24/08/2026
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील
कलम 155 येथील तरतुदीच्या अनुषंगाने सर्व
क्षेत्रीय अधिकारी/प्राधिकारी यांना दिशा निर्देश
देण्याबाबत...
महाराष्ट्र शासन
महसूल विभाग,
शासन परिपत्रक क्र.संकीर्ण-2026/प्र.क्र.80/जमीन-01अ
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
1 ला मजला, (मुख्य इमारत), मंत्रालय, मुंबई -400 032
दिनांक:- 19 ऑगस्ट, 2026
प्रस्तावना
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील कलम 155 मध्ये लेखन प्रमादाची दुरुस्तीकरण्याविषयी तरतूद करण्यात आलेली आहे. सदर तरतुदीनुसार लेखन प्रमादाविषयीचे अधिकारजिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र जमन महसूल संहिता, 1966 च्या कलम १५५ मधील तरतूद पुढीलप्रमाणे आहे :-
“कोणतेही लेखन प्रमाद किंवा अधिकार अभिलेखात किंवा या
प्रकरणांन्वये ठेवण्यात आलेल्या नोंदव्हीत ज्या चुका झाल्या असल्याचे
हितसंबंधीत पक्षकारांनी कबूल केले असेल किंवा ज्या चुका एखाद्या महसूल
अधिकाऱ्यास, तो निरीक्षण करीत असताना आढळतील अशा कोणत्याही चुका
जिल्हाधिकाऱ्यास कोणत्याही वेळी दुरुस्त करता येतील किंवा दुरुस्त करवून
घेता येतील:
परंतु, जेव्हा एखाद्या महसूल अधिकाऱ्यास, तो निरीक्षण करीत असताना,
कोणतीही चूक आढळून आली असेल, तेव्हा पक्षकारांना नोटीस देण्यात
आल्याशिवाय व वादग्रस्त नोंदींसंबंधीच्या कार्यपद्धतीनुसार कोणत्याही हरकती
असल्यास त्या हरकती अंतिमरित्या निकालात काढल्याशिवाय अशी कोणतीही
चूक दुरुस्त करता येणार नाही.”
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १५५ मधील तरतुदींचा गैरवापर होतअसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे उक्त नमूद अधिकाराचा वापरकरण्याबाबत अधिक स्पष्टता येण्याकरीता कलम 155 येथील तरतुदींच्या वापराबाबत क्षेत्रीयअधिकारी/प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने, शासनाकडूननिर्देश जारी करण्याचे प्रस्तावित आहे.
शासन परिपत्रक
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील कलम 155 येथील उपरोक्त नमूद तरतूदीच्या
अनुषंगाने, पुढीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत:-
1. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 चे कलम 13(3) नुसार शासन आदेश क्रमांक युएनएफ-1447 (इ)-आर, दिनांक 14 ऑगस्ट, 1967 सोबतच्या अनुसूची मधील अनुक्रमांक 19 नुसार कलम 155 च्या सर्व शक्ती तहसीलदारांना प्रदान करण्यात आल्या आहेत.
2. तहसीलदार यांनी कलम 155 अंतर्गतचे अधिकार प्रदान करण्याबाबतच्या वरील आदेशात सुधारणा करण्यात येत असून सर्व जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 155 अंतर्गतचे अधिकार तहसीलदार, नगर भूमापन अधिकारी किंवा यथास्थिती उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना खालील निबंधांसह पुनप्रदान करावेत.
अ) जिल्हाधिकारी यांनी सदरचे अधिकार प्रदान करताना अधिकार अभिलेखात
किंवा प्रकरण १० नुसार ठेवण्यात आलेल्या नोंदव्हीत केवळ खातेदाराचे नावातील
चूक, गट नंबर किंवा सर्वे नंबर किंवा नगर भूमापन क्रमांक लिहिताना झालेली
अंकांची अदलाबदल, जमिनीचे क्षेत्र लिहिताना होणारी चूक, एखाद्या खातेदाराचे
नाव चुकून वगळले जावे किंवा टायपिंग मुळे चुकीचे लिहिलेले असवे, मूळ
आशयात बदल न होता केवळ लेखन प्रक्रियेत राहून गेलेली मानवी किंवा तांत्रिक
चूक दुरुस्त करण्याचे अधिकार प्रदान करावेत. संहितेच्या कलम १०६ नुसार चुका
दुरुस्त करण्याबाबतची तरतूद, तसेच कलम २४७ किंवा २५७ नुसार अपील किंवा
पुनरीक्षण करणे अपेक्षित असलेल्या विषयाकरिता कलम १५५ खाली दुरुस्त न
करण्याबाबत सुद्धा ताकीद देण्यात येत असल्याची बाब पुनप्रदान आदेशात नमूद
करावी.
आ) कलम १५५ अंतर्गत अधिकार प्रदान करण्यात आलेले संबंधित तहसीलदार,
नगर भूमापन अधिकारी, उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना लगतच्या वरिष्ठ
अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीने असेल ते खेरीज करून पाच वर्षांपेक्षा जास्त जुना
लेखन प्रमाद दुरुस्त करण्यासंबंधात कलम १५५ अन्वये कोणतीही कारवाई सुरू
करता येणार नाही. यास्तव पाच वर्षांपेक्षा जास्त जुना लेखन प्रमाद दुरुस्त
करण्यासाठी तहसीलदार यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी तर नगर भूमापन
अधिकारी व उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांनी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख
यांची पूर्वपरवानगी घेऊनच असे लेखन प्रमाद दुरुस्त करावेत.
इ) ज्या जमिनीच्या बाबतीत हस्तांतरणास निबंध आहेत किंवा अशी चूक दुरुस्त
केल्यास शासनाच्या महसुलावर विपरीत परिणाम होणार आहे, अधिकार
अभिलेखात शासनाच्या विविध विभागांच्या नावावर असलेल्या जमिनी, स्थानिक
स्वराज्य संस्था, राज्य शासनाच्या अंगीकृत सार्वजनिक प्राधिकरणाच्या नावावर
असलेल्या जमिनीच्या बाबतीत असे अधिकार प्रदान करण्यात येऊ नये.
02. उपरोक्त निर्देशानुसार सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी आवश्यक ती कारवाई करावी. तसेच सदर निर्देश त्यांच्या अधीनस्थ सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व उप अधीक्षक, भूमी अभिलेख, सर्व तहसीलदार आणि सर्व नगर भूमापन अधिकारी यांचे निदर्शनास आणावेत. सदर निर्देशांची सर्व संबंधितांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
03. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध करणेत आले असून त्यांचा संगणक सांकेतांक क्रमांक
202608191800446448 असा आहे. हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून
काढण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाचे अधिकृत सरकारी संकेतस्थळ. विभागीय माहिती, नागरिक सेवा, सरकारी योजना, शासन निर्णय आणि ऑनलाईन से.....