Mahesh Landge

Call Directions Website Contact the organization

Mahesh Landge Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mahesh Landge, Sheetal Baugh, Pune-Nashik Highway, Pune.

आमदार, भोसरी | भाजप, पिंपरी-चिंचवड | अध्यक्ष, हिंदूभूषण स्मारक ट्रस्ट | पैलवान | शाश्वत विकास, हिंदुत्व व जनसेवा
MLA, Bhosari | BJP Pimpri Chinchwad | President, HinduBhushan Smarak Trust | Wrestler | 📞 9379909090 Mahesh Kisanrao Landge, popularly known as, Mahesh Dada Landge, (born 27 November 1975) is an Indian politician who is the MLA from Bhosari and Member of the Bharatiya Janata Party and current city president of Bharatiya Janata Party of Pimpri-Chinchwad.[1] He is a member of the Maharashtra Legislative Assembly from the Bhosari constituency from the city of Pune as Independent candidate.

08/10/2026

𝐍𝐞𝐯𝐞𝐫 𝐜𝐨𝐦𝐩𝐫𝐨𝐦𝐢𝐬𝐞𝐝
𝐍𝐞𝐯𝐞𝐫 𝐛𝐨𝐰𝐞𝐝
Celebrating 25 years of relentless leadership.


भारतीय हवाई दलाच्या २९व्या प्रमुखपदी एअर मार्शल आशुतोष दीक्षित, PVSM, AVSM, VM, VSM यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे म...
08/10/2026

भारतीय हवाई दलाच्या २९व्या प्रमुखपदी एअर मार्शल आशुतोष दीक्षित, PVSM, AVSM, VM, VSM यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

त्यांचा प्रदीर्घ अनुभव, कुशल नेतृत्व आणि राष्ट्रसेवेची समृद्ध कारकीर्द भारतीय हवाई दलाला निश्चितच अधिक बळकटी देईल. देशाच्या आकाशाचे रक्षण करण्याची ही महत्त्वपूर्ण जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास आहे.

राष्ट्राच्या नभोसीमेच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या कार्यकाळास मनःपूर्वक शुभेच्छा!

जय हिंद! 🇮🇳

#भारतीय_हवाईदल #राष्ट्रसेवा िंद

08/10/2026

संशोधन आणि इनोव्हेशनला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचा दर्जा जागतिक पातळीवर नेण्यासाठी राज्यात ‘CM सृष्टी’ योजना राबविण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठं, शासकीय उच्च व तंत्रशिक्षण संस्था आणि पॉलिटेक्निकसोबतच मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्था (ICT), पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांना सोबत घेऊन या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल.

महाराष्ट्राला 'ग्लोबल एज्युकेशन & रिसर्च हब' बनवण्याच्या दिशेने देवाभाऊंनी उचललेलं हे मोठं पाऊल आहे. शिक्षण क्षेत्रात नवा बदल घडवून आणत महाराष्ट्राच्या प्रगतीला आणखी वेग देण्याचं काम ही योजना करेल, असा विश्वास आहे.

[ Higher Education, Research And Innovation, Education Reform, CM Srushti Yojna, Research In Maharashtra, Devendra Fadnavis, BJP Mahayuti ]

08/10/2026
पुस्तकांची भेट… विचारांची शिदोरी!आपण पिंपरी-चिंचवडमधील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आहात. वाढदिवस, विविध सामाजिक उपक्रम किं...
08/10/2026

पुस्तकांची भेट… विचारांची शिदोरी!

आपण पिंपरी-चिंचवडमधील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आहात. वाढदिवस, विविध सामाजिक उपक्रम किंवा अन्य विशेष प्रसंगी आपण आवर्जून पुस्तके भेट देत असाल, तर आपल्यासाठी एक विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दि. ७ ते १० ऑक्टोबरदरम्यान
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी प्राधिकरण
येथे देशभक्ती, सामाजिक विषय, महापुरुषांची चरित्रे तसेच प्रेरणादायी आणि वैचारिक अशा दर्जेदार पुस्तकांची निवड करण्याची विशेष सोय करण्यात आली आहे.

आपण स्वतः या ठिकाणी आवर्जून भेट द्यावी आणि आपल्या कार्यकर्ते, मित्रपरिवार व सहकाऱ्यांनाही पुस्तक खरेदीसाठी पाठवावे, ही नम्र विनंती. अधिक संख्येने पुस्तके घेतल्यास अधिक सवलत मिळण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. भेट देण्यापूर्वी श्री. शिरीष सोनवणे यांना फोन केल्यास आपले काम अधिक सोपे होईल.

शिरीष सोनवणे : ९८९०९२१४८५

पुस्तकांची भेट द्या… विचारांची ज्योत पेटवा… आणि समाजाच्या प्रबोधनात आपला सहभाग नोंदवा!

#समाजप्रबोधन #वैचारिकवाचन #प्रेरणादायीपुस्तके #देशभक्ती #महापुरुष #पिंपरीचिंचवड

नानांची आठवण..! नाना… आज तुम्ही आम्हाला सोडून गेलात, आणि मन सुन्न झालं…तुम्ही आता आपल्यात नाही, हे स्वीकारणं खूप कठीण आह...
08/10/2026

नानांची आठवण..!

नाना… आज तुम्ही आम्हाला सोडून गेलात, आणि मन सुन्न झालं…

तुम्ही आता आपल्यात नाही, हे स्वीकारणं खूप कठीण आहे. तुमचा आवाज, तुमची माया, तुमची प्रेमाने विचारपूस… सगळं आठवतंय आणि डोळ्यांतलं पाणी आलंय. अजून कितीतरी बोलायचं राहिलं होतं, तुमच्यासोबत वेळ घालवायचा होता… आज मात्र सगळं मनातच राहून गेलं. पुन्हा तुमची हाक ऐकू येणार नाही, या जाणिवेने काळीज भरून येतंय. तुमच्या आठवणी जपू; पण तुमची उणीव प्रत्येक पावलावर जाणवत राहील…

नाना, तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.
तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो.

#नाना_पाटेकर #नटसम्राट #श्रद्धांजली #मराठीचित्रपटसृष्टी

🇮🇳 आकाशाची सीमा नाही… आणि शौर्यालाही! ✈️देशाच्या आकाशाचे रक्षण करताना धैर्य, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेची अद्वितीय परंपरा ज...
08/10/2026

🇮🇳 आकाशाची सीमा नाही… आणि शौर्यालाही! ✈️

देशाच्या आकाशाचे रक्षण करताना धैर्य, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेची अद्वितीय परंपरा जपणाऱ्या भारतीय वायुसेनेला स्थापना दिनानिमित्त मानाचा मुजरा! 🇮🇳

#भारतीयवायुसेना #जयहिंद #वंदे_मातरम्

भावपूर्ण श्रद्धांजली..! मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनयाचे 'नटसम्राट' आणि ज्येष्ठ अभिनेते, आपल्या अष्टपैलू अभिनया...
08/10/2026

भावपूर्ण श्रद्धांजली..!

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनयाचे 'नटसम्राट' आणि ज्येष्ठ अभिनेते, आपल्या अष्टपैलू अभिनयाने व भारदस्त आवाजाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांचे दुःखद निधन झाले.
त्यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्राचे आणि समाजकारणाचे कधीही न भरून निघणारे मोठे नुकसान झाले आहे.

"कुणीतरी येणार येणार म्हणून... चातकासारखी वाट पाहायची...
आणि शेवटी एक दिवस...
स्वतःच निघून जायचं...!"
अशा अनेक अजरामर संवादांनी आणि भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांना नेहमीच मंत्रमुग्ध केले. 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून त्यांनी केलेले समाजकार्य आणि शेतकऱ्यांना दिलेली साथ ही सदैव प्रेरणादायी राहील.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या परिवाराला व असंख्य चाहत्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

भावपूर्ण श्रद्धांजली!
। ॐ शांती ।

#नाना_पाटेकर #नटसम्राट #श्रद्धांजली #मराठीचित्रपटसृष्टी

Address

Sheetal Baugh, Pune-Nashik Highway
Pune
411039

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahesh Landge posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Mahesh Landge:

Shortcuts

Share