09/07/2026
वारकऱ्यांच्या सेवेसाठी APMC पुणे सज्ज! 🚩
कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC), पुणे तर्फे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या विविध सुविधांची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यात बाजार समितीचे सभापती मा. श्री. प्रकाश जगताप, संचालक मा. श्री. शशिकांत गायकवाड व मा. श्री. मिलिंद हरगुडे सहभागी झाले. वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच प्रकाशयोजना यांचा त्यांनी आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी बाजार समितीचे सहसचिव, उपसचिव, सहाय्यक सचिव, उपअभियंता, विभागप्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वारकरी बांधवांना सुरक्षित, स्वच्छ व सुसज्ज वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी APMC पुणे कटिबद्ध असून, पालखी सोहळ्याचे नियोजन यशस्वीपणे पार पडावे यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
🙏 “वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा” 🙏