NCPSpeaks_Official

Directions

NCPSpeaks_Official Committed to Maharashtra through progressive policies, inclusivity, and collective well-being of all.
(1)

07/10/2026

आदरणीय दादांनी आपल्या कामातून गावागावातील माणसांशी एक विश्वासाचं नातं निर्माण केलं आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी ते कायम उभे राहिले.

हाच आधार पुढेही कायम ठेवत, इथून पुढे लोकांच्या गरजा आणि त्यांच्या प्रश्नांची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याची भावना बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी व्यक्त केली.

आज SIR अंतर्गत २८८ मतदारसंघांतील मतदान यादीचे सखोल पुनर्निरीक्षणासाठी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या २८८ समन्वयकांची दू...
07/10/2026

आज SIR अंतर्गत २८८ मतदारसंघांतील मतदान यादीचे सखोल पुनर्निरीक्षणासाठी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या २८८ समन्वयकांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक प्रदेशाध्यक्ष तथा खासदार मा. श्री. सुनिल तटकरे व मुख्य समन्वयक माजी मंत्री श्री. नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत SIR प्रक्रियेत BLA यांची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका, मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता व अचूकता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सूचित करण्यात आल्या. तसेच २८८ मतदारसंघांमध्ये समन्वय साधून प्रभावीपणे काम करण्याबाबत व तसेच समन्वयकांना येणाऱ्या विविध अडचणी, समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. SIR प्रक्रिया अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक संघटनात्मक नियोजनांवरही यावेळी चर्चा झाली.

प्रसंगी कोषाध्यक्ष तथा आमदार श्री. शिवाजीराव गर्जे, सहसमन्वयक तथा आमदार श्री. अनिल पाटील आणि सर्व समन्वयक दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

📍 राष्ट्रवादी भवन, मुंबई

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ‘जनता संवाद’ उपक्रमांतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातून आलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधण...
07/10/2026

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ‘जनता संवाद’ उपक्रमांतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातून आलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. सहकार मंत्री मा. ना. श्री. बाबासाहेब पाटील यांनी नागरिकांच्या विविध समस्या, प्रश्न आणि अडचणी जाणून घेतल्या.

नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांना प्राधान्याने सोडवून त्यांना दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

📍 राष्ट्रवादी भवन, मुंबई

Babasaheb Patil

जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास आणि राष्ट्रहिताची बांधिलकी जपत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सुरू झालेला मा. पंतप्रधान श्री...
07/10/2026

जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास आणि राष्ट्रहिताची बांधिलकी जपत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सुरू झालेला मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींचा सरकारच्या नेतृत्वाचा प्रवास ते देशाचे पंतप्रधान म्हणून राष्ट्रसेवेपर्यंतची वाटचाल आज २५ वर्षे पूर्ण करत आहे.

गेल्या २५ वर्षांत बदलत्या काळाची गरज ओळखत आधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भरतेला चालना मिळाली, तर जागतिक स्तरावर भारताचे सामर्थ्य आणि प्रभाव अधिक बळकट झाला.

जनसेवेला केंद्रस्थानी ठेवून अविरत सुरू असलेल्या या सेवापर्वाबद्दल मोदीजींचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

……

Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi Ji’s remarkable journey from serving as the Chief Minister of Gujarat to leading India as its Prime Minister marks 25 years of dedicated public service and leadership.

On this significant milestone, the Nationalist Congress Party extends its heartfelt congratulations to Hon’ble PM Shri Narendra Modi ji.

Warmest wishes for his continued service to the nation.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. ना. श्री. छगन भुजबळ यांनी ‘जनता संवाद’ उपक...
06/10/2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. ना. श्री. छगन भुजबळ यांनी ‘जनता संवाद’ उपक्रमांतर्गत आज नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि विविध मागण्यांची त्यांनी दखल घेत निवेदने स्वीकारली.

नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर मा. मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून त्यांना दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

📍 राष्ट्रवादी भवन, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार मा. श्री. सुनीलजी तटकरे यांची नुकतीच भारत सरकार पेट्रोलियम आणि नै...
06/10/2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार मा. श्री. सुनीलजी तटकरे यांची नुकतीच भारत सरकार पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू संसदीय समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोषाध्यक्ष तथा आमदार श्री. शिवाजीराव गर्जे, आमदार श्री. प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार श्री. राहुल मोटे, प्रदेश उपाध्यक्ष श्री. सुरेश बिराजदार, प्रदेश सरचिटणीस श्री. लतीफ तांबोळी, प्रदेश सचिव श्री. गोकुळ शिंदे आणि अल्पसंख्याक उपाध्यक्ष श्री. शफी शेख उपस्थित होते.

📍राष्ट्रवादी भवन, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीजनता संवादबुधवार, दि. ०७ ऑक्टोबर २०२६📍राष्ट्रवादी भवन अ-४ राजगड, मादाम कामा मार्ग, मंत्रालयास...
06/10/2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

जनता संवाद

बुधवार, दि. ०७ ऑक्टोबर २०२६

📍राष्ट्रवादी भवन अ-४ राजगड, मादाम कामा मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई- ४०००३२

महाराष्ट्राच्या प्रगतीला बळ देणारे महत्वपूर्ण निर्णय! आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना ‘मुख्यमंत्री...
06/10/2026

महाराष्ट्राच्या प्रगतीला बळ देणारे महत्वपूर्ण निर्णय!

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना ‘मुख्यमंत्री शौर्यपदक’, अनुसुचित जमातींच्या विध्यार्थ्यांना भत्त्यांमध्ये सुधारणा, वडार समाजाला मोठा दिलासा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडकर स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ,अनुदानित वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ आणि सी. एम सृष्ठी योजनेला मंजुरी देण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

विकास, सामाजिक न्याय आणि जनहिताला प्राधान्य देत महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीला नवी दिशा देणारा आहे.

जनता संवाद’च्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध!राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ‘जनता संवाद’ उपक्रमांत...
06/10/2026

जनता संवाद’च्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ‘जनता संवाद’ उपक्रमांतर्गत राज्यमंत्री मा. ना. श्री. इंद्रनील नाईक यांनी आज नागरिकांशी थेट संवाद साधत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

नागरिकांना शासनाच्या विविध योजना व विभागीय कामांचा लाभ मिळावा, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि विकासकामांना गती मिळावी आणि नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.

जनतेशी संवादातून समस्या समजतात आणि संवेदनशीलतेने केलेल्या पाठपुराव्यातून त्यांचे समाधान होते. नागरिकांचा विश्वास आणि त्यांच्या प्रश्नांचे निराकरण यालाच लोकसेवेचे खरे समाधान मानून कार्यरत राहण्यास कटिबद्ध आहोत.

📍 राष्ट्रवादी भवन, मुंबई

जनतेच्या समस्यांच्या निवारणासाठी तत्पर पाऊल!राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ‘जनता संवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून अन्न व औ...
06/10/2026

जनतेच्या समस्यांच्या निवारणासाठी तत्पर पाऊल!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ‘जनता संवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य मंत्री मा. ना. श्री. नरहरी झिरवाळ यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, प्रश्न आणि अपेक्षा जाणून घेतल्या.

नागरिकांकडून मांडण्यात आलेल्या प्रश्नांची तत्काळ दखल घेत, त्यांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात यासाठी संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

Narhari Zirwal

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCPSpeaks_Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share