04/02/2017
या उमेदवारांचे अर्ज बाद झाले
वडगावशेरी मतदार संघातील मनसे चे प्रभाग तीन चे उमेदवार प्रमिला अच्युतराव मोळावडे, पाच चे उमेदवार रंजना शिनलकर, दोन चे उमेदवार राजकुमार ढाकणे, सहाचे उमेदवार अर्चना माछरेकर, काँग्रेस च्या प्रभाग पाच मधील उमेदवार सुनीता भोसले यांचे उमेदवारी अर्ज छाननी मध्ये बाद झाले.
याच बरोबर प्रभाग क्र. 1 चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार चेतन चव्हाण, प्रभाग क्र. 2 चे उमेदवार नगरसेविका सुनंदा देवकर, योगिता शिर्के या शिवसेनेच्या तीन उमेदवारांचा अर्ज बाद झाला. कुणाची अर्जावर सही नाही, एनओसी नाही या कारणावरून अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. प्रभाग 1 मध्ये आघाडीचे उमेदवार कोण ऐश्वर्या जाधव (NCP) कि रेणुका चलवादी (congress) यावरून देखील हरकती घेण्यात आली आहे. त्यामुळे आघाडी मध्ये अधिकृत कोण असणार हे देखील औस्तुक्याचे ठरणार आहे.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजित देशमुख यांनी हरकती घेतलेल्या उमेदवारांचा निकाल 8 वाजता देण्यात येईल असे सांगितले. मात्र सूत्रानुसार हे सर्व अर्ज अवैध ठरवण्यात येणार आहेत.