VillageBook,HiwraBajar,Ramtek,Nagpur

VillageBook,HiwraBajar,Ramtek,Nagpur d

आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोज शुक्रवार ला सकाळी 7.30 वाजता गट ग्रामपंचायत हिवरा बाजार कार्यालयाचा पटागनामध्ये 79 व्या स्वा...
15/08/2025

आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोज शुक्रवार ला सकाळी 7.30 वाजता गट ग्रामपंचायत हिवरा बाजार कार्यालयाचा पटागनामध्ये 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ''झेंडावंदन समारंभ'' चे कार्यक्रम ग्रामपंचायत चे सरपंच मा. सौ. रत्नकला राजेश जैस्वाल यांचे शुभ हस्ते करण्यात आले असून या समारंभा मध्ये ग्रामपंचायत चे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य गण, ग्रामपंचायत अधिकारी साहेब श्री. एम. डि. फिरंगवाड, जि. प. शाळा, अंगणवाडी, शांतीनिकेतन अध्ययन मंदिर, येथील विध्यार्थी गण व शिक्षक तसेच हिवरा बाजार येथील प्रतिष्टीत नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेशजी जैस्वाल साहेब यांचा उपस्थितीमध्ये "झेंडावंदन कार्यक्रम'' करण्यात आले.
व तसेच पुराना बाजार चौक येथील "झेंडावंदन समारंभ'' हे ग्रामपंचायत सदस्य सौ. सरस्वती इंद्रपाल सलामे यांचा शुभ हस्ते करण्यात आले.

आज दिनांक 14/08/2025 रोज गुरुवार ला सकाळी 9.00 वाजता हर घर तिरंगा या कार्यक्रमा अंतर्गत गट ग्रामपंचायत हिवरा बाजार येथे ...
14/08/2025

आज दिनांक 14/08/2025 रोज गुरुवार ला सकाळी 9.00 वाजता हर घर तिरंगा या कार्यक्रमा अंतर्गत गट ग्रामपंचायत हिवरा बाजार येथे मा. सौ. रत्नकला राजेश जैस्वाल सरपंच व मा.सौ. यमुना बलदेव लाडे उपसरपंच यांचा अध्यक्षतेखाली झेंडावंदनाचे कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य गण ग्रामपंचायत अधिकारी साहेब श्री. एम. डि. फिरंगवाड, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ता मा. श्री. राजेशजी जैस्वाल साहेब व गावातील प्रतिष्टीत नागरिक यांचा उपस्थिती मध्ये पार करण्यात आले व तसेच गावातील सर्व घरी तिरंगा झेंडा लावण्यात आले.

13/08/2025
आज दिनांक 13/08/2025 रोज बुधवार ला सकाळी 9.00 वाजता हर घर तिरंगा या कार्यक्रमा अंतर्गत गट ग्रामपंचायत हिवरा बाजार येथे म...
13/08/2025

आज दिनांक 13/08/2025 रोज बुधवार ला सकाळी 9.00 वाजता हर घर तिरंगा या कार्यक्रमा अंतर्गत गट ग्रामपंचायत हिवरा बाजार येथे मा. सौ. रत्नकला राजेश जैस्वाल सरपंच यांचा अध्यक्षतेखाली झेंडावंदनाचे कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य गण ग्रामपंचायत अधिकारी साहेब श्री. एम. डि. फिरंगवाड, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ता मा. श्री. राजेशजी जैस्वाल साहेब व गावातील प्रतिष्टीत नागरिक यांचा उपस्थिती मध्ये पार करण्यात आले व तसेच गावातील सर्व घरी तिरंगा झेंडा लावण्यात आले.

13/12/2021

बी

ग्रामपंचायत हिवरा बाजार येथे लोककला पथनाट्य चा पथकांनी एक छोटंसं नाटकाचा माध्यमातून कोरोना च सोशल डिस्टिंग सॅनिटायजर च म...
11/01/2021

ग्रामपंचायत हिवरा बाजार येथे लोककला पथनाट्य चा पथकांनी एक छोटंसं नाटकाचा माध्यमातून कोरोना च सोशल डिस्टिंग सॅनिटायजर च महत्व पटवून सांगितले

04/11/2020

भारतीय कृषिव्यवस्था
अशी आहे.
इ.स. १९७३ ला आणि २०१९ ला शेतमालाचे भाव , मजुरी , नोकरदारांचे पगार यात झालेली वाढ बघितल्यानंतर नक्कीच आपल्या धडावर आपले शिर आहे का ? असा प्रश्न पडेल.
--------- ------------------------------------
वस्तू |●१९७३* २०१९* | वाढ पटीत

----------|---------- |------------ -|-
कापूस | रुपये ५०० | ५५०० | ११ पट

ज्वारी | " २०० | २२०० | ११ पट

गहू | " ४०० | २८०० ७ पट

तांदूळ | " ६०० | ३६०० ६ पट

पेट्रोल | " ३ | ८१ | २७ पट

डिझेल| " २ | 70 | ३५ पट

मजुरी | " ५ | ४०० | ८० पट
| | ( दिवस )

सोने | ४०० तोळा | ५२००० | १३० पट

शिपाई | १७५महिना | २५००० | १५० पट

कनिष्ठ |२२५ महिना| ४०००० | १७५ पट
लिपिक

प्राध्यापक | ७००महिना| २१००००० | ३०० पट
----------------------------------------------
म्हणजे ४५ वर्षात शेतमालामध्ये ४.५ पटीपासून ते ११ पटीपर्यंतच वाढ...............

मजुरीमध्ये मात्र १०० पट वाढ ...
आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात तर १५० पटीपासून ते 300 पट वाढ

आरे कसा जगेल माझा बळीराजा......शेतीला मुबलक पाणी नाही , वीज नाही , रस्ते नाहीत , खते ,औषधी, बी-बियाणे महागली, त्यातही निसर्गाचा अनियमितपणा.....................

कसा जगेल तो , कशी शिकतील त्याची मुलं बाळंखेद वाटतोय आपण सारे शेतकऱ्यांची मुलं असूनही. *कृषिप्रधान भारतात कर्जप्रधान झालोत.......

ढोर मेहनत करून पिकवणार शेतकरी व त्याचा भाव ठरवणार व्यापारी. हा कशा कृषिप्रधान देश, हा कोणता न्याय, ही कोणती पध्दत

आजपर्यंतच्या सर्वच राज्यकर्त्यांचे शेतीविषयी उदासीन धोरण , यामुळे हा "अहोरात्र काबाडकष्ठ करणारा जगाचा हा पोशिंदा "आज भयंकर संकटात सापडला आहे त्याला मदतीची व सहानुभूतीची गरज आहे

शेतीला उद्योगाचा दर्जा मिळालाच पाहिजे. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव शेतमालाला मिळालाच पाहिजे.

या संकटातून बळीराजा वाचवण्यासाठी पर्याय.....जागे व्हा !
संघटित व्हा!!
या पांढरपेशी व शोषक व्यवस्थेला ठिकाणावर आणण्यासाठी निश्चय करूया !!!

जर तुम्हाला तुमच्या पदवीची आणि शेतकऱ्या विषयी थोडीही सहानभूती असेल तर मित्रांनो या माहितीला प्रचंड शेयर करा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेबांना राज्यातील संगणकपरिचालकांचे खुले पत्र !आदरणीय महोदय,      आपणास ख...
29/10/2020

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेबांना राज्यातील संगणकपरिचालकांचे खुले पत्र !

आदरणीय महोदय,
आपणास खुले पत्र लिहिण्यास कारण की,महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत – पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून एप्रिल २०११ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र )हा प्रकल्प राबवण्यात आला.या प्रकल्पाची अमलबजावणी यंत्रणा म्हणून महाऑनलाईन लिमिटेड या कंपनीची नियुक्ती शासनाने केली या कंपनीने ग्रामपंचायत स्तरावर २२७५० संगणकपरिचालक,पंचायत समिती स्तरावर ७०२ तर जिल्हा परिषद स्तरावर १७० संगणकपरिचालकांची नियुक्ती केली.या सुमारे २३६२२ संगणकपरिचालकानी प्रामाणिकपणे काम केल्यामुळे महाराष्ट्र शासनाला ई –पंचायत मध्ये केंद्र शासनाकडून सलग ३ वर्ष देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
महाऑनलाईन ला त्यावेळी प्रती ग्रामपंचायतकडून १३ व्या वित्त आयोगातून ८००० रुपये देण्यात येत होते परंतु महाऑनलाईन कडून संगणकपरिचालकांना ५० रु,२०० रुपयापासून ३५०० ते ३८०० रुपये पर्यंत मानधन देऊन ही कंपनी उर्वरित निधी स्टेशनरीच्या नावाखाली हडप करून संगणकपरिचालकांची आर्थिक पिळवणूक करून मानसिक त्रास देत होती.त्यामुळे राज्यातील संगणकपरिचालकानी या कंपनीच्या हुकुमशाही व मनमानी त्रासाला कंटाळून राज्यात “महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना” स्थापन करून राज्यव्यापी लढा उभारला.त्यानुसार तालुका,जिल्हा व विभाग स्तरावर आंदोलने झाल्यावर ११ डिसेंबर २०१४ रोजी नागपुर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढून किमान वेतन देऊन जिल्हा परिषदे मार्फत नियुक्ती द्यावी तसेच या भ्रष्ट महाऑनलाईन कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली होती.त्यावेळी हजारोंच्या संख्येने संगणक परिचालक सहभागी झाले होते.त्यावेळी आपल्याच पक्षाचे असलेले तत्कालीन ग्रामविकास राज्यमंत्री मा.दिपकजी केसरकर साहेब यांनी आंदोलन स्थळावर भेट देऊन मागणी मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले.परंतु त्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे संघटनेच्या माध्यमातून २ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत मुंबईत लाक्षणिक उपोषण केले त्यावेळी सुद्धा ग्रामविकास राज्यमंत्री दिपकजी केसरकर साहेबांनी लेखी आश्वासन दिले परंतु त्यानंतर सुद्धा निर्णय दिला नाही.३१ मार्च २०१५ रोजी मुंबई येथे भायखळा राणीबाग ते आझाद मैदान असा सुमारे १५००० ते २०००० हजार संगणकपरिचालकांच्या उपस्थितीत मोर्चा काढला.त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेन्द्रजी फडणवीस साहेब व ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांनी लेखी आश्वासन दिले परंतु त्याची पुर्तता केली नाही.त्यानंतर १५ डिसेंबर २०१५ रोजी नागपुर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला या मोर्चात सुमारे २२ हजार संगणकपरिचालक सहभागी झाले होते.त्या मोर्चावर १६ डिसेंबर ला ३ वेळा लाठीचार्ज झाला.तो लाठीचार्ज मोडून काढत २२ हजार संगणकपरिचालकानी नागपुरच्या टेकडी रोडवर सुमारे ८ दिवस म्हणजे २२ डिसेंबर पर्यंत ठिय्या आंदोलन केले.त्या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांनी १५ दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन आंदोलन स्थळावर येऊन दिले.परंतु त्यांनी ते दिलेले आश्वासन पाळले नाही.संग्राम प्रकल्प बंद झाला तरीही नियुक्ती मिळत नव्हती ना शासन निर्णय देत नव्हते त्यावेळी दरम्यानच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेन्द्रजी फडणवीस साहेबांनी २ बैठका घेतला परंतु निर्णय दिला नाही.त्यामुळे २५ जुलै २०१६ रोजी मुंबई येथे भायखळा (राणीबाग) ते आझाद मैदान मोर्चा काढला असता सीएसटी जवळ सुमारे ३.५ तास रस्ता जाम केला त्यावेळी “आपले सरकार सेवा केंद्र” या प्रकल्पाच्या माध्यमातून संगणकपरिचालकांचा निर्णय देण्याची घोषणा ग्रामविकासमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी विधानसभेत केली.परंतु आपले सरकार प्रकल्पात संगणकपरिचालकांची निराशा करून दिल्ली च्या CSC e- Governance Services India Limited या कंपनीला या प्रकल्पाचे ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाने काम दिले ते डिसेंबर २०१६ पासून आजतागायत सुरू आहे.
आपले सरकार प्रकल्पासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून तरतूद करण्यात आल्याने ग्रामपंचायतच्या वार्षिक उत्पन्नावर आधारित आपले सरकार सेवा केंद्र व कल्स्टर पद्धत आल्याने अनेक संगणकपरिचालकांना नियुक्ती मिळाली नाही त्यांना बेरोजगार व्हावे लागले तसेच पंचायत समिती स्तरावरील ७०२ व जिल्हा परिषद स्तरावरील १७० संगणकपरिचालक बेरोजगार झाला कारण की आपले सरकार प्रकल्प हा फक्त ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात आला.

CSC–SPV कंपनीने आपले सरकार प्रकल्पात सुमारे ३६०कोटींचा भ्रष्टाचार करून सुद्धा शासनाचे या कंपनीला अभय का ?
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील संगणकपरिचालकांना प्रामाणिकपणे काम करून सुद्धा वर्ष वर्ष मानधन मिळाले नाही तसेच अनेकांचे मानधन या कंपनीने हडप केले.त्याच बरोबर प्रती आपले सरकार केंद्रासाठी दर महिन्याला ४४५० रुपये ग्रामपंचायत कडून गावच्या विकासासाठी असलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतुन csc –spv ला स्टेशनरी व हार्डवेअर – सॉफ्टवेअर व व्यवस्थापनासाठी दिले जातात परंतु या कंपनीने ग्रामपंचायतीना वर्षातून २ पेपर रिम व्यतिरिक्त काहीही दिले नाही.त्यामुळे या डिसेंबर २०१६ ते ऑक्टोबर २०२० या ४६ महिन्याच्या काळात या csc –spv कंपनीने सुमारे ३६० कोटींचा भ्रष्टाचार केला आहे.याबाबत अनेक वेळा तक्रार करून सुद्धा शासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल न घेता फक्त कंपनीला अभय देण्याचे काम झाले आहे.एकीकडे कंपनीचा भ्रष्टाचार व दुसरीकडे कंपनीची या प्रकल्पासाठी असलेली मुदत ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेली असताना कोरोंनाचे कारण पुढे करत याच कंपनीला मुदतवाढ दिली आहे.त्याच सोबत या प्रकल्पात भ्रष्टाचार केलेला असताना उमेद योजनेचे काम दिले म्हणजे कंपनीला पूर्णपणे पाठीशी घातले आहे.

आदरणीय मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे साहेब आपण आझाद मैदानावर संगणकपरिचालकाना दिलेले वचन विसरलात का ?
साहेब कुठलाही प्रश्न असेल तर तो प्रश्न सहजासहजी सुटत नसेल तर कोणतीही संघटना,एखादा समूह किंवा व्यक्ती हे आंदोलनाचा मार्ग अवलंबतात आणि मायबाप शासनापुढे आपली मागणी मांडतात त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात दिल्लीच्या csc –spv या कंपनीच्या माध्यमातून होत असलेला भ्रष्टाचार,संगणकपरिचालकांची आर्थिक पिळवणूक यासह संगणकपरिचालकानी मागील ९ वर्षापासून संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून केलेल्या प्रामाणिक कामाची दखल घेऊन राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणकपरिचालकांची नियुक्ती आपल्या राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून कर्मचारी दर्जा देऊन करून किमान मासिक वेतन द्यावे यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर २७ ते ३० नोव्हेंबर २०१८ रोजी रात्रंदिवस आंदोलन केले.या दरम्यान तत्कालीन विरोधी पक्षात असलेले व सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात असलेले सुमारे डझनभर मंत्री महोदयांनी आमच्या मागणीला व आंदोलनाला पाठीबा दिला व आज सरकार बदलले तरी हे लोक चिडीचूप आहेत.त्यात योगा योगाने का होईना पण आपण २९ नोव्हेंबर २०१८ रोजी आझाद मैदानावर आलात आमची मागणी व आंदोलन पाहिले राज्यभरातून आलेल्या हजारो आंदोलकांना आपण धीर तर दिलाच त्यासोबत आंदोलनाला पाठिंबा दिला,त्याच ठिकाणी लढल्या शिवाय काही मिळत नाही असे आपण म्हणाला होतात आणि महाराष्ट्र आय टी महामंडळात घेण्याचे आश्वासन नाही तर वचन दिले आणि ही मागणी मान्य होई पर्यंत शिवसेना तुमची साथ सोडणार नसल्याचे सांगितले.हे वचन आपण शिवसेनेचे तत्कालीन मंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब,मा.रामदासजी कदम साहेब,मा.सुभाषजी देसाई साहेब,मा.दिपकजी सावंत साहेब,मा.दिवाकरजी रावते साहेब,मा.दिपकजी केसरकर साहेब,मा.दादाजी भुसे साहेब,मा.विजयजी शिवतारे साहेब यांच्यासह अनेक आमदार तसेच हजारो संगणकपरिचालकांच्या समोर दिले आहे.तरीही वचन व आश्वासन न दिल्यासारखे आमचा प्रश्न आपण विसरून गेलात असे आम्हाला वाटत आहे.त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेन्द्रजी फडणवीस साहेबांनी विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते ना.धनंजयजी मुंडे साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की येत्या १० दिवसात बैठक घेऊन संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात घेण्याचा निर्णय घेण्यात येईल.त्यांचे १० दिवसाला १० महीने लागले त्यावेळी त्यांनी संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली त्यानुसार ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाने कार्यवाही सुरू केली .त्याचे लेखी रेकॉर्ड ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागात व माझ्याकडे सुद्धा उपलब्ध आहे.
आपल्या सारख्या नेत्यावर आमचा किती प्रचंड विश्वास आहे,आपण दिलेला शब्द व वचन केव्हाच खाली टाकत नाहीत हे आम्हाला माहीत आहे.परंतु सत्ता आल्यावर मी आपल्याला ३ वेळा भेटलो निवेदने दिली आपल्या मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकार्‍याना भेटलो पण त्याचा काहीही उपयोग होताना मला दिसत नाही.कारण की आपण आम्हाला आझाद मैदानावर दिलेले वचन विसरलात की काय असे वाटत आहे.जर आमच्या सारख्या ग्रामीण भागात डिजिटल महाराष्ट्राचे काम करणार्‍या हजारो शेतकरी – शेतमजुरांच्या मुलांच्या आपल्यावर अपेक्षा आहेत आणि विश्वास आहे की आपण आम्हाला न्याय देणार याच साठी जरी कामाच्या व्यापात आपण आम्हाला दिलेले आश्वासन विसरला असाल तर कृपया विसरून न जाता दिलेल्या वचना नुसार आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर काम करणार्‍या व बेरोजगार झालेल्या सुमारे २३६२२ संगणकपरिचालकांना न्याय द्यावा याच साठी हे खुले पत्र आपणास लिहिले आहे.

धन्यवाद !
आपलाच
सिद्धेश्वर मुंडे ,
राज्यअध्यक्ष
महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना
मो.9604034877

श्री. अमित नंदकिशोर गायधने तालुका समन्वयक आपले सरकार सेवा केंद्र श्री. अमित नंदकिशोर गायधने सर तालुका समन्वयक रामटेक यां...
20/10/2020

श्री.

अमित नंदकिशोर गायधने
तालुका समन्वयक
आपले सरकार सेवा केंद्र
श्री. अमित नंदकिशोर गायधने सर तालुका समन्वयक रामटेक यांचा मार्गदर्शनाखाली केलेली कार्य
1) ग्रामपंचायत अंतर्गत सेवा :- ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असलेले १८ प्रकारचे दाखले टाकश वसुली व ग्रामसेवक / सरपंच यांना Computerise कागदपत्रे तयार करून देणे अशा अनेक सेवा देण्यात येतात. सोबतच पेपरलेस व ई ग्राम सोफ्ट १ ते ३३ प्रकारचे नमुने Online करणे इत्यादी कामे करण्यात येतात.
2) डिजिटल सेवा :- संपूर्ण देशात तसेच ग्रामीण भागात नागरिकांसाठी विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. अशा उपयुक्त पोर्टल म्हणजे डिजिटल सेवा या पोर्टलच्या माध्यमातून विज बिल भरणे, मोबाईल टी.व्ही. रिचार्ज करणे, पेन्शन योजना अशा अनेक सेवा नागरिकांना देण्यात येतात.
3) आयुष्यमान भारत :- आयुष्यमान भारत या योजनेचे महत्व व त्यामागच्या हेतू गावातील लोकांना समजावून सर्व लाभार्थ्यांना हेल्थ कार्ड काढून दिलीत.
4) PM किसान पेन्शन योजना :- सरकारने शेतकऱ्यांसाठी p PM किसान पेन्शन योजना अमलात आणली. या योजनेंतर्गत गावातील सर्व शेतकर्यांना वार्षिक रक्कम रुपये ६०००/- पेन्शन चालू करून दिलीत. त्याचा फायदा गावातील तसेच गावाबाहेरील भरपूर शेतकर्यांना झाला.
5) श्रमयोगी मानधन योजना :- श्रमयोगी मानधन योजने अंतर्गत मी गावातील १८ ते ४० वयोगटातील व्यक्तींची खाता ओपन करून दिले.
6) सातवी आर्थिक जनगणना :- सातवी आर्थिक जनगणना मी माझ्या गावाची तसेच आजूबाजूच्या गावाची आशा सेविका ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मदतीने पूर्ण केली. हि जनगणना करताना मला नवीन काही गोष्टी शिकायला मिळाल्या.
7) बँकिंग सेवा :- Digipay च्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात तसेच त्यापूर्वी गावातील नागरिकांना प्रधानमंत्री किसान योजना व जनधन योजनेची जमा झालेली रक्कम Digipay च्या माध्यमातून काढून दिली. त्याचा फायदा जास्तीत जास्त अपंग, वृद्ध, गरोदर माता, निराधार महिला यांना झाला. त्यामुळे डिजिटल इंडियाची हि बँकिंग सुविधा महत्वाची ठरली.

Address

Ramtek
441106

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,HiwraBajar,Ramtek,Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share