Karyasiddhi Pratisthan - कार्यसिद्धी प्रतिष्ठाण

  • Home
  • India
  • Pune
  • Karyasiddhi Pratisthan - कार्यसिद्धी प्रतिष्ठाण

Karyasiddhi Pratisthan - कार्यसिद्धी प्रतिष्ठाण Stepping up with society by providing them with a dignified life to maintain peace, prosperity, and harmony in the nation.

भारतीय असंतोषाचे जनक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, महान क्रांतिकारक 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक' यांना स्मृतिदिनी विनम्र अभ...
01/08/2026

भारतीय असंतोषाचे जनक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, महान क्रांतिकारक 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक' यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...
#लोकमान्य_बाळ_गंगाधर_टिळक #लोकमान्य_टिळक

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
01/08/2026

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

गुरू म्हणजे ज्ञानाचा दीप, संस्कारांची शिदोरी आणि यशाचा खरा मार्गदर्शक. सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
29/07/2026

गुरू म्हणजे ज्ञानाचा दीप, संस्कारांची शिदोरी आणि यशाचा खरा मार्गदर्शक.
सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌼
#गुरु #गुरुपौर्णिमा

महाराष्ट्रीय बेंदुर वर्षभर खांद्याला खांदा लावून काबाड कष्ट करणाऱ्या बैलांप्रती सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस!!  #महाराष...
27/07/2026

महाराष्ट्रीय बेंदुर वर्षभर खांद्याला खांदा लावून काबाड कष्ट करणाऱ्या बैलांप्रती सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस!!
#महाराष्ट्रीयबेंदुर #बेंदूर

विठ्ठल नामाचा अखंड गजर,भक्तीचा सागर आणि वारीचा उत्सव…श्री विठ्ठल-रखुमाईची कृपा आपल्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो.आषाढी ...
25/07/2026

विठ्ठल नामाचा अखंड गजर,
भक्तीचा सागर आणि वारीचा उत्सव…
श्री विठ्ठल-रखुमाईची कृपा आपल्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो.
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा! 🌼🙏
#आषाढी #कार्यसिद्धी_प्रतिष्ठान

विठ्ठल नामाचा गजर, भक्तिरसाचा साज आणि सुरेल स्वरांची अविस्मरणीय मैफल! आषाढी एकादशी निमित्त सुप्रसिद्ध गायक श्री. विशाल र...
24/07/2026

विठ्ठल नामाचा गजर, भक्तिरसाचा साज आणि सुरेल स्वरांची अविस्मरणीय मैफल!

आषाढी एकादशी निमित्त सुप्रसिद्ध गायक श्री. विशाल रसाळ यांच्या मधुर भक्तिगायनाचा आनंद लुटण्यासाठी आपण व आपल्या परिवारासह जरूर उपस्थित राहा.

📅 शनिवार, २५ जुलै २०२६
🕢 सायं. ७:३० ते ९:३०
📍 कार्यसिद्धी प्रतिष्ठान, सावंत विहार, कात्रज, पुणे

विठ्ठल नामात रंगूया... भक्तिरसात न्हाऊया! 🚩

#आषाढीएकादशी #विठ्ठल #भक्तीसंगीत #कार्यसिद्धीप्रतिष्ठान #पुणे

3 Lakh Tiffins Delivered. The Journey of Service Continues.
21/07/2026

3 Lakh Tiffins Delivered. The Journey of Service Continues.

राम कृष्ण हरी! 🙏पंढरीच्या वाटेवर भक्तीभावाने, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि "ज्ञानबा-तुकाराम" च्या अखंड जयघोषात ज्ञानेश्वर मा...
11/07/2026

राम कृष्ण हरी! 🙏

पंढरीच्या वाटेवर भक्तीभावाने, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि "ज्ञानबा-तुकाराम" च्या अखंड जयघोषात ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु तुकोबांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. या विलोभनीय सोहळ्यात सहभागी असलेली आणि सध्या पुणे मुक्कामी असणारी दिंडी क्रमांक ३६ काल आमच्या कात्रज येथील 'सावंत विहार' परिसरात दाखल झाली. या मंगलमयी पर्वावर आज सलग दुसऱ्या दिवशी दिंडीतील सर्व वारकरी भाविकांचे मनोभावे व आदरपूर्वक स्वागत करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत श्रद्धेने, भक्तीभावाने आणि आदराने या वारकरी बांधवांची सेवा करण्याची सुवर्णसंधी आम्हास लाभली, ज्याने आम्हा सर्वांचे मन तृप्त झाले. आमच्या कुटुंबात वारकरी सेवेचा हा संस्कार आणि वसा-वारसा अत्यंत श्रद्धेने जपण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. या निस्सीम सेवेतून मिळणारे आत्मीय समाधान आणि विठ्ठल भक्तीचा आनंद खरोखरच शब्दातीत असून, साक्षात विठूरायाच्या चरणी नतमस्तक झाल्याची प्रचिती आम्हा सर्वांना आली.

याच भक्तिमय वातावरणात महाप्रसाद, कीर्तन सेवा व भजनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या भक्ती सोहळ्यासाठी सावंत विहार परिसरातील नागरिक, स्नेहीजन आणि कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठलाच्या चरणी हीच प्रार्थना की, आम्हा सर्वांना अशीच वारकरी सेवा करण्याची सद्बुद्धी आणि शक्ती निरंतर मिळत राहो.

#आषाढी_वारी #वारी #पंढरपूर_वारी #माऊली #तुकाराम_महाराज #वारकरीसेवा #कात्रज #सावंत_विहार #जयहरी_विठ्ठल #संस्कृती #परंपरा #कार्यसिद्धी_प्रतिष्ठान

राम कृष्ण हरी!पंढरीच्या वाटेवर भक्तीभावाने, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि "ज्ञानबा-तुकाराम" च्या जयघोषात ज्ञानेश्वर माऊली व ज...
10/07/2026

राम कृष्ण हरी!

पंढरीच्या वाटेवर भक्तीभावाने, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि "ज्ञानबा-तुकाराम" च्या जयघोषात ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु तुकोबांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. याच सोहळ्यात सहभागी असलेली, आज व उद्या पुणे मुक्कामी असणारी दिंडी क्रमांक ३६ आमच्या कात्रज येथील 'सावंत विहार' परिसरात दाखल झाली. याप्रसंगी दिंडीतील सर्व वारकरी भाविकांचे मनोभावे व आदरपूर्वक स्वागत करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत मनोभावे, श्रद्धेने आणि आदराने वारकरी बांधवांची सेवा करण्याची सुवर्णसंधी मिळाली, ज्याने मन तृप्त झाले. आमच्या कुटुंबात वारकरी सेवेचा हा संस्कार आणि वसा-वारसा अत्यंत श्रद्धेने जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो. या सेवेतून मिळणारे आत्मीय समाधान आणि विठ्ठल भक्तीचा आनंद शब्दातीत असून, साक्षात विठूरायाच्या चरणी नतमस्तक झाल्याचीच प्रचिती आम्हा सर्वांना आली.

आपला नम्र,
गिरीराज तानाजीराव सावंत
संस्थापक, कार्यसिद्धी प्रतिष्ठान, पुणे

​ #आषाढीवारी #वारी #पंढरपूरवारी #माऊली #तुकाराममहाराज #वारकरीसेवा #कात्रज #सावंतविहार #जयहरीविठ्ठल #संस्कृती #परंपरा

पाऊले चालती पंढरीची वाट !संतश्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज पालखी प्रस्थान निमित्त समस्त वारकरी मंडळींना हार्दिक शुभेच्छा...
07/07/2026

पाऊले चालती पंढरीची वाट !

संतश्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज पालखी प्रस्थान निमित्त समस्त वारकरी मंडळींना हार्दिक शुभेच्छा !

#संत_तुकाराम_महाराज #देहू

Address

Katraj
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Karyasiddhi Pratisthan - कार्यसिद्धी प्रतिष्ठाण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Karyasiddhi Pratisthan - कार्यसिद्धी प्रतिष्ठाण:

Shortcuts

Share

Category