Pune Vikas va Lok kalyan Samiti

Pune Vikas va Lok kalyan Samiti Pune City should be No.1 City in India

भारतातील सामाजिक परंपरेला आव्हान देत पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवाद...
03/01/2024

भारतातील सामाजिक परंपरेला आव्हान देत पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन !!!

पुणे शहरातील ६ ते १३ वर्षे वयोगटातील सर्व मुलींना शिक्षण मिळालेच पाहिजे हा उद्देश श्री. सुधीर मांडके यांचा आहे. या प्रक्रियेमध्ये जात, वर्ण, धर्म यांचे बंधन नाही. मुलगी कोणत्याही धर्माची असो, हिंदू किंवा मुस्लिम किंवा ख्रिश्चन, ती शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून 'मांडके ह्युमन हॅप्पीनेस फाउंडेशन'च्या पुढाकाराने आणि 'पुणे विकास व लोक कल्याण समिती'च्या माध्यमातून गेली काही वर्षे काम सुरु आहे. पुणे शहरातील अनेक समस्यांपैकी एक शिक्षणापासून दूर असणारी मुले ही आहे. याबाबत लवकरच शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण अधिकारी, पुण्यातील शिक्षण विषयामधील जाणकार नागरिक यांची एक बैठक होणार आहे.

आज संत गाडगेबाबा महाराज यांचा स्मरणदिन (२० डिसेंबर),संत गाडगेबाबा यांची महाराष्ट्राला ओळख आहे ती त्यांच्या प्रबोधनपर कीर...
20/12/2023

आज संत गाडगेबाबा महाराज यांचा स्मरणदिन (२० डिसेंबर),
संत गाडगेबाबा यांची महाराष्ट्राला ओळख आहे ती त्यांच्या प्रबोधनपर कीर्तनांमुळे. सार्वजनिक स्वच्छता हा त्यांचा हातखंडा विषय. आपल्या कीर्तनातून गाडगेबाबा लोकांना वैयक्तिक, सार्वजनिक आयुष्यातील स्वच्छतेसाठी आवाहन करत. स्वच्छता आणि आरोग्य या दोन गोष्टी एकमेकांवर कशा अवलंबून आहेत? त्यांचे महत्व माणसांच्या आयुष्यात किती आणि कसे आहे? याबाबत ते उदाहरणे देऊन सविस्तर विश्लेषण करत. सोबतच शिक्षणाचे महत्व, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, तंटामुक्ती या आणि अशा विविध विषयांवर जनजागृती करण्यासाठी त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातून भ्रमण केले.

साधी राहणी, उच्च विचार याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून गाडगेबाबांकडे पहिले जाते. 'पुणे विकास व लोक कल्याण समिती' कडून सुद्धा स्वच्छता आणि आरोग्य या विषयांवर काम चालू आहे. संत गाडगेबाबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव आहेत.

प्रेस कॉन्फरन्स दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ पत्रकार भवन पुणे
30/11/2023

प्रेस कॉन्फरन्स दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ पत्रकार भवन पुणे

Address

Mandke House, Model Colony, Shivaji Nagar, Near Om Super Market
Pune
411016

Opening Hours

Monday 10am - 6:30pm
Tuesday 10am - 6:30pm
Wednesday 10am - 6:30pm
Thursday 10am - 6:30pm
Friday 10am - 6:30pm
Saturday 10am - 6:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Vikas va Lok kalyan Samiti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category