29/12/2025
वीर बाजी पासलकर स्मारक समिती आयोजित मासिक डिसेंबर 2025
कार्यक्रम वृत्त
शुक्रवार, 27 डिसेंबर रोजी चौथे पुष्प उत्साहात संपन्न झाले.
पुणे महानगरपालिकेचे, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान संचालित वीर बाजी पासलकर स्मारक समिती आयोजित विशेष व्याख्यान संपन्न झाले. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी हे मासिक व्याख्यान आयोजित केले जाते.
आज झालेल्या व्याख्यानासाठी प्रमुख वक्त्या म्हणून श्रीमती. इंद्रायणी चव्हाण लाभलेल्या होत्या. Operation Sindoor _Inside story असा विषय होता. नुकतेच त्यांचे Operation Sindoor या विषयाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. घडलेल्या घटनेचा चित्त थरारक असा इतिहास त्यांनी सर्वांपुढ मांडला. "सध्या या operation ला विराम मिळालेल आहे, हे युद्ध थांबलेलं नाही. कधीही परत सुरु होऊ शकत. संपूर्ण Operation ची आखनी करताना भारतीय संस्कृती, परंपरा, आपल्या पूर्वजाचे स्मरण केल्याचे दिसून येते." हे त्यांनी आवर्जून सांगितले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.रोहन शिरीष चाटे, विंग कमांडर विनायक डावरे उपस्थित होते. या सोबतच समितीचे अध्यक्ष श्री. शरद जगताप, सचिव श्री. प्राज भिलारे, कार्यवाह श्री. सुरेश महल्ले व अन्य समिती सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमासाठी 70 नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. शंकर मरगळे यांनी केले, प्रास्ताविक श्री. प्राज भिलारे तर श्री. गजानन देशमुख यांनी परिचय करून दिले. सामूहिक शिववंदने ने कार्यक्रमाची सांगता झाली.