PMC Pune

PMC Pune Official page of Pune Municipal Corporation (PMC) , a Maharashtra State Government Local Body of Pune City.

Follow us and stay updated with latest news, upcoming events, New projects & initiatives Pune Municipal Corporation(PMC) is an award winning organization that aims to provide superior services to Pune citizens through better governance. Since 1950, the Pune Municipal Corporation(PMC) is administrating the city and serving citizens. Pune Municipal Corporation has undertaken various initiative for i

mplementing e-Governance

The Maharashtra State Government Local body oversees 5 zones which spans across 15 ward offices, Pune Municipal Corporation(PMC) has a workforce of more than ~17000 employees.

बीजदानाचा एक छोटासा संकल्प... हरित पुण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल!आंबा, जांभूळ, चिकू, सीताफळ, करवंद यांसारख्या स्थानिक व...
06/08/2026

बीजदानाचा एक छोटासा संकल्प... हरित पुण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल!

आंबा, जांभूळ, चिकू, सीताफळ, करवंद यांसारख्या स्थानिक वृक्षांच्या बिया जमा करून पुणे महानगरपालिकेच्या बीज संकलन केंद्रात दान करा. आपल्या बीजदानातून तयार होणारी रोपे पुण्याची हरित संपदा अधिक समृद्ध करतील.

चला, बीजदानातून घडवूया हरित पुणे!

शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE

Majhi Vasundhara

निंबजनगर, विठ्ठलनगर व एकतानगरी पुरमुक्त करण्यासाठी मा. महापौर मंजुषा नागपुरे यांची कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी तातडीची बै...
06/08/2026

निंबजनगर, विठ्ठलनगर व एकतानगरी पुरमुक्त करण्यासाठी मा. महापौर मंजुषा नागपुरे यांची कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी तातडीची बैठक

सिंहगड रोड परिसरातील निंबजनगर, विठ्ठलनगर आणि एकतानगरी या भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मा. महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी संबंधित प्रशासकीय, तांत्रिक तसेच पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून सविस्तर आढावा घेतला. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीच्या उपाययोजनांसह दीर्घकालीन नियोजन करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

मा. महापौर सौ. मंजुषा नागपुरे म्हणाल्या, "दरवर्षी या परिसरातील नागरिकांना पुरामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान, मालमत्तेची हानी आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. ही परिस्थिती आता कायमस्वरूपी बदलणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नागरिकांना दरवर्षी पुराच्या संकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना तातडीने राबवाव्यात. या प्रश्नात कोणतीही दिरंगाई किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही."

मा. महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की, "नागरिकांचा विश्वास जपणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. निंबजनगर, विठ्ठलनगर आणि एकतानगरी परिसर कायमस्वरूपी पुरमुक्त करण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक उपाययोजना प्राधान्याने आणि वेळेत पूर्ण करण्यात यावी."

या बैठकीस मा. शहर अभियंता पुणे महानगरपालिका श्री. अनिरुद्ध पावसकर, मा. अधीक्षक अभियंता श्री. प्रवीण शेंडे, मा. उपअभियंता श्री. देवराम पंडित उपस्थित होते

शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE

Manjusha Deepak Nagpure

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या या कार्यक्रमात सर्व पात्र नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून मतदान केंद्रस्तरीय...
06/08/2026

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या या कार्यक्रमात सर्व पात्र नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे तसेच आपल्या मतदार नोंदी अचूक व अद्ययावत असल्याची खात्री करून घ्यावी.

शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE


Chief Electoral Officer Maharashtra Election Commission of India

१५ दिवसांत सिंहगड रस्ता परिसराचा वाहतूक सर्वेक्षण अहवाल द्यामा. महापौर सौ. मंजूषा नागपुरे यांचे पोलिस प्रशासनाला निर्देश...
06/08/2026

१५ दिवसांत सिंहगड रस्ता परिसराचा वाहतूक सर्वेक्षण अहवाल द्या
मा. महापौर सौ. मंजूषा नागपुरे यांचे पोलिस प्रशासनाला निर्देश

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी धायरी, नऱ्हे, नांदेड सिटी, वडगाव तसेच दांडेकर पुलापर्यंतच्या मुख्य रस्ते, पर्यायी रस्ते आणि चौकांचे १५ दिवसांच्या आत सर्वेक्षण करून त्याचा अहवाल वाहतूक पोलिसांनी महापालिकेला सादर करावा, अशा सूचना मा. महापौर सौ. मंजूषा नागपुरे यांनी बुधवारी पोलिस प्रशासनाला दिल्या. पोलिसांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार महापालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजनांसह वाहतूक वॉर्डनची नियुक्ती करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तत्काळ अंमलबजावणी करण्यात येईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. तसेच, तात्पुरता उपाय म्हणून मुख्य रस्त्यांवर वाहतूक पोलीस आणि वाहतूक वॉर्डनची संख्या वाढविण्याचे आदेशही त्यांनी दिले.

गेल्या काही दिवसांपासून सिंहगड रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मा. महापौर सौ. मंजूषा नागपुरे यांनी सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात तातडीची बैठक बोलावली होती. बैठकीस मा. प्रभाग समिती अध्यक्ष श्री. सचिन मोरे, मा. सहाय्यक पोलिस आयुक्त श्री. वसंत कुवंर, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गौड, मा. पोलीस निरीक्षक श्री. सुनील गवळी, मा. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती प्रियंका प्रवीण गोरे, मा. श्री. सचिन पाटील, राष्ट्रवादीचे मा. गटनेते श्री. काका चव्हाण, मा. माजी उपमहापौर श्री. प्रसन्न जगताप, मा. नगरसेवक श्री. हरीदास चरवड, श्री. सुरज लोखंडे, श्री. सुभाष नाणेकर, श्री. राजाभाऊ लायगुडे तसेच मा. नगरसेविका श्रीमती कोमल नवले, श्रीमती जयश्री भूमकर, श्रीमती प्रिया गदादे, श्रीमती वृषाली रिठे आणि श्रीमती धनश्री कोल्हे उपस्थित होत्या.

"सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका वाहतूक पोलिसांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. मुख्य सिंहगड रस्त्यासह धायरी, वडगाव, नऱ्हे, नांदेड सिटी तसेच राजाराम पूल ते नवशा मारुतीपर्यंतच्या परिसरातील मुख्य रस्ते, पर्यायी रस्ते आणि चौकांचे १५ दिवसांच्या आत सर्वेक्षण करून पोलिसांनी अहवाल सादर करावा. त्यानुसार आवश्यक असलेली सर्व कामे महापालिकेकडून तातडीने करण्यात येतील," असे मा. महापौर सौ. मंजूषा नागपुरे यांनी सांगितले.

शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE

Manjusha Deepak Nagpure

धरणस्थिती आढावामान्सून काळात पावसासंदर्भातील तक्रारी, आपत्कालीन मदत, अधिकृत सूचना आणि महत्त्वाच्या सेवांसाठी PMC CARE ॲप...
06/08/2026

धरणस्थिती आढावा

मान्सून काळात पावसासंदर्भातील तक्रारी, आपत्कालीन मदत, अधिकृत सूचना आणि महत्त्वाच्या सेवांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE

District Information Office Pune

महत्वाची सूचनाखडकवासला धरणमान्सून काळात पावसासंदर्भातील तक्रारी, आपत्कालीन मदत, अधिकृत सूचना आणि महत्त्वाच्या सेवांसाठी ...
06/08/2026

महत्वाची सूचना

खडकवासला धरण

मान्सून काळात पावसासंदर्भातील तक्रारी, आपत्कालीन मदत, अधिकृत सूचना आणि महत्त्वाच्या सेवांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE

District Information Office Pune

गंगाधाम-आईमाता चौक परिसरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार!मा. स्थायी समिती अध्यक्ष श्री. श्रीनाथ भिमाले...
05/08/2026

गंगाधाम-आईमाता चौक परिसरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार!

मा. स्थायी समिती अध्यक्ष श्री. श्रीनाथ भिमाले यांनी आज आईमाता चौक ते मार्केट यार्ड बस डेपो दरम्यान प्रस्तावित ३० मीटर रुंदीच्या उड्डाणपुलाच्या सुधारित (Revised) आराखड्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी खालील सूचना देण्यात आल्या.

महत्त्वाचे निर्णय व सूचना:
✅उड्डाणपुलाचे काम ३ ऐवजी २ वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश.
✅पुढील आठवड्यात अंतिम आराखडा (Final Drawing) मिळताच कामास तातडीने सुरुवात होणार.
✅मार्केट यार्ड गेट क्र. ९ आणि आनंदनगर मागील रस्त्यावरील वाहतूक नियोजनाच्या अधिकाऱ्यांना सूचना.

या पाहणीप्रसंगी महापालिकेचे मा. अतिरिक्त महापलिका आयुक्त (वि.) श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. पथ विभागप्रमुख श्री. राजेश बनकर, मा. श्री. अजय वायसे, मा. श्री. साखरे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी, सल्लागार व कंत्राटदार उपस्थित होते.

शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE

Shrinath Bhimale

05/08/2026

एक छोटी काळजी, डेंग्यूपासून मोठे संरक्षण!

डेंग्यूपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नका, डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्या आणि ताप, अंगदुखी किंवा इतर लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.

सुरक्षित राहा, स्वच्छता राखा आणि डेंग्यूमुक्त पुण्यासाठी आपले सहकार्य द्या.

Swachh Survekshan Swachh Bharat Mission, India Majhi Vasundhara Ministry of Health and Family Welfare, Government of India

Address

PMC Main Building, Near Mangla Theatre, Shivajinagar
Pune
411005

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Telephone

+9118001030222

Alerts

Be the first to know and let us send you an email when PMC Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to PMC Pune:

Shortcuts

Share