13/08/2026
📍देशमुख वाडी परिसर, सदाशिव पेठ
आपल्या प्रभागातील देशमुख वाडी, वंदे मातरम चौक, सदाशिव पेठ येथील ‘एशियानी अपार्टमेंट’ परिसरात झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. या वाढलेल्या फांद्यामुळे परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला होता, तसेच अनेकांच्या घरामध्ये फांद्या येत असल्याने रहिवाशांची गैरसोय होत होती.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन, नगरसेवक राघवेंद्र बाप्पू मानकर २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत धोकादायक फांद्यांची छाटणी करून परिसर सुरक्षित करण्यात आला आहे.
Raghvendra Bappu Mankar