Nehru Yuva Kendra Pune

Nehru Yuva Kendra Pune An Autonomous Body Under the
Ministry Of Youth Affairs and Sports, Government of India

28/10/2025
भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या MY Bharat पोर्टलवर आयोजित करण्यात येणारी विकसित भारत क्विझ ही विकसित भ...
16/09/2025

भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या MY Bharat पोर्टलवर आयोजित करण्यात येणारी विकसित भारत क्विझ ही विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग (VBYLD) २०२६ अंतर्गत भारताचे भविष्य घडवणाऱ्या तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेली एक राष्ट्रव्यापी उपक्रम आहे. १२ भाषांमध्ये आयोजित करण्यात येणारी ही क्विझ देशाच्या विविध पैलूंवरील ज्ञान आणि विकसित भारताकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची चाचणी घेते. याचा उद्देश उत्सुकता निर्माण करणे, माहितीपूर्ण सहभागाला प्रोत्साहन देणे आणि प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे आहे.

विजेते स्पर्धक निबंध फेरी, तसेच पुढील सादरीकरण फेरीत जातात, राष्ट्रीय युथ फेस्टिवल मध्ये सहभागी होण्याची सुवर्ण संधी तसेच युवकाच्या कल्पना सामायिक करण्याच्या, नेतृत्व प्रदर्शित करण्याच्या आणि विकसित भारत @२०४७ च्या दृष्टीकोनात अर्थपूर्ण योगदान देण्याच्या संधी मिळवतात.

*क्विझ सूचना*
१. सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आवश्यक नाही.
२. ही क्विझ सर्व नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी खुली आहे परंतु पुढील टप्प्यात पुढे जाण्यासाठी फक्त १५-२९ वयोगटातील (१ सप्टेंबर २०२५ रोजी) तरुणांचा विचार केला जाईल.
३. क्विझमध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नात २-४ पर्याय असतात ज्यात फक्त एकच बरोबर उत्तर असते.

सहभागी होण्यासाठी Link - https://mybharat.gov.in/quiz/quiz_dashboard/UzZIZmhEeWt6bmtzcGg1ZHQ1dWc3QT09

07/09/2025
दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी मेरा युवा भारत पुणे, जिल्हा युवा अधिकारी आशिष संजय शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली  "राष्ट्रीय क्...
03/09/2025

दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी मेरा युवा भारत पुणे, जिल्हा युवा अधिकारी आशिष संजय शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली "राष्ट्रीय क्रिडा दिन" कनिष्ठ महाविद्यालय सोमेश्वर नगर ता. बारामती या ठिकाणी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश युवकांमध्ये मैदानी खेळाविषयी जागृती करणे हा होता. या कार्यक्रमात मुलांना राष्ट्रीय क्रिडा दिन या विषयी माहिती सांगण्यात आली व फिट इंडिया मोहीम अंतर्गत फिट राहण्याची शपथ देण्यात आली. तसेच कबड्डी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जगताप सर, रणजीत ज खामगळ , विशाल कर्चे इत्यादी शिक्षक व युवा, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी my Bharat (nyks) संलग्न युवा मंडळ सोशल विकास फाऊंडेशन व माजी nyv धीरज वायाळ यांनी आयोजनासाठी सहकार्य केले.

पुणे, २१ ऑगस्ट २०२५:युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मेरा युवा भारत (माय भारत) पुणे आणि डेक्कन कॉल...
22/08/2025

पुणे, २१ ऑगस्ट २०२५:
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मेरा युवा भारत (माय भारत) पुणे आणि डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट व संशोधन संस्था, पुणे च्या सहकार्याने भारत सरकारच्या विविध योजनांवर लक्ष केंद्रित करणारी कार्यशाळा यशस्वीरित्या आयोजित केली. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट तरुणांमध्ये प्रमुख सरकारी उपक्रमांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि उपलब्ध संधींचा पुरेपूर वापर करण्यासाठी त्यांना सक्षम करणे हे होते. या कार्यशाळेत विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रदेशातील युवा प्रतिनिधी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते ज्येष्ठ पत्रकार, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचे अभ्यासक, लेखक गजेंद्र बडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले आणि शिक्षण, ग्रामीण, महिला, कौशल्य विकास, उद्योजकता, क्रीडा आणि युवा सक्षमीकरणाशी संबंधित केंद्र सरकारच्या योजनांविषयी माहिती दिली. या योजना त्यांच्या जीवनावर आणि समुदायांवर कसा सकारात्मक परिणाम करू शकतात हे सहभागींना समजावून सांगण्यासाठी परस्परसंवादी सत्रे, केस स्टडी आणि वास्तविक जीवनातील यशोगाथा सामायिक केल्या गेल्या.
या कार्यक्रमात बोलताना, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या जिल्हा युवा अधिकारी आशिष संजय शेटे म्हणाले, "या कार्यशाळेचे उद्दिष्ट तरुणांना त्यांच्या विकासासाठी असलेल्या योजनांची जाणीव करून देणेच नाही तर त्यांचा पूर्ण फायदा घेण्यासाठी त्यांना प्रेरित आणि मार्गदर्शन करणे हे आहे." तसेच स्वप्निल शिंदे कार्यालय सहाय्यक, मेरा युवा भारत पुणे यांनी माय भारत पोर्टल विषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच रजिस्ट्रेशन ड्राईव्ह घेऊन विद्यार्थ्यांना माय भारत पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन केले.
डेक्कन कॉलेजचे कुलगुरू प्रा. प्रसाद जोशी यांनी डेक्कन कार्यक्रमाला शुभेच्छा देताना "कॉलेजसोबतच्या सहकार्याने सत्रात शैक्षणिक मूल्य वाढले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना सरकारी उपक्रमांना वास्तविक जगातील गोष्टी आणि संशोधन संधींशी जोडता येईल." असे मार्गदर्शन केले. तसेच डॉ प्रा निलेश जाधव राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख यांनी डेक्कन कॉलेज आणि मेरा युवा भारत यांच्या संयुक्त उपक्रमाबद्दल माहिती दिली तसेच डेक्कन कॉलेजचे आत्ताच जाहीर युनेस्को वर्ल्ड हेरिटेजद्वारा छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ल्यांचे हेरिटेज लिस्ट मध्ये समावेश करण्यात आला त्याबद्दलच्या कॉलेजच्या योगदानाबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली.

16/07/2025

आज 14 जुलै 2025 रोजी "मेरा युवा भारत"(क्रीडा मंत्रालय भारत सरकार) यांच्या अंतर्गत MyBhart पुणे चे जिल्हा युवा अधिकारी,आश...
16/07/2025

आज 14 जुलै 2025 रोजी
"मेरा युवा भारत"
(क्रीडा मंत्रालय भारत सरकार) यांच्या अंतर्गत
MyBhart पुणे चे
जिल्हा युवा अधिकारी,आशिष शेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू इंग्लिश स्कूल धामारी या ठिकाणी "एक पेड मा के नाम" या कार्यक्रमांतर्गत सुमारे 400 झाडांचे वाटप करण्यात आली.कार्यक्रमासाठी स्कूलचे प्राचार्य सोनवणे सर आणि बजरंग बोरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

*जळगाव सुपे येथे  एक पेड माँ के नाम उपक्रम संपन्न.*मेरा युवा भारत पुणे (युवक कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार ) तसेच ...
16/07/2025

*जळगाव सुपे येथे एक पेड माँ के नाम उपक्रम संपन्न.*
मेरा युवा भारत पुणे (युवक कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार ) तसेच उत्स्फूर्ती फाउंडेशन बारामती यांच्या माध्यमातून न्यू इंग्लिश स्कूल जळगाव सुपे येथे "एक पेड माँ के नाम" हा उपक्रम घेण्यात आला. 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 जून रोजी एक पेड माँ के नाम या उपक्रमाची घोषणा केली. या उपक्रमाच्या माध्यमातून भारत देशातील संपूर्ण विद्यार्थी व नागरिकांनी एक झाड आईच्या नावाने लावायचे व त्याचे संगोपन करायचे. भविष्यातील वाढते तापमान तसेच प्रदूषण रोखण्यात यावे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच शाळेतील सर्व 150 विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक देशी झाडांचे वाटप करण्यात आले. तसेच झाडाचे योग्य संगोपन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी योग्य बक्षीस देण्यात येईल असे सांगण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी पाणी फाउंडेशनचे बारामती तालुका समन्वयक पृथ्वीराज लाड सामाजिक कार्यकर्ते संतोष गुलाबराव जगताप, संतोष प्रल्हाद जगताप, ग्रामपंचायत अधिकारी दीपाली हिरवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी ग्रामस्थ विद्यार्थी व गावातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Address

29/2 SOMWAR PETH, NAGESHWAR Road, Near Bye Jain Temple
Pune
411011

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+912026055053

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nehru Yuva Kendra Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nehru Yuva Kendra Pune:

Share

Category