प्रबुद्ध भारत

प्रबुद्ध भारत मनुष्यमात्रांच्या पूर्णतेसाठी मनुष्य मात्रास पूर्णतेला नेण्यासाठी आम्ही झगडत आहोत

मोदी सरकारच्या काळातील विकासाची अवस्था....
28/07/2026

मोदी सरकारच्या काळातील विकासाची अवस्था....

आमच्या नगरपालिका शिक्षण मंडळाचे ओ.एस. सय्यद भाऊसाहेब हे हज यात्रेला गेले होते. तिथून प्रसाद म्हणून त्यांनी खजूर आणि जमजम...
01/07/2026

आमच्या नगरपालिका शिक्षण मंडळाचे ओ.एस. सय्यद भाऊसाहेब हे हज यात्रेला गेले होते. तिथून प्रसाद म्हणून त्यांनी खजूर आणि जमजम जल आवर्जून माझ्यासाठी आणले. आम्ही सर्वांनी आदरपूर्वक ग्रहण केले.
धन्यवाद .

https://quizzory.in/answer-sheet/6a27951ca5f26b746fabf2dfभगवान बुद्ध आणि त्यांचा ग्रंथ दैनंदिन आकलन अभियान आपला रोजचा पा...
09/06/2026

https://quizzory.in/answer-sheet/6a27951ca5f26b746fabf2df

भगवान बुद्ध आणि त्यांचा ग्रंथ
दैनंदिन आकलन अभियान
आपला रोजचा पाच मिनिटांचा वेळ या अभियानात द्या.
ग्रंथाचे मूलभूत आकलन समजून घेऊया.
https://quizzory.in/answer-sheet/6a27951ca5f26b746fabf2df

View the answer sheet for दिवस -25 and revise the topic with a related learning article on Quizzory.

आधुनिक बुद्ध बाबासाहेब आंबेडकर संकल्पित बुद्धिस्ट सेमिनरीच्या दि बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटरचे एक डिजिटल पाऊल
09/06/2026

आधुनिक बुद्ध बाबासाहेब आंबेडकर संकल्पित बुद्धिस्ट सेमिनरीच्या दि बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटरचे एक डिजिटल पाऊल

दिव्यदर्शन भदंत विमल कित्ती गुणसिरीयांचे हे 52 पेजेसचे पुस्तक चौथी आवृत्ती आमचे एक धम्म बंधू संतोष डी कुशलवर्धन यांनी व्...
07/06/2026

दिव्यदर्शन

भदंत विमल कित्ती गुणसिरी
यांचे हे 52 पेजेसचे पुस्तक
चौथी आवृत्ती

आमचे एक धम्म बंधू संतोष डी कुशलवर्धन यांनी व्हाट्सअप गृप वर या ग्रंथाची माहिती दिली. मी त्यांना फोन केला. त्यांनी तातडीने पाच प्रती पाठवल्या. त्या कालच मिळाल्या. आज सकाळीच वाचले.
विमलकित्ती हे साठ वर्षांपेक्षा जास्त काळापासून धम्म चळवळीत कार्यरत आहेत. टीबीएमएसजी उभा करण्यासाठी त्यांचा मोठा वाटा आहे. त्यानंतर ते भिक्खू बनले. मुंबई, पुणे, नागपूर येथे भिक्खू प्रशिक्षण देण्यासाठी बुद्धिस्ट सेमिनरी स्थापित केली. प्राज्ञजन परिषद हाही त्यांचा क्रातीकारी उपक्रम.
विजितसंग्राम मासिक आणि जागृती साठी धम्म ग्रंथ प्रकाशित करुन मोफत वितरित करण्याचा धम्म जागृतीचा अभूतपूर्व उपक्रम सातत्याने चालू आहे. त्यासाठी कर्मकांडात होणारा उपासकांचा पैसा या सर्वश्रेष्ठ कार्याकडे वळवला आहे.
‌फक्त चिवरे गोळा करत ,विधी, निरर्थक परिषद करून दान गोळा करणे पेक्षा भदंत विमलकित्ती यांचे कार्य कितीतरी श्रेष्ठ आहे.
विशेष म्हणजे ते बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून मांडणी करत असतात दिव्य दर्शन ग्रंथांत त्यांनी बाबासाहेबांचे अनेक संदर्भ देत बौद्ध धम्म दीक्षा, प्रचार यंत्रणा यावर भर दिला आहे. त्यांना, संतोष डी कुशलवर्धन व त्यांच्या दादांच्या संघास खूप खूप साधू वाद.
- सत्येंद्र तेलतुंबडे

समाजाचा मिलिंद प्रश्न -वारकरी संप्रदायाप्रमाणे भिक्खू संघात घुसखोरी झालेली दिसते.उत्तर -अगदी बरोबर आहे. हा प्रश्न बहुतेक...
15/05/2026

समाजाचा मिलिंद प्रश्न -वारकरी संप्रदायाप्रमाणे भिक्खू संघात घुसखोरी झालेली दिसते.
उत्तर -अगदी बरोबर आहे. हा प्रश्न बहुतेक बौद्ध अनुयायी बोलत असतात. परंतु त्यावर उपाययोजना करण्यासाठी सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही. ज्या यंत्रणा आहेत त्या विरोध करण्याऐवजी त्या यंत्रणांचा भाग होणे अधिक पसंत करतात.
भारतातील बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. बौद्ध धर्माच्या ऱ्हासाची कारणे शोधून त्यावर उपाययोजना सुचविल्या आहेत . त्यावर कोणीही काम करत नाहीत . बाबासाहेबांच्या साहित्यातच घुसखोरी झालेली आहे . विशेष म्हणजे याला बाबासाहेबाच्याच संस्था आणि अनुयायी अधिक कारणीभूत आहेत . बाबासाहेबांनी सांगितलेला मार्ग कधीच धुसर झाला . इव्हेंटच्या जमान्यात भिक्खूंचा प्रभाव वाढला आहे . त्यांचे धम्मप्रचाराचे कार्य म्हणजे देखावा आहे . या देखाव्याकडे पैसा वर्ग होत आहे . मुख्य चळवळ वाहवत चालली आहे . अनेक भिक्खूंनी अक्षरशः स्वतःची यंत्रणा निर्माण केली आहे . त्यात एजंट , बाऊन्सर यांचा भरणा आहे . विनयाची गोष्ट बोलताना काही भिक्खू खूनाच्याच धमक्या देतात . वेशा ज्याप्रमाणे गज्जू वापरतात त्याप्रमाणे त्यांचे बाऊन्सर वागतात . भारतीतील बौद्ध धर्मात नुसती घुसखोरी झालेली नसून आंबेडकरी बौद्ध चळवळच विरोधकांनी हायजॅक केली आहे .


Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/L3jnB9Xkuap9WOtEDvMbSA?mode=gi_t🙏 ओम मणि पद्मे हो🙏...
15/05/2026

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/L3jnB9Xkuap9WOtEDvMbSA?mode=gi_t

🙏 ओम मणि पद्मे हो🙏
🙏 जयभीम 🙏

*✍️ जाहीर निवेदन*✍️

आधुनिक बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर दैनंदिन आकलन अभियान प्रारंभ करत आहोत. ज्यांना या अभियानात सहभागी व्हायचे असेल, कृपया त्यांनी दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप लिंक वर क्लिक करून जॉईन व्हावे.
महत्त्वाच्या अटी व सूचना
१) हे अभियान सर्व जाती धर्माच्या व्यक्तींसाठी खुले आहे.
२) या अभियानांतर्गत दररोज सकाळी सात वाजता आकलन चाचणी देण्यात येईल. ती सबमिट करण्यासाठी 24 तास ऍक्टिव्ह असेल.
३) या आकलनास एक ते दहा गुणांक श्रेणी दिलेली आहे. ही श्रेणी स्वतःसाठी असून कृपया ती बुद्धिस्ट सेमिनरी जाहीर करणार नाही.
४) या दैनंदिन अभियानामध्ये सातत्य अपेक्षित आहे.
५) हे अभियान उपसोथ दिन १६/५/२०२६ पासून सकाळी सात वाजता सुरू होईल.
६) आकलन चाचणी ऍक्टिवेशनची मुदत संपल्यानंतर दररोज सहभागीर्थींची संख्या जाहीर करण्यात येईल.
७) सातत्याने आकलन चाचणी सोडवणाऱ्यांची नावे 40 दिवसानंतर प्रकाशित केली जातील.

शर्ती व सूचनांमध्ये बदल करण्याचे अंतिम अधिकार‌ बुद्धिस्ट सेमिनरीच्या संचालक मंडळांचे‌ आहेत.

-सत्येंद्र तेलतुंबडे
मुख्य समन्वयक
बुद्धिस्ट सेमिनरी
9623808868

प्रा.अंकुश चव्हाण
मुख्य व्यवस्थापक
9423716052
संपर्कासाठी अधिक फोन क्रमांक.
9922760357
9423074686
8424906910
9881183782
9404322125

तांदुळवाडी ता. राहुरी येथे ग्रामपंचायत, राष्ट्रीय मानवी हक्क अभियान, भीमसेना यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय अधिकाऱ्यां...
29/04/2026

तांदुळवाडी ता. राहुरी येथे ग्रामपंचायत, राष्ट्रीय मानवी हक्क अभियान, भीमसेना यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्रिसरण पंचशील ग्रहण करत 135 वी जयंती संपन्न

मक्तापूर, ता. नेवासा येथे तालुक्यातील  बाबासाहेबांचा पहिला दहा फुटी पूर्णाकृती पुतळा उभा करून 135 वी जयंती साजरी केली.पु...
29/04/2026

मक्तापूर, ता. नेवासा येथे तालुक्यातील बाबासाहेबांचा पहिला दहा फुटी पूर्णाकृती पुतळा उभा करून 135 वी जयंती साजरी केली.
पुतळा उभा करणाऱ्या तरुणांचे आणि महिला वर्गांचे खूप खूप अभिनंदन .....

आधुनिक बुद्ध बाबासाहेब यांच्या 135 वी जयंती विशेष वरखेड गावी जयंती मंडळांने बाबासाहेबांच्या कार्याचा माझ्या खाजगी जागेत ...
29/04/2026

आधुनिक बुद्ध बाबासाहेब यांच्या 135 वी जयंती विशेष
वरखेड गावी जयंती मंडळांने बाबासाहेबांच्या कार्याचा माझ्या खाजगी जागेत लावला. त्यामुळे अद्याप लक्ष वेधून घेत आहे.

Address

Station Road
Rahuri
413705

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रबुद्ध भारत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to प्रबुद्ध भारत:

Shortcuts

Share

Category