Adv Nilesh Narayan Nikam

Adv Nilesh Narayan Nikam Group Leader/ Leader Of Opposition, PMC
5th term elected Corporator, PMC
34 years of committed, honest & integrity-driven public service

आनंदाचा उत्सव आणि गुणवंतांचा गौरव: नवचैतन्य हास्ययोग क्लबचा २३ वा वर्धापन दिन संपन्न! "हास्य हे आरोग्याचे सर्वोत्तम साधन...
05/06/2026

आनंदाचा उत्सव आणि गुणवंतांचा गौरव: नवचैतन्य हास्ययोग क्लबचा २३ वा वर्धापन दिन संपन्न!

"हास्य हे आरोग्याचे सर्वोत्तम साधन आहे" हाच संदेश देणाऱ्या बहिरट उद्यान येथील 'नवचैतन्य हास्ययोग क्लब'चा २३ वा वर्धापन दिन आज सकाळी अत्यंत उत्साही आणि प्रसन्न वातावरणात साजरा करण्यात आला. या मंगल प्रसंगी उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधण्याचा आनंद मिळाला.

या कार्यक्रमा दरम्यान समाजातील दोन पिढ्यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. एकीकडे जीवनाचा समृद्ध अनुभव असलेले आपले ज्येष्ठ नागरिक होते, तर दुसरीकडे देशाचे भविष्य असलेले चिमुरडे वारसदार! याच औचित्याने, शाळेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या उज्ज्वल यशाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला नगरसेवक दत्ता बहिरट, सन्माननीय मानवतकरजी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय भोसले साहेब, दौंडकर साहेब यांच्यासह परिसरातील सर्व आदरणीय ज्येष्ठ नागरिक आणि नागरिक उपस्थित होते. हास्ययोग क्लबच्या सर्व सदस्यांना वर्धापन दिनाच्या आणि सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

#शुभेछा

ज्येष्ठ नागरिकांच्या साथीने पंचवटीत वृक्षारोपण!पर्यावरण समृद्धीचा संकल्प!आज सकाळी पंचवटी येथे निसर्गाप्रती असलेली आपली ज...
05/06/2026

ज्येष्ठ नागरिकांच्या साथीने पंचवटीत वृक्षारोपण!
पर्यावरण समृद्धीचा संकल्प!

आज सकाळी पंचवटी येथे निसर्गाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गाचे संतुलन राखणे ही केवळ गरज नसून आपले कर्तव्य आहे, हाच प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.

कार्यक्रमाला सन्माननीय अंजलीताई ओरसे, नगरसेवक दत्ता बहिरट, सन्माननीय मानवतकरजी आणि ज्येष्ठ संघाचे सर्व सन्माननीय सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या ज्येष्ठांच्या हाताने झालेल्या या वृक्षारोपणाने परिसराला एक नवी चैतन्यमयी ऊर्जा मिळाली आहे. या स्तुत्य उपक्रमात योगदान देणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मनःपूर्वक धन्यवाद!

05/06/2026
05/06/2026
04/06/2026

अथक पाठपुरावा... वज्रनिर्धार!
दिलेला शब्द पाळला रेंज हिल्स रोड, अबिल हाऊस ते सिंचन नगर परिसरातील MNGL गॅस पाईपलाईन प्रकल्पाचा मार्ग अखेर सुकर!

"बदल सुविधांचा, विश्वास विकासाचा" हा ध्यास घेऊन काम करताना, रेंज हिल्स रोड, अबिल हाऊस ते सिंचन नगर या भागातील माता-भगिनींची आणि नागरिकांची प्रदीर्घ प्रतीक्षा आता संपली आहे.
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनात आणि विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम यांच्या अथक पाठपुराव्यामुळे या महत्त्वाकांक्षी MNGL गॅस पाईपलाईन प्रकल्पाला अखेर सुरुवात झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर आज परिसराची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली, तसेच आगामी कामाच्या नियोजनाचा आढावा घेतला.
जनतेच्या हक्काच्या सुविधेचा प्रश्न सोडवणे आणि दिलेला शब्द पाळणे, हीच आमची राजकारणातील सर्वोच्च प्राथमिकता आहे. नागरिकांच्या दैनंदिन सोयीसाठी क्रांतिकारी ठरणारा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्ष जमिनीवर उतरत असून त्याचा शुभारंभ होत आहे.

03/06/2026

विजयाचा निर्धार; महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. विक्रम काकडे यांची सदिच्छा भेट!

आगामी पुणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. विक्रम काकडे यांनी आज आमच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी सौ. वैशाली निलेश निकम यांनी त्यांचे औक्षण करून अत्यंत आदरपूर्वक स्वागत केले आणि त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

या महत्वपूर्ण भेटीदरम्यान पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर मा. श्री. दत्तात्रय धनकवडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. सुरेश (अण्णा) घुले, आणि पुणे जिल्हाध्यक्ष मा. श्री. संभाजी नाना होळकर नगरसेवक राजाभाऊ बराटे यांचा समावेश होता.

महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. विक्रम काकडे यांना या निवडणूक आणि भावी वाटचालीस माझ्याकडून व निकम परिवाराकडून हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!

#शुभेच्छा

विजयाचा निर्धार; महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. विक्रम काकडे यांची सदिच्छा भेट!आगामी पुणे विधान परिषद निवडणुकीच्या प...
03/06/2026

विजयाचा निर्धार; महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. विक्रम काकडे यांची सदिच्छा भेट!

आगामी पुणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. विक्रम काकडे यांनी आज आमच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी सौ. वैशाली निलेश निकम यांनी त्यांचे औक्षण करून अत्यंत आदरपूर्वक स्वागत केले आणि त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

या महत्वपूर्ण भेटीदरम्यान पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर मा. श्री. दत्तात्रय धनकवडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. सुरेश (अण्णा) घुले, आणि पुणे जिल्हाध्यक्ष मा. श्री. संभाजी नाना होळकर नगरसेवक राजाभाऊ बराटे यांचा समावेश होता.

महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. विक्रम काकडे यांना या निवडणूक आणि भावी वाटचालीस माझ्याकडून व निकम परिवाराकडून हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!

#शुभेच्छा

Address

Senapati Bapat Road
Pune
411016

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Nilesh Narayan Nikam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share