31/12/2025
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मधे काळवाडी गावाने भाग घेतला असून मोठ्याप्रमाणात विकासकामे चालू आहेत. राज्यामध्ये आपल्या काळवाडी गावचा प्रथम क्रमांक यावा यासाठी ग्रामदैवत श्रीकलिकामातेची विधिवत पूजा जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आली. श्रीफळ पेढे वाढवून देवीला राज्यात प्रथम क्रमांक यावा यासाठी सर्व ग्रामस्थांकडून साकडे घालण्यात आले.