सदस्य मा खा श्री .इम्रान प्रतापगडी यांनी सर्वच मुद्यावर चर्चा करून जास्तीतजास्त प्रमाणात मुद्दे मॅनीफेस्टो मध्ये घेण्याचं आश्वासन दिलेले होते त्याप्रमाणे प्रमुख 5 मुद्दे प्रमुख मॅनीफेस्टो मध्ये समाविष्ट केल्याबद्दल मा खा श्री. इम्रान प्रतापगडी यांचे खूप खूप आभार व डॉ मनोज राका सर व डॉक्टर सेल च्या पदाधिकारी यांचं अभिनंदन

Congress For Healthy DemocracyPune City District Congress Doctors cellBharat Jodo Nyay Yatra
19/03/2024

Congress For Healthy Democracy
Pune City District Congress Doctors cell
Bharat Jodo Nyay Yatra

Address

Royal Hospital, Anupam Arcade, Sr. No 84/1A, Pune Satara Road, Katraj
Pune
411046

Telephone

+919422401210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indian National Congress Doctors cell Pune City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share