पुस्तकांचं गाव, भिलार

  • Home
  • India
  • Pune
  • पुस्तकांचं गाव, भिलार

पुस्तकांचं गाव, भिलार भारतातील पहिलं आगळंवेगळं 'पुस्तकांचं गाव'!

पुस्तकांचं गाव, भिलार प्रकल्पाचा ९ वर्धापन दिनवाचनसंस्कृतीची जोपासना करणारे, वाचन संस्कृतीची प्रेरणा देणारे महाबळेश्वर त...
06/05/2026

पुस्तकांचं गाव, भिलार प्रकल्पाचा ९ वर्धापन दिन
वाचनसंस्कृतीची जोपासना करणारे, वाचन संस्कृतीची प्रेरणा देणारे महाबळेश्वर तालुक्यातील निर्सगाच्या कुशीत वसलेले भारतातील पहिले पुस्तकांचं गाव, भिलार. हा प्रकल्प आपला ९ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्थेने लावलेले वाचनसंस्कृतीचे रोपटे आता बहरु लागले आहे.
दि. ०४ मे २०१७ रोजी सुरु झालेला प्रकल्प आज ३५ ठिकाणी प्रकल्प कार्यरत आहे. ग्रामस्थांनी आपल्या घरातील जागा विनामोबदला प्रकल्पासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. ज्यामध्ये शाळा, मंदीरे, घरे, लॉजेस अशा ठिकाणांचा समावेश आहे. लवकरच आणखी ५ नवीन दालनांची वाढ होणार आहे. ‘शासनाचा पुढाकार आणि लोकांचा सहभाग’ हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
दि. ०४ मे २०२६ रोजी वर्धापन दिनानिमित्त किसनवीर महाविद्यालय, वाई येथील मा. प्रा.डॉ. संग्राम थोरात यांचे ‘वाचनसंस्कती’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. वाचक /पर्यटकांना आपली अविरत अखंड वाचनसेवा देणारे, ग्रामस्थांचा उत्साह, औदार्य आणि आदरातिथ्य यांची अनुभूती देणारे पुस्तकांचं गाव, भिलार दि. ०४ मे, २०२६ रोजी आपला ९ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. वाचनसंस्कृतीला प्रेरणा देणाऱ्या या प्रकल्पाची दशकपूर्तीकडे वाटचाल सुरु आहे. शेकडो वाचक/पर्यटकांनी नावाजलेला, हजारो मान्यवरांच्या कौतुकास पात्र ठरलेला हा प्रकल्प... आपण सर्वांनी नक्की भेट द्या!...
प्रकल्पाच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!...

अभिजात मराठी भाषा गौरव दिनदि. २७ फेब्रुवारी हा कविवर्य वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी  भाषा गौरवदिन...
05/03/2026

अभिजात मराठी भाषा गौरव दिन
दि. २७ फेब्रुवारी हा कविवर्य वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा केला जातो. पुस्तकांचं गाव, भिलार येथे प्रकल्प कार्यालयाच्या वतीने अभिजात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण प्रशासन विकास प्रबोधिनी ‘यशदा’ च्या ४४ वैद्यकीय प्रशिक्षणार्थी अधिकारी व सत्र-संचालिका श्रीमती स्वाती कुलकर्णी यांनी क्षेत्रभेटीच्या निमित्ताने पुस्तकांचं गाव, भिलार प्रकल्पास भेट दिली. अभिजात मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कवितांचे काव्यवाचन केले. १९ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे सादरीकरण करुन मराठी भाषेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. योगायोगाने यशदाचे उप-महासंचालक मा.श्री. मंगेश जोशी (भा.प्र.से) यांनी पुस्तकांचं गाव, प्रकल्पास भेट दिली. प्रकल्पाचा माहितीपट पाहून प्रकल्पातील निवडक दालनांना भेट दिल्या. कवितेचे सादरीकरण केलेल्या डॉक्टरांना यशदाचे उप-महासंचालक मा. श्री. जोशी सरांच्या हस्ते पुस्तके भेट देण्यात आली.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र गीताचे सामुहिक गायन केले. त्यानंतर सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रकल्प कार्यालयापासुन जिल्हा परिषद केंद्र शाळेपर्यंत पदयात्रा काढली. यशदाचे उप-महासंचालक मा. श्री. मंगेश जोशी (भा.प्र.से) यांनी केंद्रशाळेमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.

Address

पुस्तकांचं गाव , पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावर पाचगणीच्या पुढे ३ कि. मी
Pune
412805

Telephone

02168-250111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पुस्तकांचं गाव, भिलार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category