17/05/2022
"उन्हाळी सुट्टी"
😛😛😛😛
नवरा ऑफिसात असतांना पुण्याची बाई मुलांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी माहेरी जाते.
जेंव्हा नवरा घरी पोहोचतो, त्याला टीवी जवळ एक चिठ्ठी चिकटवलेली मिळते -
👇👇
माहेरी जाते आहे मुलांना घेऊन,
पुढील गोष्टी लक्षात ठेवा - 👇👇
1) - मित्रांना घरी बोलावून घराचा कबाडखाना करु नका. मागच्या वेळी माळ्यावर 8 रिकाम्या बाटल्या सापडल्या होत्या....!!
2) - स्वयंपाक एक तर घरीच करा किंवा बाहेर चेंदुन येत जा, पण बाहेरचे आणून घरात कुणालाही खाऊ घालू नका,
मागच्या वेळी सोफ्याखाली पिज़्ज़ा वाल्याचे बिल सापडले होते, हे माझे घर आहे लॉजिंग बोर्डिंग नाही..!!
3) - चश्मा ड्रेसिंग जवळ ठेवत जा, मागच्या वेळी फ्रीज मध्ये सापडला होता..!!
4) - कामावाल्या माधुरीला पगार देऊन जात आहे.
फुकटात दया-माया दाखवायची काहीच गरज नाही, तुमचे सगळे धंदे मला माहीत आहेत..!!
5) - सकाळी सकाळी उठून शेजाऱ्याना जागवुन पेपर आला कि नाही हे विचारायची काही ही गरज नाही,
आपला पेपरवाला त्यांचा पेपरवाला वेगळा आहे आणि दूधावाला इस्त्रीवाला सुद्धा...!!
6) - तुमच्या चड्ड्या कपाटात खालच्या कप्प्यात आहेत, अन् मुलांच्या वरच्या कप्प्यात. मागच्यासारखं पिन्टयाची चड्डि घालुन जाऊ नका...!!
7) - तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत,
उठ सुठ त्या लेडी डॉक्टरकडे जायची गरज नाही..!!
8) - माझ्या बहिणीचा व वहिनीचा वाढदिवस मागच्या महिन्यातच झाला, रात्री बेरात्री त्यांना फोन/msg करुन उगाच birthday विश करण्याचा चाटेपणा करु नका..!!
9) - वाय-फायचा पासवर्ड बदलला आहे, मुकाट्याने लवकर झोपत जा...!!
10) - जास्त बाहेर फिरु नका कि उड्या मारु नका, कारण शेजारच्या सर्व बाया, वाणीन बाई , जोशी बाई , पाटील ताई , शिंदे वहिनी, पवार ताई सगळ्याच आपापल्या माहेरी जाणार आहेत..!!
11) साखर, पत्ती, कॉफी मागण्याच्या बहाण्याने त्या काळतोंडी करिश्माच्या घरी जाण्याचा विचार सुद्धा करु नका, मी सगळ्या वस्तू डबल करुन ठेवल्या आहेत...!!
आणि सर्वात महत्वाचे.....
👇👇
12) - जास्त ओव्हरस्मार्ट बनण्याचा प्रयत्न करु नका, माझे माहेर ते पुणे दीड तासांत पोहोचता येते.
मनांत आलं तेंव्हा, कोणत्याही वेळी 🕝 परत येऊन तुमच्या छाताडावर दळण दळू शकते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत,
तुमचा बैलपोळा नाही...!!
👱♀
😂😛😜🤪😆😁😉🤓😃