22/07/2026
महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील केळी बाजारासमोरील मोकळ्या जागेत वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पार पडला.
स्व. अजितदादा पवार यांनी नेहमीच विकासासोबत पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य दिले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा जपत अधिकाधिक वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचा संकल्प आपण करू.
या वृक्षारोपण कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती मा. प्रकाशदादा जगताप, श्री. संतोष जी नांगरे, संचालक श्री राजाराम दादा कांचन, श्री. शशिकांत दादा गायकवाड, श्री. नाना आबनावे, श्री. अनिरुद्ध भोसले, श्री. मंगेश पठारे, श्री. अरविंद फडतरे, फळे-भाजीपाला विभाग प्रमुख नितीन चोरे, कामगार युनियनचे श्री. विशाल केकाणे, मंडळाचे अध्यक्ष श्री. गणेश झेंडे, श्री. सचिन कांदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्री. प्रदीप देशमुख, श्री. रामदास गाडे, श्री. जयदेव इसवे, श्री. सागर खोत, श्री. अक्षय वायाळ, मल्लू भांगरे, समीर लोखंडे, श्री.शिवाजी काचगुंडे, तसेच नीताताई कुलकर्णी, सुवर्णाताई पवार यांच्यासह बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून स्व. अजितदादा पवार यांना हीच खरी श्रद्धांजली यावेळी उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारत लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला.