19/07/2026
मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन ...!
भारताच्या चिमुकल्या फुटबॉलपटूंनी विश्व मंचावर पुन्हा एकदा इतिहास रचला!
सलग दुसऱ्या वर्षी Minerva Academy FC ने Gothia Cup जिंकत भारताचं नाव जागतिक स्तरावर अभिमानाने उजळवलं. ही कामगिरी भारतीय फुटबॉलची नवी पिढी जगातील कोणत्याही आव्हानाला सामोरी जाण्यास तयार असल्याचं दाखवते.
स्वीडनमध्ये झालेल्या Gothia Cup 2026 च्या Under-12 अंतिम सामन्यात Minerva Academy FC ने ब्राझीलच्या RS Sports Yellow संघाचा 2-1 असा पराभव करत जगातील सर्वात प्रतिष्ठित युवा फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.
प्रत्येक सामन्यात या चिमुकल्यांनी भारतीय फुटबॉलचं उज्ज्वल भविष्य जगाला दाखवून दिलं.
Minerva Academy FC च्या संपूर्ण संघाचं या ऐतिहासिक यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!