Atul Nanasaheb Sh*tole

Atul Nanasaheb Sh*tole मा. नगरसेवक व मा. स्थायी समिती अध्यक्ष

आधुनिक स्मार्ट कार्ड शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..! ज्येष्ठ नागरिक, महिला व प्रवाशांसाठी सवलतीच्या प्रवासाचा...
21/05/2026

आधुनिक स्मार्ट कार्ड शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

ज्येष्ठ नागरिक, महिला व प्रवाशांसाठी सवलतीच्या प्रवासाचा लाभ आता अधिक सोपा - NCMC स्मार्ट कार्ड वितरण उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

अतुल नानासाहेब शितोळे जनसंपर्क कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या “आधुनिक स्मार्ट कार्ड शिबिराला” नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.
एस.टी. प्रवासासाठी आवश्यक असलेले NCMC स्मार्ट कार्ड नागरिकांना सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देत शासनाच्या विविध सवलत योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत सहभाग नोंदविला. नागरिकांच्या सोयीसाठी अशा लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन यापुढेही सुरू राहील.

Pune Janseva

पराक्रमी योद्धा, एकही युद्ध न हरणारे स्वराज्य रक्षक, ज्वलंत-कीर्तिमंत असे धर्मवीर, शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महारा...
14/05/2026

पराक्रमी योद्धा, एकही युद्ध न हरणारे स्वराज्य रक्षक, ज्वलंत-कीर्तिमंत असे धर्मवीर, शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम..!

#धर्मवीर_संभाजीमहाराज #संभाजीमहाराज
#छत्रपतीसंभाजीमहाराज #शिवपुत्र #धर्मवीर

11/05/2026

तब्बल २८ वर्षांपूर्वीच्या माझ्या लग्नाचे आमंत्रणपत्र आजही जपून ठेवून भेटायला आलेल्या शेख साहेबांचे मनःपूर्वक आभार.

वर्षानुवर्षे एखादी गोष्ट जपून ठेवणे म्हणजे फक्त आठवण जपणे नसते, तर त्या नात्यावरील प्रेम आणि आपुलकी मनात जिवंत ठेवणे असते.
आज शेख साहेबांनी जपून ठेवलेले ते आमंत्रणपत्र पाहून मन खरंच भावूक झालं.

माणसं जोडताना मिळालेलं हे प्रेम आणि विश्वास हीच आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे.

#जुनीआठवण #अमूल्यनाती #आपुलकी #विश्वास #मैत्री

आई म्हणजे संस्कारांची शिदोरी,त्याग, माया आणि प्रेरणेचं अखंड विद्यापीठ… समाज घडवताना, संस्कार रुजवताना आणि प्रत्येक पिढील...
10/05/2026

आई म्हणजे संस्कारांची शिदोरी,
त्याग, माया आणि प्रेरणेचं अखंड विद्यापीठ…

समाज घडवताना, संस्कार रुजवताना आणि प्रत्येक पिढीला योग्य दिशा देताना आईचं योगदान अमूल्य आहे.
जगातील प्रत्येक मातेला मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#मातृदिन #आई #संस्कार

दादांचा विश्वास, जनतेचा कौल..!मा. सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांची बारामती पोटनिवडणुकीत आमदारपदी ऐतिहासिक मताधिक्याने ...
04/05/2026

दादांचा विश्वास, जनतेचा कौल..!

मा. सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांची बारामती पोटनिवडणुकीत आमदारपदी ऐतिहासिक मताधिक्याने निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!

अखंड विश्वाला सत्य, शांती व मानवतेची शिकवण देणारे..!भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा..!  #बुद्धपौर्णिमा  #ग...
01/05/2026

अखंड विश्वाला सत्य, शांती व मानवतेची शिकवण देणारे..!

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा..!

#बुद्धपौर्णिमा #गौतमबुद्ध #सत्य #शांती #मानवता

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा..!महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त सर्वां...
01/05/2026

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा..!

महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#महाराष्ट्रदिन #शुभेच्छा #कामगारदिन

30/04/2026

स्मार्ट कार्ड शिबीर — प्रवाशांसाठी मोठी सुवर्णसंधी!

महाराष्ट्र राज्य परिवहन प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवासासाठी आता स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. स्मार्ट कार्ड नसल्यास पूर्ण भाडे आकारले जाणार असल्यामुळे सर्व नागरिकांनी या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा.

मा. अतुल नानासाहेब शितोळे जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित या शिबिरात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आपले स्मार्ट कार्ड तात्काळ तयार करून घ्या. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि प्रवाशांसाठी विविध सवलतींचा लाभ घेण्याची ही उत्तम संधी आहे.

सुविधा जनतेसाठी, सेवा प्रत्येक घरापर्यंत!

ॐ उग्रं वीरं महाविष्णं ज्वलन्तं सर्वतोमुखम् ।नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युमृत्युं नमाम्यहम् ॥शितोळे कुटुंबाचे कुलदैवत भगवान...
30/04/2026

ॐ उग्रं वीरं महाविष्णं ज्वलन्तं सर्वतोमुखम् ।
नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युमृत्युं नमाम्यहम् ॥

शितोळे कुटुंबाचे कुलदैवत भगवान श्री नृसिंह जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

हाय अलर्ट l उष्णतेच्या काळात सावध रहा… सुरक्षित रहा!29 एप्रिल ते 12 मे दरम्यान तापमान 45°C ते 55°C पर्यंत जाण्याची शक्यत...
29/04/2026

हाय अलर्ट l उष्णतेच्या काळात सावध रहा… सुरक्षित रहा!

29 एप्रिल ते 12 मे दरम्यान तापमान 45°C ते 55°C पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.

विशेषतः सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळा. पुरेसे पाणी, ताक, दही, लिंबूपाणी यांसारखे द्रवपदार्थ घ्या आणि शरीर हायड्रेट ठेवा.

घरात वायुवीजन ठेवा, दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवा. तब्येत बिघडल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वाहनांमध्ये लाईटर, परफ्यूम, बॅटरी उपकरणे किंवा गॅस साहित्य ठेवणे टाळा. तसेच साप, विंचू यांसारखे प्राणी थंड जागा शोधण्यासाठी घराजवळ येऊ शकतात, त्यामुळे सतर्क राहा.

स्वतःची काळजी घ्या… आणि ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा.

Address

Sh*tole Chowk, Old Sangvi
Pune
411027

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atul Nanasaheb Sh*tole posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share