Chhatrapati Shivaji Raje Bhosle

Chhatrapati Shivaji Raje Bhosle Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chhatrapati Shivaji Raje Bhosle, Library, Pune.

25/01/2020
24/01/2020

आज त्या महाबलाढ्य नेत्याचा स्मृतिदिन आहे ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे निशाण, दिमतीला विश्वासू मंत्री व माणसे व " #राजमुद्रा" दिली. ते महान सेनापती होते महाबली सरलष्कर शहाजी राजे महाराजसाहेब. शहाजीराजे ह्यांच्या अफाट शौर्यपूढे तब्बल सहा वर्षे आदिलशाही व मोगलांच्या संयुक्त फौजांना दाती तृण धरावे लागले. आदिलशाही असो वा मोगल असो, कैद केलेल्या प्रत्येक सरदार किंवा पाळेगार राजांचे हे क्रूर सुलतान दरबारात खून पाडीत वा मृत्युदंड देत. विशेष म्हणजे ह्याला अपवाद फक्त अन फक्त शहाजीराजे होते. ह्यावरून त्यांची ताकद व त्यांचे मराठा मंडळावरील वर्चस्व आपल्या ध्यानात येऊ शकते.
स्वतः संस्कृत पंडित असलेल्या शहाजी राजांनी अत्यंत अर्थपुर्ण व भविष्याचा आढावा घेऊनच शिवरायांची राजमुद्रा केली होती.
त्या राजमुद्रेची ताकद एवढी की आपल्या पत्रातून ती औरंगजेबाला जिझिया कराचा जाब विचारू शकते. हीच राजमुद्रा मोगली सेनापतीला "आमच्या मुलुखात तुमचा कल्पनेचा वारू (घोडा) सुद्धा भटकू शकत नाही !" असा खरमरीत दम भरू शकते. हीच ती राजमुद्रा जी प्रतापरावांना "सला काय निमित्ते केला ? " असा जाब विचारू शकते. अन हीच ती राजमुद्रा रयतेच्या गवताच्या काडीला देखील धक्का लागू नये अशी समज आपल्या सैन्याला देऊ शकते. असे अनन्य साधारण महत्व ह्या राजमुद्रेचे आहे.

जय शिवराय 🙏🚩

23/01/2020

महापराक्रमी महाबली स्वराज्यसंकल्पक सरलष्कर शहाजीराजे भोसले यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन...🙏

एते हाथी दिये मालमकरंदज के नंद जेते गिनी सकत विरंचहु की न तिया |
भूषणभनत जाकि साहिबी सभा के देखें, लागे सब छीतीपाल छीती में छीया |
साहस अपार हिंदुआन को आधार धीर, सकल सिसौदिया सपूत कुल को दिया |
जाहिर जिहान भयौ साहिजू खुमान वीर साहनकौ सरन सिपाहीन की तकिया ||

या मालोजीच्या पुत्राने, शहाजीने इतके हत्ती दिले की प्रत्यक्ष ब्रम्हदेव देखील ते मोजू शकला नाही. त्याच्या सभेचे ऐशवर्य पाहून इतर राजे क्षय झाल्यासारखे निस्तेज झाले. आपल्या अपार साहसाने त्याने हिंदूंना आधार दिला आणि आपल्या सिसोदिया कुलाचा सुपुत्र बनून कुलास धीर दिला. शिपायांचा आश्रयदाता आणि इतर बादशाहांचा आधार म्हणून या आयुष्यमान, वीर शाहजी जगतात प्रसिध्द झाला.

- कवीभूषण

21/01/2020

कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता बनण्यापेक्षा मी
छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा बनेन..
जगातील सर्वात मोठं पद " #मावळा "
मराठा

21/01/2020

"जर शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते !"
-- लॉर्ड माउंटबँटन, इंग्लंड.

"भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेन तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराजा न प्रमाणे लढा !
-- नेताजी सुभाषचंद्र बोस.

"नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर‘ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या शिवाजी महाराजा च्या इतिहासाची गरज आहे !"
-- अॅडॉल्फ हिटलर.

"शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर शिवाजीमहाराज ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे; जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !"
-- स्वामी विवेकानंद.

"जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास ‘सुर्य‘ संबोधले असते !"
-- बराक ओबामा, अमेरिका.

"जर शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता !"
-- इंग्रज गव्हर्नर.

"काबुल पासुन कंदहार पर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं ! पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखलं ! सर्व शक्ती मी शिवाजी महाराजांना पराभव करायला खर्च केली पण शिवाजी महाराज काही माझ्या हाती नाही आले ! या अल्लाह ! दुश्मन दिया भी तो कौण दिया? * सिवा_भोसला* जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है !"
-- औरंगजेब (छत्रपति शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नमाज पढताना काढलेले उदगार, संदर्भ- खाफिखानाची बखर)

"उस दिन *सिवा भोसला*ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी *सिवा भोसला* से मिलना नही चाहता !"
-- शाहीस्तेखान, संदर्भ- खाफिखानाची बखर.

"क्या उस गद्दारे दख्खन से *सिवा* नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है, इस दरबार में? लालत है ऐसी मर्दानगी पे !"
-- बडी बेगम अलि आदिलशाह.

१७ व्या शतकात युरोप खंडात "लंडन गॅझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला !

वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवर

Created by Nilesh Gangurde...Wonderful art...
20/07/2017

Created by Nilesh Gangurde...Wonderful art...

27/06/2017

श्री राममंदिर, कागल, कोल्हापूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने कोल्हापूर पुराभिलेखागार विभागाने ऐतिहासिक पत्रव्यवहार, छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. सदर प्रदर्शनात शिवछत्रपतींची काही दुर्मिळ पत्रेही आहेत. त्यातीलच एका पत्रावरील शिवछत्रपतींची सुस्पष्ट राजमुद्रा...

साभार- श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक.

26/06/2017

शिवकालीन दिनविशेष

२६ जून १६७७

वेलोर चा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी वेढा घातला अन् नरहर रुद्र सबनीस ह्यांना वेढ्या चे काम देऊन , शिवाजी महाराज शेरखान लोदी वर चालून गेले २६ जून १६७७ ला महाराज अन् शेरखान लोदी हे तिरुवादी येथे आमने सामने आले , शेरखान आपल्या जवळ असेल नसेल तेवढी फौज जमा करून वालिगंडपुराहून कडलूर पासून चालून आला , ह्या लढाईत शेरखान मागे हटू लागला कारण मराठ्यां पुढे आपळला निभाव लागेल ह्या बदल त्यास शंका वाटली , शिवाजी महाराजांनी पाठलाग करून शेरखान चा फन्ना उडविला आणि तेगापटण, भुवनगीरपटण, व्हाडलौर थाणि हस्तगत केली.

23/06/2017

किल्ले पुरंदर वर उन सावल्यांचा खेळ सुरू असतानाचे चित्र
दिनांक : २१जून २०१७

साभार- श्री. प्रवीण हिंगमिरे

20/06/2017

सन १६६१ च्या पावसाळ्यानंतर शाहिस्ताखानच्या सैन्याने मराठी मुलुखावर आक्रमणे सुरु केली. बुलाखी नावाच्या त्याच्या सरदाराने देहरीगडा(गोरखगड)वर चाल केली. कावजी कोंढाळकरांकडे ह्या गडाची किल्लेदारी होती. बुलाखीने वेढा बसवण्याआधीच कावजींने मुघल सैन्यावर हल्ला केला. कावजींच्या आक्रमणाचा धडाका पाहुन बुलाखीला रणांगणातुन माघार घ्यावी लागली. मुघल सैन्याचा पूर्ण पराभव झाला.

Address

Pune
411052

Telephone

08484842979

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chhatrapati Shivaji Raje Bhosle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category