Ramtek subdivision Nagpur

Ramtek subdivision Nagpur All updates about administration from SDO OFFICE RAMTEK.

01/02/2018
" महाराजस्व अभियानांतर्गत समाधान योजना शिबिर रामटेक "मा. जिल्हाधिकारी श्री. सचिन कुर्वे यांच्या आदेशानुसार रामटेक तालुक्...
09/01/2018

" महाराजस्व अभियानांतर्गत समाधान योजना शिबिर रामटेक "

मा. जिल्हाधिकारी श्री. सचिन कुर्वे यांच्या आदेशानुसार रामटेक तालुक्यातील शासनाच्या विविध विभागांतर्गत विविध योजनांचा १००% लाभ गावपातळीवर देण्यासाठी जानेवारी २०१८ महिन्यात खालील गावे निवडण्यात आली असून दिनांक १७/०१/२०१८ रोजी तहसील कार्यालय सभागृहात महाराजस्व शिबिर आयोजित करण्यात आले आहे. खाली नमूद १२ गावांचे लोकप्रतिनिधी, गावकरी , पत्रकार, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलिस पाटील , अंगणवाडी सेविका इ. सर्वांची आढावा बैठक तहसील कार्यालय रामटेक येथे पार पडली. सभेतील सर्वांना रामटेक उपविभागीय अधिकारी श्री राम जोशी यांनी शिबीराच्या यशस्वीतेसाठी सर्वांना आवाहन करताना उपस्थित सर्वांच्या शंकांचे निरसन केले तसेच शासकीय योजनांबद्दल अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळेस तहसीलदार श्री धरमेश फुसाटे, रामटेक नगराध्यक्ष श्री दिलीप देशमुख,नायब तहसीलदार श्री नितीन धापसे पाटील, संगायो ना. त. श्री सोनकुसरे, निरीक्षण अधिकारी श्री सुमेध चवरे, आतिश जाधव, सदर सदर १२ गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी , मंडल अधिकारी , अंगणवाडी सेविका इ. उपस्थित होते.

पारशिवनी तालुक्यातील तलाठी यांच्या नावाची व भ्रमणध्वनी क्रमांकाची यादी
27/12/2017

पारशिवनी तालुक्यातील तलाठी यांच्या नावाची व भ्रमणध्वनी क्रमांकाची यादी

" कालिदास महोत्सव रामटेक "        नागपूर येथील कालिदास महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर रामटेक येथे दिनांक २७ व २८ जानेवार...
22/12/2017

" कालिदास महोत्सव रामटेक "

नागपूर येथील कालिदास महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर रामटेक येथे दिनांक २७ व २८ जानेवारीला कालिदास महोत्सवाच्या पुढील टप्प्याचे आयोजन केले आहे.
रामटेकचे प्रांताधिकारी श्री राम जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
श्री जोशी यांनी सांगितले की हा महोत्सव कालिदास समारोह आयोजन समिती, आदिवासी विकास विभाग, नागपूर दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्दमाने आयोजित करण्यात येत असून यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. तरी रामटेक प्रशासनाच्या वतीने त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम स्थल - नेहरू मैदान, रामटेक, दि. २७/०१/२०१८ ते २८/०१/२०१८.

SVEEP कार्यक्रमांतर्गत ताई गोळवलकर महाविद्यालय, रामटेक येथे वक्तृत्व स्पर्धेचे तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले गेले.या...
13/12/2017

SVEEP कार्यक्रमांतर्गत ताई गोळवलकर महाविद्यालय, रामटेक येथे वक्तृत्व स्पर्धेचे तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले गेले.
यावेळी उपविभागीय अधिकारी श्री राम जोशी यांनी तरूणाईशी संवाद साधला..

रि-एडिट आज्ञावालीच्या कामाचा प्रगती अहवाल (जिल्हा-नागपूर) ०५.१२.२०१७
06/12/2017

रि-एडिट आज्ञावालीच्या कामाचा प्रगती अहवाल (जिल्हा-नागपूर) ०५.१२.२०१७

दुकान निहाये कार्ड संख्या व भ्रमणध्वनी क्रमांकाची यादी.
02/12/2017

दुकान निहाये कार्ड संख्या व भ्रमणध्वनी क्रमांकाची यादी.

रामटेक तालुक्यातील तलाठी यांच्या नावांची यादी
14/11/2017

रामटेक तालुक्यातील तलाठी यांच्या नावांची यादी

दि. १० नोव्हे २०१७ रोजी निवडणूक आयोग नवी दिल्ली आयोजित किट्स इंजिनिअरिंग कॉलेज, रामटेक येथे निवडणूक ज्ञान स्पर्धेचे आयोज...
12/11/2017

दि. १० नोव्हे २०१७ रोजी निवडणूक आयोग नवी दिल्ली आयोजित किट्स इंजिनिअरिंग कॉलेज, रामटेक येथे निवडणूक ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. एकूण २० संघातील ४०विद्यार्थ्यांनी यात उत्साहात सहभाग घेतला. सर्वच विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान पणाला लावले. सर्वोत्तम २ संघ जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता पाञ ठरले. मा. तहसिलदार, रामटेक श्री फुसाटे सर, मा. प्राचार्य किट्स कॉलेज, मा.श्री राम जोशी सर,उपविभागीय अधिकारी, रामटेक यांचे हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला...
वरील उपक्रमास मोलाचे मार्गदर्शन मा. जिल्हाधिकारी, नागपूर श्री सचिन कुर्वे सर व मा. उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नागपूर श्री घुगे सर यांचे लाभत आहे....

11/11/2017
Election queez at KITS dtd 10.11.17
10/11/2017

Election queez at KITS dtd 10.11.17

Address

Ramtek
441106

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ramtek subdivision Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share