30/07/2026
*🚨 अत्यंत महत्त्वाची सूचना 🚨*
*सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहर*
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कथित बनावट पदवी प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच दोषींवर कठोर कारवाई, निष्पक्ष चौकशी आणि विद्यार्थ्यांचा विद्यापीठावरील विश्वास कायम ठेवण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहर यांच्या वतीने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
📅 दिनांक: 31 जुलै 2026 (शुक्रवार)
🕓 वेळ: सायंकाळी 4:00 वाजता
📍 ठिकाण: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, परीक्षा व मूल्यमापन मंडळ (Examination Department), पुणे.
*✊ आंदोलनातील प्रमुख मागण्या*
• दोषींवर कठोर कारवाई करून संबंधितांना तात्काळ निलंबित करावे.
• रजिस्ट्रार प्रफुल्ल पवार व परीक्षा संचालक राजेंद्र तलवारे यांची हाकलपट्टी करावी.
• चौकशी समितीत परीक्षा विभागातील एकाही अधिकाऱ्याचा समावेश नसावा.
• मागील १० वर्षांतील डुप्लिकेट पदव्यांची स्वतंत्र तज्ज्ञ समितीकडून सखोल चौकशी करावी.
• विद्यापीठाने संलग्न सर्व महाविद्यालयांना या प्रकरणाबाबत अधिकृत परिपत्रक जारी करावे.
*सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहर*
यांच्या आवाहनानुसार खालील सर्व आघाड्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहर
वंचित बहुजन आघाडी, पुणे शहर
वंचित बहुजन युवा आघाडी, पुणे शहर
वंचित बहुजन महिला आघाडी, पुणे शहर
वंचित बहुजन माथाडी आघाडी, पुणे शहर
वंचित बहुजन रेल्वे कामगार युनियन, पुणे शहर
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी आणि विद्यापीठाची विश्वासार्हता जपण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहूया.
*✊ जय भीम! जय संविधान! 💙*