06/04/2026
MSDA च्या वतीने सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी मुंबई एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे MSDA ची सदिच्छा भेट.
महाराष्ट्र इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या एक्झिबिशनला श्री. मिलिंद श्रीपती पाटील, संस्थापक अध्यक्ष MSDA यांनी भेट दिली. यावेळी संस्थेचे कार्य समजावून सांगितले, MSRDC अंतर्गत विविध विकासकामांची माहिती देण्यात आली आणि विकास प्रक्रियेला मदत करण्यासाठी एकत्रपणे काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पदाधिकारी यांचे तर्फे सत्कार करण्यात आला व इथून पुढे संस्थेच्या कार्याला पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. यावेळी श्री.शरद जगदाळे, श्री.सुशील भुरे, श्री.माऊली शिंदे, श्री.भास्कर थोरे, श्री.योगेश पवार, श्री.सुरज अहिरे, श्री.अमरनाथ पाटील, श्री.शैलेंद्र गुजर, श्री.संदीप शिंदे, श्री.अनिकेत देवकर, श्री.विनोद कोठावदे आदी उपस्थित होते.