Adv. Satish Mulik

Adv. Satish  Mulik सय्यम ही नीती, सक्षम ही कृती, समर्थ हे भविष्य.”
🚩शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

भावपूर्ण श्रद्धांजली…महाराष्ट्राच्या राजकारणातील कणखर, निर्णयक्षम आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व हरपल्याने राज्यावर शोककळा...
28/01/2026

भावपूर्ण श्रद्धांजली…

महाराष्ट्राच्या राजकारणातील कणखर, निर्णयक्षम आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व हरपल्याने राज्यावर शोककळा पसरली आहे. उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने मन अत्यंत व्यथित झाले आहे.

प्रशासनावर मजबूत पकड, अर्थकारणाचा सखोल अभ्यास आणि जनहिताला प्राधान्य देणारे त्यांचे नेतृत्व सदैव स्मरणात राहील. त्यांचे जाणे ही महाराष्ट्रासाठी अपूरणीय हानी आहे.

ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती देवो व पवार कुटुंबीयांसह सर्वांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.

#भावपूर्ण_श्रद्धांजली

सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार..!लोकशाहीचा आदर करत सर्वांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले याबद्दल सर्व मतदार बंधू व भ...
15/01/2026

सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार..!

लोकशाहीचा आदर करत सर्वांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले याबद्दल सर्व मतदार बंधू व भगिनी यांचे मनःपूर्वक आभार ! त्याचबरोबर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे राबवणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांचे व पोलिस प्रशासनाचेही शतशः आभार !

13/01/2026

न भिता, न दहशत घेता..
निःसंकोच मतदान करा!

लोकशाहीत मतदान हा तुमचा मूलभूत अधिकार आहे. कोणत्याही दबावाला, धमकीला किंवा अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करा. प्रभाग क्रमांक ५, वडगाव शेरी येथील जागरूक नागरिकांनी आपला हक्क बजावून परिवर्तनाच्या दिशेने ठाम पाऊल टाकावे.

तुमचे मत—तुमचा आवाज,
तुमचा आवाज—प्रभागाचा भविष्य!

Aditya Shirodkar - आदित्य शिरोडकर
Sanjay More
Sachin Ahir
Sushama Andhare
Gajanan Tharkude

🚩 #वडगावशेरी #प्रभाग_क्रमांक_५

प्रभाग ५ मध्ये परिवर्तनाचा निर्धार ..चौक सभेतून विकासाचा एल्गार!पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूम...
12/01/2026

प्रभाग ५ मध्ये परिवर्तनाचा निर्धार ..चौक सभेतून विकासाचा एल्गार!

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५, वडगाव शेरी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य चौक सभा उत्साहात पार पडली. नागरिकांची मोठी उपस्थिती, कार्यकर्त्यांचा जोश आणि परिवर्तनाची आस यामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला.

या सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव, आमदार सचिन अहिर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी सडेतोड मार्गदर्शन केले. त्यांच्या स्पष्ट, ठाम आणि विकासाभिमुख विचारांनी उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये नव्या आशेचा, विश्वासाचा आणि लढ्याच्या आत्मविश्वासाचा संचार झाला. ही सभा केवळ भाषणांची नव्हे, तर लोकांच्या प्रश्नांना थेट ऐकून घेणारी, त्यांच्या अपेक्षांना वाचा फोडणारी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची ठोस दिशा ठरवणारी ठरली. पाणी, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य व सुरक्षितता या मूलभूत प्रश्नांवर पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराची ग्वाही देण्यात आली.

मशाल आणि हाताचा पंजा या चिन्हांना मतदान करून प्रभाग क्रमांक ५ मध्ये परिवर्तन घडवा.
विकास, पारदर्शकता आणि लोकांच्या हितासाठी एकजुटीने पुढे चला, असे भावनिक व ठाम आवाहन यावेळी करण्यात आले.

Aditya Shirodkar - आदित्य शिरोडकर
Sanjay More
Sushama Andhare
Sachin Ahir
Gajanan Tharkude

🚩 #वडगावशेरी #प्रभाग_क्रमांक_५

11/01/2026

प्रभाग_ ५
#वडगाव_शेरी
#परिवर्तन

वडगाव शेरी प्रभागात कचरा आणि ड्रेनेजच्या समस्यांनी नागरिकांचे जगणे अक्षरशः कठीण झाले आहे. वेळेवर कचरा उचलला जात नाही, कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी, डास व आजारांना निमंत्रण मिळत आहे. दुसरीकडे ड्रेनेज लाईन वारंवार तुंबते, सांडपाणी रस्त्यावर वाहते आणि पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होते. या समस्या केवळ तात्पुरत्या उपायांनी सुटणाऱ्या नाहीत; त्यासाठी नियोजन, देखरेख आणि सातत्याने पाठपुरावा करणारा सक्षम स्थानिक प्रतिनिधी आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याशी आणि स्वच्छतेशी तडजोड न करता ठोस उपाय करणारा नगरसेवक हवा, जो कचरा व्यवस्थापन आणि ड्रेनेज सुधारणा प्रत्यक्षात आणेल. या बदलासाठीच येणाऱ्या निवडणुकीत मशाल आणि हात या चिन्हाचे बटन दाबून जनता जनार्दन आम्हाला बहुमताने विजयी करेल, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

Aditya Shirodkar - आदित्य शिरोडकर
Sachin Ahir
Sushama Andhare
Sanjay More
Gajanan Tharkude

🚩 #वडगावशेरी #प्रभाग_क्रमांक_५

11/01/2026

वडगावशेरी प्रभागाच्या विकासाची व्यथा…
#प्रभाग_५

संकल्प स्पष्ट आहे..वडगावशेरीचे स्वयंघोषित कारभारी बदलण्याचा आणि खऱ्या अर्थाने विकास करणारे नवे नेतृत्व प्रभागात आणण्याचा!

Sachin Ahir
Aditya Shirodkar - आदित्य शिरोडकर
Sanjay More
Sushama Andhare
Gajanan Tharkude

🚩 #वडगावशेरी #प्रभाग_क्रमांक_५

11/01/2026

प्रभाग ५, वडगाव शेरी मधील फुटपाथ प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार!

Aditya Shirodkar - आदित्य शिरोडकर
Sanjay More
Sushama Andhare
Sachin Ahir
Gajanan Tharkude

🚩 #वडगावशेरी #प्रभाग_क्रमांक_५

चौक सभा..जनतेशी थेट संवाद! पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक ५, वडगाव शेरी येथे शिवसेना (...
10/01/2026

चौक सभा..जनतेशी थेट संवाद!

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक ५, वडगाव शेरी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ चौक सभेचे आयोजन!

Aditya Shirodkar - आदित्य शिरोडकर
Sanjay More
Sushama Andhare
Sachin Ahir
Gajanan Tharkude

🚩 #वडगावशेरी #प्रभाग_क्रमांक_५

10/01/2026

प्रभाग_५ | वडगाव शेरी

परिवर्तन अटळ आहे..

प्रभागात चांगले रस्ते आणि ड्रेनेज लाईन करण्यासाठी कटीबद्ध!

Sachin Ahir
Sushama Andhare
Gajanan Tharkude
Aditya Shirodkar - आदित्य शिरोडकर
Sanjay More

🚩 #वडगावशेरी #प्रभाग_क्रमांक_५

परिवर्तन अटळ आहेत..प्रभाग_०५वडगाव शेरी पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ५ मधील काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र शिरसाठ तसेच श...
09/01/2026

परिवर्तन अटळ आहेत..

प्रभाग_०५
वडगाव शेरी

पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ५ मधील काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र शिरसाठ तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार सौ. सविता राऊत आणि ऍड.सतीश (आप्पा ) मुळीक यांच्या प्रचारार्थ वडगावशेरी येथे भव्य जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला मा. गृह राज्य मंत्री तथा आमदार ऍड. सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Aditya Shirodkar - आदित्य शिरोडकर
Sanjay More
Sushama Andhare
Sachin Ahir
Gajanan Tharkude

🚩 #वडगावशेरी #प्रभाग_क्रमांक_५

09/01/2026

नागरिकांची सर्वात मूलभूत गरज म्हणजे पाणी. पाणी हे जीवन आहे आणि तेच जर वेळेवर, पुरेसे व स्वच्छ उपलब्ध होत नसेल, तर स्थानिक प्रतिनिधी आणि शासनाचा उपयोग काय? वर्षानुवर्षे पाण्याच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या वडगाव शेरी प्रभागातील नागरिकांना आता केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष काम करणारा, प्रश्न समजून घेणारा आणि त्यासाठी लढणारा नगरसेवक हवा. त्यामुळेच वडगाव शेरी प्रभाग ५ च्या सर्वांगीण बदलासाठी एक संधी आम्हाला द्या!

Aditya Shirodkar - आदित्य शिरोडकर
Sanjay More
Sushama Andhare
Sachin Ahir
Gajanan Tharkude

🚩 #वडगावशेरी #प्रभाग_क्रमांक_५

Address

Adv Satish Mulik Public Relations Office, Opp Datta Mandir, Vadgaon Sheri
Pune
411014

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Satish Mulik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Adv. Satish Mulik:

Share