16/09/2024
Prashant Bhosale यांच्या वॅाल वरून साभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
बातमी 1: सोयाबीन हमीभावाची मर्यादा ओलांडून पुढे गेली आहे...!
बातमी 2: ॲागस्ट 2024 मध्ये खाद्यतेलाची आयात मागील वर्षापेक्षा 16 % ने घटली आहे..
खालील फोटो पहा , ही आहे बारामती तालुक्यात तेलबिया लागवडीखाली वाढलेली जमीन , जवळजवळ गेल्या तीन चार वर्षातजिरायत भागात वीस पट जमीन तेलबिया लागवडीखाली आली आहे.
अगदी संपूर्ण महाराष्ट्र , अगदी देशभर शेतकऱ्यांनी खाद्यतेल तेलबिया शेती अधिकाधिक लागवडीखाली आणली आहे. भुईमूग करडई मोहरी नारळ सूर्यफूल तिळ या तेलबियांच्या पासून तेल गाळण्याचे लाकडी दगडी खाद्यतेल घाणे संपूर्ण देशभर वाढत आहेत.
देशातील बरेपैकी कुटुंबातील महिला पुरूष स्टेनलेस स्टिलचे घरगुती खाद्यतेल घाणे वापरत आहेत. याची किंमत साधारण अठरा ते वीस हजार रूपये आहे.
बहुतांशी शेतकरी , शहरी मध्यमवर्गीय व उच्च श्रीमंत हे शुद्ध खाद्यतेल खात आहेत. जेणेकरून देशाच्या अंतर्गत खाद्यतेल बियांची मागणी वाढत आहे.
सध्या प्रचंड वेगाने वाढत असलेले जीवनशैलीचे आजार जसे मधुमेह हृदयरोग लठ्ठपणा कँसर हाडांचे विकार यास बहुतांशी प्रमाणात खाद्यतेल कारणीभूत आहे.
हे खाद्यतेल म्हणजे सध्या बाजारात मिळत असलेले खाद्यतेल म्हणजे डबल ट्रिपल रिफाईन्ड खाद्यतेल , सोयाबीन तेल , पामतेल , हे सर्व तेल आरोग्यास खूप घातक आहे , नुकसान करणारे आहे.
यामुळे जनमाणसा मध्ये शुद्ध खाद्यतेलाची मागणी खूपच वेगाने वाढत आहे. तशी जनजागृती वेगवेगळ्या हेल्थ प्रोफेशनल्स डॉक्टर्स आरोग्य सल्लागार यांच्या कडून होत आहे.
जसे लोक वर्षाचे धान्य कडधान्य एकदम भरून साठवून ठेवतात , अगदी तसेच आता बरीच कुटुंबे वर्षभर लागणारा भुईमूग करडई तिळ सूर्यफूल भरून ठेवत आहेत, घरात साठा करून ठेवत आहेत. अन् जेव्हा हवे तेव्हा त्या तेलबिया पासून शुद्ध खाद्यतेल स्टेनलेस स्टीलचे घाण्यातून घरातच गाळत आहेत.
अन् निघालेली पेंड जनावरांना शेळ्या गाईगुरे यांना खाऊ घालत आहेत. तिळ व शेंगदाणे पेंडीपासून बरेचसे लोक घरातच गुळ टाकून चिक्की बनवत आहेत.
बरेचसे शहरात खेड्यापाड्यात लाकडी दगडी खाद्यतेल घाणे तरूणांनी सुरू केले आहेत , हे शुद्ध खाद्यतेल ते आजूबाजूला विकतात अन् आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या कडून खाद्यतेल बिया खरेदी करतात.
अशा प्रकारे एक स्थानिक अर्थचक्र तयार झाले आहे, लोकांच्या आरोग्याच्या मध्ये सुधारणा होत आहे , तरूणांना रोजगार मिळत आहे , खाद्यतेल आयातीला लागणारी परकीय गंगाजळी कमी होत आहे, खाद्यतेल आयातीवर लागणारा खर्च कमी होत आहे.
हे काम शेतकरी , तरूण उद्योजक , कृषि विभाग महाराष्ट्र शासन , कृषि विभाग भारत सरकार अतिशय शांतपणे सुप्तपणे करत आहे.
यामुळे कृषि विभाग महाराष्ट्र शासन अधिकारी कर्मचारी व कृषि विभाग भारत सरकार ( केंद्र सरकार ) हे निश्चितच कौतुकास पाञ आहेत.
श्री.प्रशांत भोसले , Bsc(Agri)
भाजपा किसान मोर्चा (कृषि पदवीधर मोर्चा ) ,
महाराष्ट्र प्रदेश ,महाराष्ट्र