Zilla Parishad Ratnagiri

Zilla Parishad Ratnagiri Government Organization

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे यांच्या शुभहस्ते जि.प. प्...
15/08/2026

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे यांच्या शुभहस्ते जि.प. प्रांगणात ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर वंदे मातरम , जन गण मन व राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. तसेच गोदूताई जांभेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांतर्फे देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्मरण करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष श्री.विलास चाळके , समाजकल्याण सभापती श्री.सुयोग कांबळे , शिक्षण व वित्त सभापती श्री.नंदकुमार मुरकर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे (भा.प्र.से), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.परीक्षित यादव , जि.प.सदस्य ,उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि) श्री.विजयसिंह जाधव , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री.सागर पाटील, वित्त व लेखाधिकारी श्री.उत्तम सुर्वे, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.अनिरुद्ध आठल्ये व खातेप्रमुख , कर्मचारी वृंद उपस्थित होते.

एचपीव्ही लसीकरण जनजागृतीचा संदेश देत रोटरी फ्रेंडशिप रन-२०२६ उत्साहात संपन्नरत्नागिरी, दि. २ ऑगस्ट : रोटरी क्लब ऑफ रत्ना...
04/08/2026

एचपीव्ही लसीकरण जनजागृतीचा संदेश देत रोटरी फ्रेंडशिप रन-२०२६ उत्साहात संपन्न

रत्नागिरी, दि. २ ऑगस्ट : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आयोजित "रोटरी फ्रेंडशिप रन-२०२६" फ्रेंडशिप डे निमित्त उत्साहात संपन्न झाली. मुलींना गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणाऱ्या एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन व धावस्पर्धेला हिरवा झेंडा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदेही रानडे, नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला बाल विकास) मलिनाथ कांबळे,जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे, जिल्हा क्रीडा अधिकारी शिंदे तसेच नगरसेविका सौ. मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत दाखविण्यात आला.

स्पर्धेत ४०० हून अधिक धावपटूंनी ३ व ५ कि.मी. गटांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आरोग्य, मैत्री आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. कार्यक्रमापूर्वी झुंबा प्रशिक्षिका अंकिता पाटकर यांनी झुंबा सत्र घेऊन सहभागींचा उत्साह वाढविला.

यावेळी सौ. वैदेही रानडे यांनी एचपीव्ही लस सुरक्षित, प्रभावी व फायदेशीर असल्याचे सांगून ९ ते १४ वर्षे व १४ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुलींनी लसीकरण करून घ्यावे तसेच पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता जवळच्या आरोग्य केंद्रात मुलींना लस द्यावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख संयोजक रोटे. सागर बसणकर व राधा बसणकर यांच्यासह रोटे. अमर आयरे, रोटे. प्रदीप साळुंखे, सिताराम सावंत, विनायक निकम, रोटे. दादा कदम, रोटे. डॉ. केतनकुमार चौधरी, रोटे. डॉ. वामन सावंत, कोकण कोस्टल मॅरेथॉन ग्रुप, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन, स्वयंसेवक, प्रायोजक व विविध शासकीय विभागांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी असिस्टंट गव्हर्नर रोटे. अविनाश पालशेतकर यांनी उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष डॉ. संदीप करे यांनी उपस्थित मान्यवर, सहभागी, स्वयंसेवक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानत, रोटरी फ्रेंडशिप रन हा एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती करणारा प्रभावी सामाजिक उपक्रम असल्याचे सांगितले.

महान स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🏼आज जि.प.रत्नागिरी येथे क्रांतिसिंह ...
03/08/2026

महान स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🏼

आज जि.प.रत्नागिरी येथे क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले, तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे , समाजकल्याण सभापती श्री.सुयोग कांबळे , मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे (भा.प्र.से) , जि.प. सदस्य श्री.सचिन धाडवे, सौ.रेवती पाटील, श्री.अण्णा कदम ,खेड सभापती श्रीमती आफिया पालेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.परीक्षित यादव , उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि) श्री.विजयसिंह जाधव व सर्व खातेप्रमुख , कमर्चारी वृंद उपस्थित होते.

महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री, कर्तव्यनिष्ठ नेतृत्व 'अजितदादा पवार' यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! या प्रसं...
22/07/2026

महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री, कर्तव्यनिष्ठ नेतृत्व 'अजितदादा पवार' यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.अस्मिता केंद्रे , समाजकल्याण सभापती श्री.सुयोग कांबळे व सर्व अधिकारी यांच्या हस्ते अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी आज प्राथमिक आरोग्य केंद्र फुणगुस (ता. संगमेश्वर) येथे भेट द...
10/07/2026

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी आज प्राथमिक आरोग्य केंद्र फुणगुस (ता. संगमेश्वर) येथे भेट देऊन आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला.
भेटीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्राची माहिती घेण्यात आली. तसेच बाह्यरुग्ण विभाग व आंतररुग्ण विभाग मधील आरोग्य सेवांचे कामकाज, उपलब्ध औषधसाठ्याची तपासणी, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या एचपीव्ही लसीकरण कार्यक्रमाचा आढावा तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेण्यात आली.
याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात सुरू असलेल्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक औषधसाठा, मनुष्यबळ, आरोग्य सेवा व आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सदैव सज्ज ठेवण्याच्या सूचना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या.
यावेळी डॉ. लिंगायत, डॉ. आगरे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाज, रुग्णसेवा व विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समाधान व्यक्त करून पुढील काळातही गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.

वेद, शास्त्र आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक, ज्ञानेशकन्या, प्रज्ञाचक्षु 'श्री. संत गुलाबराव महाराज' यांना जयंतीदिनी कोटी ...
06/07/2026

वेद, शास्त्र आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक, ज्ञानेशकन्या, प्रज्ञाचक्षु 'श्री. संत गुलाबराव महाराज' यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!

या निमित्त जिल्हा परिषद रत्नागिरी येथे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी शिक्षण व वित्त सभापती श्री.नंदकुमार मुरकर , मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे (भा.प्र.से) , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.परीक्षित यादव , उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि) श्री.विजयसिंह जाधव , वित्त व लेखाधिकारी श्री.उत्तम सुर्वे , महिला व बालविकास अधिकारी श्री.मल्लिनाथ कांबळे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत 'छत्रपती शिवाजी...
06/06/2026

महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत 'छत्रपती शिवाजी महाराज' यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा!
या मंगलदिनी जि.प.रत्नागिरी येथे शिवराज्याभिषेक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.केंद्रे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शालेय विद्यार्थ्यांनी राज्यगीताचे गायन केले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे, शिक्षण व वित्त सभापती श्री.नंदकुमार मुरकर मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.परीक्षित यादव , जि.प.सदस्य ,उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि) श्री.विजयसिंह जाधव , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री.सागर पाटील, वित्त व लेखाधिकारी श्री.उत्तम सुर्वे व खातेप्रमुख , कर्मचारी वृंद उपस्थित होते.

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जि.प.मुख्यालयात आज शपथ घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता के...
22/05/2026

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जि.प.मुख्यालयात आज शपथ घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे , शिक्षण व वित्त सभापती श्री.नंदकुमार मुरकर , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.परीक्षित यादव , उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि) श्री.विजयसिंह जाधव , वित्त व लेखा अधिकारी श्री.उत्तम सुर्वे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!आज या दिनी जिल्हा परिषद रत्नागिरी येथे...
14/05/2026

स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!

आज या दिनी जिल्हा परिषद रत्नागिरी येथे मा.अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे (भा.प्र.से) , उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि) श्री.विजयसिंह जाधव, वित्त व लेखा अधिकारी श्री.उत्तम सुर्वे, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.अनिरुद्ध आठल्ये व खातेप्रमुख , कर्मचारी वृंद उपस्थित होते.

आज १ मे – महाराष्ट्र दिनमहाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी लढणाऱ्या सर्व हुतात्म्यांना वंदन! या मातीत जन्म घेऊन आपल्या क...
01/05/2026

आज १ मे – महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी लढणाऱ्या सर्व हुतात्म्यांना वंदन! या मातीत जन्म घेऊन आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचा झेंडा उंचावणाऱ्या शेतकरी, कामगार, शिक्षक, विद्यार्थी, महिला आणि सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या मन:पूर्वक अभिनंदन!
जिल्हा परिषद रत्नागिरी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन सोहळा पार पडला. सर्वप्रथम जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर संपूर्ण वंदे मातरम ध्वनिफीतद्वारे सादर झाले. यावेळी जि.प शाळातील विद्यार्थ्यांतर्फे राज्यगीत सादर केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्मरण करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष श्री.विलास चाळके, वित्त व शिक्षण सभापती श्री.नंदकुमार मुरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे (भा.प्र.से) , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.परीक्षित यादव , खातेप्रमुख व सर्व कर्मचारी वृंदाच्या उपस्थितीत हा सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.

Address

Dr. Babasaheb Ambedkar Bhavan, Zilla Parishad Ratnagiri, Malnaka
Ratnagiri
415612

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zilla Parishad Ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Zilla Parishad Ratnagiri:

Shortcuts

Share