Ulka Vishwasrao

Ulka Vishwasrao Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ulka Vishwasrao, Social service, At Zarye, Post. Kurang, Taluka/Rajapur, DIst. Ratnagiri, Rajapur.

माझ गाव झर्ये @ राजापूर तालुका ग्रामदेवता आई आदिष्टी देवी चे आशीर्वाद घेतले. माझ्यासोबत मुंबई महानगरपालिकाच्या नगरसेविका...
10/07/2026

माझ गाव झर्ये @ राजापूर तालुका
ग्रामदेवता आई आदिष्टी देवी चे आशीर्वाद घेतले. माझ्यासोबत मुंबई महानगरपालिकाच्या नगरसेविका सौ माधुरी विश्वासराव मांजरेकर, मा नगरसेविका सौ समीक्षा सक्रे!!

10/07/2026
ADB सहकार्यांतर्गत बांबू विकास प्रकल्प बैठकीस उपस्थितीआज मुंबई येथील MIDC कार्यालय, Express Tower येथे ADB सहकार्यांतर्ग...
03/07/2026

ADB सहकार्यांतर्गत बांबू विकास प्रकल्प बैठकीस उपस्थिती
आज मुंबई येथील MIDC कार्यालय, Express Tower येथे ADB सहकार्यांतर्गत आयोजित बांबू विकास प्रकल्प (Bamboo Development Project) संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहण्याची संधी लाभली. या बैठकीत महाराष्ट्रातील बांबू क्लस्टर विकास, उत्पादन क्षेत्रांची ओळख (Cluster/Production Zone Identification), बिझनेस हब निर्मिती आणि बांबू उद्योगाच्या भविष्यातील संधी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस मी, राजश्री (उल्का) विश्वासराव, समर्जुना फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, पाचल रत्नागिरीच्यावतीने उपस्थित राहिले.पाचल व रत्नागिरी जिल्ह्यात बांबू आधारित उद्योग, रोजगार निर्मिती आणि शाश्वत ग्रामीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

ॐ 🙏शरीर, मन आणि बुद्धी यांचा सुंदर समन्वय साधणारा योग हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा आहे."योग हा केवळ व्यायाम नसून, आ...
21/06/2026

ॐ 🙏
शरीर, मन आणि बुद्धी यांचा सुंदर समन्वय साधणारा योग हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा आहे.
"योग हा केवळ व्यायाम नसून, आनंदी ,निरोगी व संतुलित जीवन जगण्याची एक जीवनपद्धती आहे."
आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने सर्वांना निरोगी आरोग्यमय शुभेच्छा 😊🙏

Bamboo plantation…
16/06/2026

Bamboo plantation…

महाराष्ट्राचं युवा नेतृत्व मा. आदित्यसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
13/06/2026

महाराष्ट्राचं युवा नेतृत्व मा. आदित्यसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समर्जुना फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चे चे पहिले सभासद चुनकोलवण  गावचे गावकर मधुकर मटकर यांचा सन्मान करताना…सोबत सौ समीक्ष...
07/06/2026

समर्जुना फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चे चे पहिले सभासद चुनकोलवण गावचे गावकर मधुकर मटकर यांचा सन्मान करताना…सोबत सौ समीक्षा ताई सक्रे, श्री अनिलजी गुरव, आणि इतर बांबू उत्पादक शेतकरी!
- सौ उल्का विश्वासराव

प्रकल्प ग्रस्त शेतकत्यांच्या उपोषण स्थळी भेट.. त्यांच्यांशी संवाद !!-आधी पुनर्वसन मग धरण…राजापूर तालुक्यातील काजिर्डा गा...
30/05/2026

प्रकल्प ग्रस्त शेतकत्यांच्या उपोषण स्थळी भेट.. त्यांच्यांशी संवाद !!-

आधी पुनर्वसन मग धरण…

राजापूर तालुक्यातील काजिर्डा गावातील जामदा धरण प्रकल्प हा गेली १८ वर्ष रखडला आहे. प्रशासनाचा बेजबाबदारपणा आणि स्थानिक लोकप्रधिनिधींची अनास्था,हुकुमशाही यामुळे येथील लोकांचे पुनर्वसन न करताच आणि विश्वासात न घेता हा प्रकल्प
कंत्राटदारांचे आणि लोकप्रधीनिधींचे खिसे भरणे यासाठी केला जात आहे का.. ? असा प्रश्न येथील भूमिपुत्राना पडला आहे.येथील प्रकल्पबाधित शेतकरी भूमिहीन होणार त्याकडे सरकारचे लक्ष नाही. भूमिपुत्रांचा प्रकल्पाला विरोध नाही परंतु त्यांचे पुनर्वसन नाही आणि प्रकल्प लादला जातोय.. जोपर्यंत भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना ( उद्भव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रकल्प बधितांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. त्तूर्तास उपोषण स्थगित करून न्यायिक लढा चालू ठेवणार आणि वेळ पडल्यास पुन्हा उपोषण करून हा लढा न्याय मिळेपर्यंत चालूच राहील.
- सौ उल्का विश्वासराव

Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth येथे भेट…मा. कुलगुरू Dr. Sanjay Bhave यांच्याशी संवाद साधला.यावेळी Dr. San...
28/05/2026

Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth येथे भेट…
मा. कुलगुरू Dr. Sanjay Bhave यांच्याशी संवाद साधला.
यावेळी Dr. Santosh Varvadekar — सहयोगी अधिष्ठाता तथा विभागप्रमुख, कृषी विस्तार विभाग
Dr. Vaibhav Rajemahadik — हवामान शास्त्रज्ञ
Vijay Shetye — भात विशेष तज्ञ
Bhushan Kelkar — वनशास्त्र महाविद्यालय यांनी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी माहिती दिली. प्रत्येक शेतकरी आणि तरुणांनी येथे भेट देऊन कृषी विद्यापीठातील विविध उपक्रम, संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यावी. अर्जुना धरणामुळे ओलीताखाली आलेल्या सुमारे १५,००० एकर जमिनीवर योग्य नियोजनबद्ध लागवड करून शाश्वत व प्रगत शेती करण्यासाठी ही माहिती निश्चितच उपयुक्त ठरेल.
यावेळी माझ्यासोबत सौ. समीक्षा ताई सक्रे आणि मोहनजी नारकर हेही उपस्थित होते.
— सौ. उल्का विश्वासराव

Address

At Zarye, Post. Kurang, Taluka/Rajapur, DIst. Ratnagiri
Rajapur
415643

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ulka Vishwasrao posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ulka Vishwasrao:

Shortcuts

Share

Category